Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर मात
डेव्हिड वॉर्नरची झंझावाती खेळी व्यर्थ
सिडनी, २३ जानेवारी / पीटीआय

 

दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या एकदिवसीय लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन गडी राखून विजय साजरा केला आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरची झंझावाती खेळी व्यर्थ ठरली. उभय संघादरम्यान मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना सोमवारी अ‍ॅ डलेड येथे होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने यजमान ऑस्ट्रेलियाचा डाव ४९.२ षटकात २६९ धावांवर रोखला आणि विजयास आवश्यक २७० धावा ४६.३ षटकात ७ फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. वॉर्नर (६९ धावा, ६० चेंडू) आणि शॉन मार्श (४३) यांनी दिलेल्या तडाखेबंद शतकी सलामीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली पण, हर्षेल गिब्ज (६४), जॅक कॅलिस (६०), अ‍ॅल्बी मॉर्केल (४०) आणि मार्क बाऊचर (नाबाद ३१) यांच्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचे आव्हान तीन गडी आणि २१ चेंडूंचा खेळ शिल्लक राखत सहज परतवून लावले.

ऑस्ट्रेलिया : शॉन मार्श यष्टिचित बाऊचर गो. बोथा ४३, डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. स्टेन ६९, रिकी पॉन्टिंग झे. गिब्ज गो. बोथा २९, माईक हसी धावचित १२, डेव्हिड हसी त्रि. गो. एनटिनी ३६, ब्रॅड हॅडिन झे. व गो. बोथा ०६, जेम्स होप्स झे. बोथा गो. एनटिनी ३३, मिशेल जॉन्सन त्रि. गो. डय़ुमिनी १०, हॉरित्झ झे. बोथा गो. स्टेन ०७, नॅथन ब्रॅकन नाबाद ०६, शॉन टेट धावचित ००. अवांतर (लेगबाईज ७, वाईड ११) १८. एकूण ४९.२ षटकात सर्वबाद २६९.
बाद क्रम : १-११४, २-१४४, ३-१६५, ४-१७२, ५-१८८, ६-२३९, ७-२५३, ८-२६२, ९-२६७, १०-२६९.
गोलंदाजी : स्टेन ८.२-१-४७-२, एनटिनी ९-०-४६-२, कॅलिस ५-०-३८-०, मॉर्केल ७-०-४७-०, बोथा १०-०-३२-३, डय़ुमिनी १०-०-५२-१.
दक्षिण आफ्रिका : हशिम अमला धावचित १३, हर्षेल गिब्ज झे. माईक हसी गो. जॉन्सन ६४, जॅक कॅलिस झे. हॅडिन गो. टेट ६०, अब्राहम डीव्हिलियर्स झे. माईक हसी गो. ब्रॅकन ०५, जेन पॉल डय़ुमिनी त्रि. गो. हॉरित्झ ०९, निल मॅकेन्झी धावचित २७, मार्क बाऊचर नाबाद ३१, अ‍ॅल्बी मॉर्केल झे. होप्स गो. हॉरित्झ ४०, जे. बोथा नाबाद ०४. अवांतर (बाईज ४, लेगबाईज ३, वाईड ८, नोबॉल २) १७. एकूण ४६.३ षटकात ७ बाद २७०.
बाद क्रम : १-२९, २-१२५, ३-१४०, ४-१६३, ५-१६३, ६-२०९, ७-२६५.
गोलंदाजी : टेट ९.३-०-५५-१, ब्रॅकन ९-२-२९-१, जॉन्सन ९-०-७१-१, होप्स १०-०-४८-०, हॉरित्झ ९-०-६०-२.