Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सतीश पाताडे ठरला ‘स्ट्राँग मॅन’
मुंबई, २३ जानेवारी / क्री. प्र.

ग्रेटर बॉम्बे पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि मुंबई गिरणी कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित

 

केलेल्या मुंबई जिल्हा बेंच प्रेस अजिंक्यपद स्पर्धेत सचिवालय जिमखान्याच्या सतीश पाताडेने ‘स्ट्राँग मॅन’ किताबाचा बहुमान मिळविला. परळच्या सोशल सव्‍‌र्हिस लीगच्या सांघिक विजेतेपद मिळाले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
५६ किलो वजनी गट : १. सतीश पाताडे, २. अशोक सरोदे. ६० किलो वजनी गट : १. सागर धिवार, २. राजेश शिगवन, प्रशांत कवडे. ६७.५ किलो वजनी गट : १. प्रवीण पाटील, २. सचिन मोरे ३. प्रसाद राऊत. ७५ किलो वजनी गट : १. मोहम्मद इनामदार, २. पी. एम. शिवतरकर, ३. जितेंद्र यादव. ८२ किलो वजनी गट : १. प्रेमनाथ कदम, २. सैदल सोंडे, ३. तपन वरळीकर. ९० किलो वजनी गट : १. सुनील अडसुळ; २. जीवन जगदाळे ३. विधेश जाधव. १०० किलो वजनी गट : १. दिलीप नार्वेकर, २. सचिन वंजारे. ३. संतोष शिवतरकर. ११० किलो वजनी गट : १. सूरज देवकुले. १२५ किलो वजनी गट : १. स्वप्निल मोरे. ‘स्ट्राँग मॅन’ किताब- सतीश पाताडे, सांघिक विजेतेपद- सोशल सव्‍‌र्हिस लीग, परळ.