Leading International Marathi News Daily
 


बुधवार, २८ जानेवारी २००९
  नव्या युगातील खेळी
  डिझाइन क्षेत्रातील आकर्षक संधी
  चला सिम्युलेशन्सद्वारे शिकूया
  श्रीमती आगाथा हॅरिसन मेमोरियल फेलोशिप
  परदेशातील शिक्षणासाठी बँकांचे कर्ज
  उपसमस्यांचे निश्चितीकरण
  अलाहाबाद बँक लिपिकपदाची तयारी
  अ‍ॅग्रोटुरिझम
  मी निवडलेल्या क्षेत्रात..
  विकासकाचे अनोखे करिअर..
  पर्यटन क्षेत्रातील करिअर प्रवास

 

मला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, अहमदाबाद येथील पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिझाइन या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी विस्तृत माहिती द्यावी.
- पंकज गोडसे.

डिझायनिंग विषयातील शिक्षण संशोधन, प्रशिक्षण यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संस्था म्हणजे अहमदाबाद येथील ‘नॅशनल इन्स्टिय़ूट ऑफ डिझाइन (एन.आय.डी.) भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून १९६१ ला संस्थेची स्थापना करण्यात आली. एन. आय. डी. मध्ये चार वर्षांचा ‘ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिझाइन’ बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतो. यासाठी एकूण ६० जागा आहेत.
पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन डिझाइन
एन. आय. डी.मध्ये एकूण १५ प्रकारचे पदव्युत्तर डिझाइन अभ्यासक्रम (पी.जी.डी.पी.डी.) शिकवले जातात. यांचा कालावधी दोन ते अडीच वर्षांचा असतो. या अभ्यासक्रमांची नावे व शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे-

 

