Leading International Marathi News Daily                                सोमवार , २६ जानेवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

अग्रलेख

शेतीवाडी

लाल किल्ला

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांतनिवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांचे बळी गेले. भारताचा आत्मविश्वास डळमळीत करण्याच्या उद्देशाने सुनियोजितपणे दहशतवादी हल्ले केले जात असून, मुंबईवरील हल्ला हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. या हल्ल्यांविरोधात देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. मात्र दहशतवाद्यांना अपेक्षित असलेली प्रतिक्रिया उमटली नाही. साऱ्या देशाने एकमुखाने या दहशतवादी कारवायांचा तीव्र निषेध केला.
-राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

पद्म पुरस्कार जाहीर
काकोडकर, नायर यांना पद्मविभूषण
नवी दिल्ली, २५ जानेवारी/खास प्रतिनिधी

इंडियन एक्सप्रेस समुहाचे मुख्य संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांना पत्रकारितेतील भरीव योगदानासाठी आज पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, भारताच्या चांद्रयान मोहीमेचे शिल्पकार, भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष जी. माधवन नायर, चिपको आंदोलनाचे जनक पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा, सिस्टर निर्मला यांना पद्मविभूषण पुरस्कार, तर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव िबद्रा, ज्येष्ठ सहकार नेते डॉ. नागनाथ नायकवाडी, जुन्या पिढीतील प्रसिद्ध गझल गायिका शमशाद बेगम यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, फिरकी गोलंदाज हरभजन सिंह, पंडित ह्रदयनाथ मंगेशकर, भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण बापू माने, चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, अभिनेता अक्षयकुमार, पाश्र्वगायक कुमार सानू, उदित नारायण आणि पीनाझ मसानी, स्नकूरचा विश्वविजेता पंकज अडवाणी, हॉकीपटू बलबीरसिंग खुल्लर यांना पद्मश्री जाहीर करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज २००९ सालासाठी १० पद्मविभूषण, ३० पद्मभूषण आणि ९३ पद्मश्री असे एकूण १३३ पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात महाराष्ट्राच्या वाटय़ाला तीन पद्मविभूषण, तीन पद्मभूषण आणि १४ पद्मश्री पुरस्कार आले आहेत. डॉ. अनिल काकोडकर यांच्याव्यतिरिक्त डॉ. चंद्रिका प्रसाद श्रीवास्तव यांना प्रशासकीय सेवेतील योगदानासाठी तर डॉ. ए. एस. गांगुली यांना उद्योग क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

शिंदे, चित्ते, पवार, जाधव यांना कीर्तीचक्र
मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील १० शहीदांना अशोक व कीर्तीचक्र
करकरे, कामटे, साळस्कर, ओंबळे, उन्नीकृष्णन, गजेंद्र सिंह यांना अशोक चक्र
नवी दिल्ली, २५ जानेवारी/खास प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज जाहीर करण्यात आलेल्या विविध शौर्य सन्मानांमध्ये मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेल्या १० जणांचा समावेश आहे. हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळे, संदीप उन्नीकृष्णन आणि गजेंद्र सिंह बिश्त यांना सर्वोच्च अशा अशोक चक्र सन्मानाने तर शशांक शिंदे, अरुण चित्ते, अंबादास पवार आणि मुकेश जाधव यांना कीर्तीचक्र सन्मानाने मरणोत्तर गौरविण्यात येईल. (जरा आँख में भरलो)

नोएडातील चकमकीत दोन दहशतवादी ठार
नोएडा, २५ जानेवारी/पीटीआय

गाझियाबादमधून दिल्लीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेले दोन पाकिस्तानी दहशतवादी रविवारी पहाटे नोएडा येथे झालेल्या चकमकीत ठार झाले असून, या कारवाईत उत्तर प्रदेश एटीएसचा एक कॉन्स्टेबल जखमी झाला. प्रजासत्ताकदिनाच्या पाश्र्वभूमीवर ही चकमक झाली असून, दोन दहशतवादी मारले गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आज पहाटे २.३५ वाजता नोएडातील सेक्टर ९७ मध्ये युनिटेक प्लॉटनजीक ही चकमक झाली. हे दहशतवादी पांढऱ्या रंगाच्या मारुती मोटारीतून आले होते व त्यांनी एटीएस पथकावर गोळीबार केला.

चालकाला डुलकी लागल्याने अपघात; एक ठार, २१ जखमी
मुंबई, २५ जानेवारी / प्रतिनिधी
रात्री उशिरा ‘ऑल्टो गाडी’ने घरी परतताना डुलकी लागल्याने गाडीच्या चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात एस.टी. स्टँडवरील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर २१ प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शनिवारी रात्री शीव येथील जैन सोसायटीजवळील एस. टी. स्टँडवर घडली. याप्रकरणी गाडीचा चालक कुणाल रामगोपाल नंदा (२६) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल आणि त्याच्या कुटुंबियांविषयी पोलिसांकडून काहीच माहिती दिली जात नसल्याने हे प्रकरण पोलीस दडपत असल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधानांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा
नवी दिल्ली २५ जानेवारी/पीटीआय

हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. त्यांचा व्हेन्टिलेटर काढण्यात आला असून त्यांना द्रव स्वरूपात अन्न देण्यात येत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. पंतप्रधान सिंग यांच्यावर काल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे एशियन हार्ट इन्स्टिटय़ूट या संस्थेचे डॉक्टर रमाकांत पांडा यांनी सांगितले की, पंतप्रधान आता शुद्धीवर आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. ते आज त्यांच्या कुटुंबीयांना भेटले तसेच डॉक्टरांचेही त्यांनी अभिनंदन केले. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्याने त्यांचा व्हेन्टिलेटर काढण्यात आला असून ते नैसर्गिक श्वासोच्छवास करीत आहेत. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. रात्रभर त्यांच्याजवळ बसून देखरेख करणारे डॉ. विजय डिसिल्व्हा यांनी सांगितले की, सिंग यांना आज सकाळपासून द्रव स्वरूपातील अन्न देण्यास सुरूवात करण्यात आली. ते डॉक्टरांशी व्यवस्थित बोलू लागले आहेत. पंतप्रधान डॉक्टरांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही ज्या पद्धतीने माझी काळजी घेतलीत तशीच काळजी इतर लोकांचीही घेत जा.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८