Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

आरक्षण मागणीसाठी सांगलीत धरणे आंदोलन
सांगली, २३ जानेवारी / प्रतिनिधी

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात तातडीने समावेश करून २५ टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी

 

महाराष्ट्र राज्य मराठा समन्वय समितीच्या सांगली जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व सांगली जिल्हाध्यक्ष वैभव शिंदे यांनी केले. मराठा समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, राज्यात संख्येने सर्वाधिक असणारा हा समाज त्या मानाने सर्वात गरीब व कष्टकरी असून तो शेतकरी वर्गात बहुसंख्येने आहे. सध्या राज्याचे १७ टक्के जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली असून त्यातील ८३ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. यात मराठा समाजाचा ६० टक्के घटक हा अडीच एकरापर्यंत जमीनधारक आहे. हीच परिस्थिती नोकरी व व्यवसायातही आहे.