१) इंडस्ट्रियल डिझाइन-
प्रॉडक्ट डिझाइन- पात्रता- बी. ई. (मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स), बी. टेक् . बी. आर्च. फर्निचर अ‍ॅण्ड इंटीरिअर डिझाइन- पात्रता- बी. टेक् . बी. ई. (सिव्हिल), बी. आर्च. (इंटीरिअर डिझाइन)
सिरॅमिक अ‍ॅण्ड ग्लास डिझाइन- (जागा १०)
पात्रता- बी. आर्च. बी. एफ. ए. (सिरॅमिक अ‍ॅण्ड ग्लास डिझाइन/ टेक्नोलॉजी, संबंधित विषयातील पदवीधर)
टॉय डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट)- (जागा- १०)
पात्रता- बी. ई. , बी. आर्च. बी. सी.ए., बी. आय. टी., बी. टेक् . इंटीरिअर डिझाइन, बी. एफ. ए., अप्लाईड आर्ट, चाईल्ड डेव्हलपमेंट किंवा संबंधित विषयांतील पदवीधर.
ट्रान्स्पोर्टेशन अ‍ॅण्ड ऑटोमोबाईल डिझाइन- (जागा १०)
पात्रता- बी. टेक्., बी. ई. (ऑटोमोबाईल्स/ मेकॅनिकल/ मेकॅट्रॉनिक्स). बी. आर्च. ई.
२) टेक्स्टाईल अ‍ॅण्ड अ‍ॅपरल डिझाइन-
टेक्स्टाईल डिझाइन (जागा १०)
पात्रता- बी. एफ. ए. (अप्लाईड आर्ट किंवा टेक्स्टाईल), हँडलूम टेक्नोलॉजी, निटवेअर, फॅशन डिझाइन, होम सायन्स विथ टेक्स्टाईल अँड क्लोदिंग
अ‍ॅपरल डिझाइन अँड मर्कन्डायझिंग-
(जागा- १५) पात्रता- बी. एफ. ए., अप्लाईड आर्ट, निटवेअर/ फॅशन डिझाइन/ टेक्स्टाईल डिझाइन, मर्कन्डायझिंग पदवीधर.
लाइफस्टाईल अ‍ॅक्सेसरी डिझाइन - (जागा १०)
पात्रता- बी. एफ. ए., अप्लाईड आर्ट, बी. आर्च., इंटीरिअर डिझाइन. अ‍ॅक्सेसरी डिझाइन, इंजिनीअरिंग/ टेक्नोलॉजीमधील संबंधित विषय पदवीधर.
३) कम्युनिकेशन डिझाइन-
ग्राफिक डिझाइन- (जागा- १०)
पात्रता- बी. एफ. ए., अप्लाईड आर्टस्, बी. आर्च. इंटी. डिझाइन, ग्राफिक डिझाइन पदवीधर.
अ‍ॅनिमेशन फिल्म डिझाइन- (जागा- १०)
पात्रता- बी. एफ. ए., (अप्लाईड आर्ट, डिझाइन, बी. आर्च. अ‍ॅनिमेशन इंडस्ट्रीतील अनुभवी पदवीधर, मास मीडिया पदवीधर.
फिल्म अँड व्हीडीओ कम्युनिकेशन- (जागा १०)
पात्रता- कलाशाखा, आर्ट, मास मीडिया, इ. तील पदवीधर.
४) आय. टी. इंटिग्रेटेड डिझाइन.
न्यू मीडिया डिझाइन- (जागा १०)
पात्रता- बी. एफ. ए., बी. टेक्., बी. आर्च. बी. एस्सी. (संगणकशास्त्र)
बी. सी.ए. सॉफ्टवेअर अँड युजर इंटरफेस डिझाइन (जागा १०)
पात्रता- बी. ई. (संगणकशास्त्र), बी. आर्च. बी. एफ. ए., बी. टेक्. (इलेक्ट्रॉनिक्स), बॅचलर इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बी. सी. ए. , बी. एस्सी. (संगणकशास्त्र), अप्लाईड सायकॉलॉजी पदवीधर.
इन्फर्मेशन अँड डिजिटल डिझाइन- (जागा १०)
पात्रता- बी. टेक् . बी. आय. टी., बी. ई. (संगणकशास्त्र), बी. आर्च., बी. एफ. ए. (पेंटिंग, व्हिज्युअल कम्युनिकेशन), बी. एस्सी. (संगणकर, गणित, संख्याशास्त्र), मास मीडिया, कॉग्निटिव्ह मानसशास्त्र पदवीधर.
५) डिझाइन मॅनेजमेंट- (जागा २०)
पात्रता- फाईन आर्ट, कलाशाखा, विधान पदवीधर, इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी पदवीधर व किमान २ वर्षांचा डिझाइन क्षेत्रातील अनुभव.
अन्य पात्रता- संबंधित विषयातून विशेष संस्थांमधून पदविका मिळवलेल्या उमेदवारांचाही विचार प्रवेशासाठी केला जाईल. वयोमर्यादा- खुल्या प्रवर्गासाठी अधिकतम वय २७ वर्षे तर अनुसूचित जाती/ जमातींसाठी ३० वर्षे आहे. मात्र संबंधित क्षेत्रात अनुभव असलेल्यांना वयाची सवलत देण्याचा अधिकार संस्थेला आहे. (जास्तीत जास्त तीन वर्षे) एका उमेदवाराला जास्तीत जास्त दोन अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची मुभा आहे.
प्रवेशप्रक्रिया- सर्व अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी संस्थेद्वारा प्रवेश परीक्षा घेण्यात येते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात याविषयी जाहिरात प्रमुख वर्तमानपत्रांतन प्रसिद्ध केली जाते. ऑक्टोबर महिन्यात अर्ज करायचे असतात तर जानेवारीमध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अहमदाबादला स्टुडिओ टेस्ट व मुलाखतीसाठी एप्रिल महिन्यात बोलावले जाते. प्रवेश परीक्षेत डिझाइन अ‍ॅप्टिटय़ूड तपासणारे प्रश्न असतात. यात पोस्टर तयार करणे, त्रिमितीय चित्र काढणे, वस्तुचित्र काढणे असे प्रश्न असतात. स्टुडिओ टेस्ट व मुलाखतीतही डिझाइनचे आव्हानात्मक करिअर पेलण्यास विद्यार्थी कितपत योग्य आहे याची चाचपणी केली जाते.
फी- सध्याच्या फी रचनेनुसार दरवर्षी एक लाख दहा हजार ते सव्वा लाख एवढा खर्च (हॉस्टेल, मेससहित) प्रत्येक विद्यार्थ्यांला येतो. अर्थात संस्थेत फी सवलत, स्कॉलरशिप्सच्या योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना घेता येतो.
संपर्कासाठी संस्थेचा पत्ता- एन. आय. डी., पालदी, अहमदाबाद- ३८०००७, दूरध्वनी क्र. ०७९-२६६२३६९२. वेबसाईट- www.nid.edu.

