Leading International Marathi News Daily

बुधवार, २८ जानेवारी २००९

चतुरंग प्रतिष्ठानची सवाई एकांकिका स्पर्धा ही आता तरुण, होतकरू नाटय़कर्मीसाठी जणू पंढरीची वारी बनली आहे. इथं जर आपण खरे उतरलो, तर आपल्यात काहीएक क्षमता आहेत हे आपोआपच सिद्ध होतं, अशी त्यांची धारणा असते. आणि ती रास्तच आहे. अर्थात त्याकरिता संवेदनशील वृत्तीच्या, वर्तमान नाटय़प्रवाहांचं भान अन् जाण असलेल्या, तसंच सादरीकरणांतील सकस-निकसता ठरविण्याचे ठोस निकष लावणाऱ्या सुजाण परीक्षकांची जोडही स्पर्धेला मिळणं तितकंच गरजेचं असतं. यंदाच्या ‘सवाई’त हा योग छान जुळून आल्याचं दिसलं. त्याचं प्रतिबिंब निकालातही उमटलं. साधारणत: तगडा परफॉर्मन्स, चपखल गिमिक्स आणि नेत्रदीपक तांत्रिक करामती यांच्या जोरावर स्पर्धा मारून नेण्याचं तंत्र (हमखास यश!) अनेक स्पर्धकांनी हल्ली कमावलं आहे. भली भली परीक्षक मंडळी त्याला भापतात. या फॉम्र्युल्यानं नामवंत परीक्षकांनाही आपण उल्लू बनवू शकतो, हे ध्यानी आल्याने बनचुके झालेले काही स्पर्धक मग त्याच त्या क्लृप्त्या वापरून यशाची शिखरं पुढं चढत राहतात.

बंगलोरच्या बहुभाषिक एकांकिका स्पर्धेत प्रेक्षकांवर गारूड करणारी एक एकांकिका होती सायन्स फिक्शनवर आधारित.. ‘अभिनय, कल्याण’ची ‘एनिग्मा!’ ‘यूएफओ’ आणि ‘धुमकेतू’ हा आजवर मराठी रंगभूमीवर न हाताळलेला विषय या एकांकिकेत सोप्या आणि सहज सादरीकरणातून हाताळला होता दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव या तरुण दिग्दर्शकाने! त्यानेच केलेली संजू ही व्यक्तिरेखा, सहज त्स्फूर्त अभिनयाने प्रेक्षक आणि परीक्षकांची मने जिंकून गेली. त्याचबरोबर सवरेत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही त्याने पटकावला. लहानपणापासूनच त्याला नाटकाची आवड असली तरी आई-वडिलांच्या सल्ल्यानुसार पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्याने एकांकिका स्पर्धा आणि राज्य नाटय़स्पर्धेत सहभाग घेतला. नाटय़शास्त्रचं सर्वागीण आकलन व्हावं यासाठी नेहरू सेंटर (मुंबई) आणि एनएसडी (दिल्ली) यांच्या सहयोगाने आयोजित नाटय़कलेचा पदविका अभ्यासक्रम त्याने केला. प्रा. वामन केंद्रे, प्रा. जयदेव हट्टंगडी, देवद्रराज अंकुर, रामचंद्र शेळके, एल. एच. काझी यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले.

डेस्कटॉप कॉम्प्युटरची पुढची आवृत्ती म्हणजे लॅपटॉप. गेल्या काही वर्षांमध्ये लॅपटॉपने डेस्कटॉपच्या मार्केटवर मोठय़ा प्रमाणावर परिणाम केला. पण आता अशीच वेळ लॅपटॉपवर येऊन ठेपली आहे. कारण आता लॅपटॉपची पुढची आवृत्ती बाजारात आली आहे. या आवृत्तीला ‘नेटबुक’ म्हणून ओळखले जाते. कॉम्प्युटर मार्केटमध्ये २००९ या वर्षांत ‘नेटबुक’चे वर्चस्व राहणार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ‘नेटबुक’ आयपॉड, आयफोनसारख्या अनेक नवीन तंत्रज्ञानांना आव्हान देणारे उत्पादन असल्याचे मानले जात आहे. हलक्या वजनाचा, सामान्यांच्या खिशाला परवडणारा आणि पर्यावरणचा मित्र मानला गेलेला हा ‘नेटबुक’ सर्वाच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. २००८ च्या अखेरीस बाजारात आलेल्या ‘नेटबूक’ने अल्पावधीतच विक्रीचे अनेक विक्रम मोडले. तरुणांचे विशेष आकर्षण ठरलेला ‘नेटबुक’ मुख्यत: इंटरनेट अॅक्सेसवर अवलंबून आहे. ‘नेटबुक’चे हार्डवेअर आजपर्यंतच्या लॅपटॉपस्मध्ये देण्यात आलेल्या हार्डवेअरपेक्षा थोडे हटके आहे.