Leading International Marathi News Daily

रविवार , २५ जानेवारी २००९

तिसऱ्या पिढीचा शिलेदार अनिरुद्ध गोसावी
भगवान मंडलिक

संगीत क्षेत्राचा प्रचार, प्रसार करण्याचा वसा घेतलेली गोसावी कुटुंबियांची तिसरी पिढी कल्याणमध्ये सक्रीय आहे. तिसऱ्या पिढीतील साक्षीदार अनिरुद्ध दिलीप गोसावी (२२) यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची संगीत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. संगीत क्षेत्राचा अभ्यास व प्रचारकार्यासाठी अनिरुद्ध यांना दरमहा दोन हजार रुपये दोन वर्षे मिळणार आहेत. अनिरुद्धची आजी मालती गोसावी यांना संस्कृत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शासनाच्या संस्कृत संचालनालयातून कलाकाराचे मानधन मिळते.

कोकण विभागातील सार्वजनिक ग्रंथालयांमधील पुस्तके वेबसाईटवर
प्रतिनिधी

कोकण विभागातील ८५० सार्वजनिक ग्रंथालयांमधील पुस्तकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष विजय बेडेकर यांनी तयार केला आहे. पुढील काळात या संकेतस्थळावर कोकण विभागातील ग्रंथालयांमधील सुमारे २५ लाख पुस्तके उपलब्ध करून देण्याचा बेडेकर यांचा मानस आहे. या वेबसाइटवर जाण्याचा पहिला मान डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाला मिळाला आहे.

वसुधा खरे
सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम्।

वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम्।।

सुखकर्ता दु:खहर्ता श्रीगणेश मंगलाचा उदय करतो. रणांगणावर अखंड विजय मिळविणारा सैन्यधुरंधर अशीच श्रीगणेशाची प्रतिमा. संकटात सापडलेल्या त्रिभुवनास दैत्यांच्या त्रासातून मुक्त करणे हेच आपले जीवनकार्य श्रीगणेशाने अनेक अवतारात मानले. श्रीगणेशाचे रणकौशल्य, दूरदृष्टी, लोकनेतृत्व, साहित्यप्रीती, कलाकौशल्याची आवड या गुणांचा आदर्श ठेवायलाच हवा. शत्रूचे सामथ्र्य ओळखून बुद्धिचातुर्याने वापरलेली रणनीती आदर्शच. आज श्रीगणेशाच्या वीरत्वाचे स्मरण करू.
रुश्यप ऋषींनी श्रीविष्णूंच्या आज्ञेने जीवसृष्टी निर्माण केली. लोकांच्या उद्धारासाठी देव आणि ऋषींनी मिळून अनेक तीर्थक्षेत्रे निर्माण केली. श्रीशंकरांनी वाराणसी क्षेत्र तात्काळ मुक्ती मिळण्यासाठी निर्माण केले. भगवान शंकर प्रलयकाली आपल्या त्रिशुलावर वाराणसी धारण करून तिचे रक्षण करीत असत. अशा या पवित्र काशी-वाराणसीवर दुष्ट दुरासदाची अमंगल दृष्टी पडली.

दुर्बिणीच्या शोधाची कथा
१६०९ मध्ये गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला. त्याला सन २००९ मध्ये ४०० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने \International Astronomical Union आणि \UNESCO ने सन २००९ हे ‘आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष २००९’ म्हणून संपूर्ण जगभर साजरे करावयाचे ठरविलेले आहे. ठाणे शाखेने यानिमित्त रविवारी ११ जानेवारी रोजी गडकरी रंगायतनमध्ये ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर आणि खगोलतज्ज्ञ प्रा. मोहन आपटे यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. दोन सत्रात पार पडणाऱ्या या कार्यक्रमात खगोलविषयक माहितीपटही दाखविले जाणार आहेत. सकाळी सव्वा आठ ते दुपारी तीन यावेळेत दोन सत्रात हा कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्रवेश मिळेल. यानिमित्त खगोल विज्ञानातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आढावा घेणारा हा लेख..

