Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

प्रदूषण थांबविण्यासाठी सोलापूर-नागपूर निमा रॅली
सोलापूर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) च्या सोलापूर शाखेच्या वतीने ‘प्रदूषण थांबवा व

 

पर्यावरण वाचवा’ याची जनजागृती करण्यासाठी सोलापूर ते नागपूपर्यंत निमा फेरी येथून रवाना झाली.
ही फेरी सोलापूरहून तुळजापूर, लातूर, अहमदपूर, नांदेड, यवतमाळमार्गे नागपूरला जाणार असून, वाढते प्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम या विषयावर जनजागृती करणार आहे. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ वडतिले यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या वेळी डॉ. नितीन बलदवा यांनी प्रदूषण, डॉ. सी.व्ही. कुलकर्णी यांनी जागतिक पर्यावरण आणि प्रदूषण यांचा संबंध, डॉ. सुभाष कांबळे यांनी जलप्रदूषण, डॉ. अनिल पत्की यांनी हवेतील प्रदूषण, डॉ. साहेबराव गायकवाड यांनी ध्वनिप्रदूषण या विषयांवर मार्गदर्शन केले. निमाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांनी अन्न आणि औषधातील भेसळ या विषयाकडे सर्वाचे लक्ष वेधले. सोलापूर ते नागपूर निघालेल्या फेरीत सोलापुरातील चाळीस नामांकित डॉक्टर सहभागी झाले आहेत. याशिवाय ठिकठिकाणचे डॉक्टर या फेरीत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.