ठाण्यातील प्रकल्पांच्या सदोष आराखडय़ांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार
दोन्ही कांग्रेसकडून चौकशी समितीची मागणी
ठाणे/प्रतिनिधी

कुचकामी प्रशासन आणि कलंकित सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीच्या संगनमताने कोटय़वधी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये वाढीव खर्चाच्या नावाखाली करोडो रुपयांचा भ्रष्टाचार बोकाळला असून तांत्रिक सल्लागारांनी तयार केलेल्या प्रकल्पांच्या चुकीच्या आराखडय़ांविरोधात ठाण्यातील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र आले असून त्यांनी या प्रकल्पांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

ओबामांचा शपथविधी आणि मोबाइल फोन कंपन्यांची तारांबळ
डॉ. प्र. ज. जोगळेकर

२० जानेवारीला अमेरिकेत ओबामांचा शपथविधी झाला, त्यावेळी जमलेल्या २० लाख लोकांना मोबाइल फोन सेवा अबाधितपणे मिळावी यासाठी त्या कंपन्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु तरीही आपली यंत्रणा पुरी पडू शकेल की नाही, याबद्दल त्या धास्तावलेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी चक्क त्यांच्या ग्राहकांना अशी विनंती केली होती की, फोनचा वापर मर्यादित करा आणि फोटो पाठविण्याची घाई करू नका.

वासिंदच्या सरस्वती विद्यालयात अशोक पत्कींचा कार्यक्रम
शहापूर/वार्ताहर

वासिंदच्या विद्या विकास मंडळाच्या सरस्वती विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की व कवी अरुण म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. वासिंदच्या सरस्वती विद्यालयात २६ जानेवारी रोजी सकाळी मार्च २००८ च्या शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या सम्राट चौधरी या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा होणार आहे. त्यानंतर संस्थेचे चेअरमन रंगनाथ काठोळे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक पारितोषिक वितरणचा समारंभ होणार आहे. या समारंभानंतर प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांचा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अरुण म्हात्रे हे पत्कींची मुलाखत घेणार आहेत. पत्की यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गायिका मधुरा भावे सादर करतील. किन्हवलीच्या डी. एड. कॉलेजचा १०० टक्के निकाल
शहापूर/वार्ताहर
सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या शिक्षणशास्त्र अध्यापक पदविका परीक्षेचा निकाल लागला असून, किन्हवली येथील सावित्रीबाई फुले अध्यापक (डी. एड.) विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.डी. एड. कॉलेजच्या प्रथम वर्षांचा १०० टक्के निकाल लागला असून मनीषा विशे ही ८४.१० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. स्नेहलता गावडे (८२.८० टक्के) द्वितीय, तर नयना निमसे (८२.१० टक्के) तृतीय आली आहे. द्वितीय वर्षांचा ९८ टक्के निकाल लागला आहे. जयभामे या विद्यार्थिनीला ८४.२५ टक्के गुण मिळून ती पहिली आली आहे. कीर्ती घोलप (८३.६०) द्वितीय, तर मोनिका पाटील (८३.१०) तृतीय आली आहे.

केंद्रीय शाळांमध्येही होणार मराठी सक्तीचे
ठाणे/प्रतिनिधी : राज्यातील आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात येईल आणि त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी काल शिक्षणमंत्री कदम यांची भेट घेतली. राज्यात आयसीएससी, सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करावा, अशी मागणी त्यांनी केली. तेव्हा कदम यांनी हे आश्वासन दिले.त्याचप्रमाणे केंद्रीय बोर्डांच्या अभ्यासक्रमातील गुणांची तफावतीमध्ये तोडगा निघेपर्यंत पर्सेटाईल सूत्राचे कठोर पालन व्हावे, या वादात दिल्ली आणि एसएससी बोर्ड असा रंग देण्याऐवजी सर्वच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करावा, परंतु एसएससी बोर्डाचा प्राधान्याने विचार व्हावा आणि केंद्रीय बोर्डाच्या शाळेचेही स्वतंत्र महाविद्यालये असावीत आदी मागण्या यावेळी डावखरे यांनी केल्या. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.