मी अकरावीत शिकत असून मला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, पुणे येथे उपलब्ध अभ्यासक्रम व आवश्यक पात्रता यांची विस्तृत माहिती द्यावी.
-दीपाली सुतार.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, पुणे या संस्थेत संबंधित क्षेत्रातील अनेक पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवले जातात.
पदविका- (डिप्लोमा) अभ्यासक्रम-
१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिरेक्शन-
पात्रता- पदवी, जागा-१२, कालावधी-तीन वर्षे.
२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सिनेमॅटोग्राफी-
पात्रता- पदवी, जागा- १२, कालावधी- तीन वर्षे.
३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑडिओग्राफी-
पात्रता- पदवी व बारावीला भौतिकशास्त्र विषय असणे अनिवार्य, जागा- १२, कालावधी- तीन वर्षे.
४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एडिटिंग-
पात्रता- पदवी, जागा- १२, कालावधी-तीन वर्षे.
५) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅक्टिंग-
पात्रता- पदवी, जागा- २०, कालावधी- दोन वर्षे.
६) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आर्ट डिरेक्शन-
पात्रता- पदवी किंवा आर्किटेक्चर, पेंटिंग, अप्लाईड आर्ट, स्कल्प्चर, इंटिरिअर डिझाइन इ. विषयांतील समकक्ष पदविका. जागा- १२.
प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सर्टिफिकेट कोर्सेस)
१) सर्टिफिकेट कोर्स इन अ‍ॅनिमेशन अँड कॉम्प्युटर ग्राफिक्स-
पात्रता- बारावी, आर्ट कॉलेजमधून पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांना प्राधान्य, जागा-१२, कालावधी- दीड वर्षे.
२) सर्टिफिकेट कोर्स इन फिल्म स्क्रीनप्ले रायटिंग-
पात्रता- पदवी, जागा- १२, कालावधी- एक वर्ष.
३) सर्टिफिकेट कोर्स इन (टी.व्ही.) डिरेक्शन-
पात्रता- पदवी, जागा- आठ, कालावधी- एक वर्ष.
४) सर्टिफिकेट कोर्स इन इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफी (टी.व्ही.)
पात्रता- पदवी, जागा- आठ, कालावधी- एक वर्ष.
५) सर्टिफिकेट कोर्स इन व्हीडीओ एडिटिंग (टीव्ही)
पात्रता-पदवी, जागा- आठ, कालावधी- एक वर्ष.
६) सर्टिफिकेट कोर्स इन ऑडिओग्राफी अँड टीव्ही इंजिनीअरिंग
पात्रता-पदवी, बारावीला भौतिक विषय असणे अनिवार्य, जागा- आठ, कालावधी- एक वर्ष.
याशिवाय अल्प मुदतीचे विविध अभ्यासक्रमही संस्था चालवते त्याविषयी माहिती संस्थेच्या वेबसाइटवर तसेच वर्तमानपत्रांतून मिळू शकते. प्रत्येक पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील दोन जागा परदेशी/ एन. आर. आय. विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तसेच अनुसूचित जाती/ जमातींसाठी नियमानुसार आरक्षण आहे. प्रवेश प्रक्रिया- सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. मार्चमध्ये अर्ज मिळतात व ते एप्रिलमध्ये भरायचे असतात. मे/ जूनमध्ये प्रवेश परीक्षा होते व त्यानंतर निवडक विद्यार्थ्यांना पुण्याला मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. अधिक माहितीसाठी संस्थेचा पत्ता- एफ. टी. आय. आय., लॉ कॉलेज मार्ग, पुणे- ४११००४. दूरध्वनी क्र. ०२०-२५४२५६५६, ०२०-२५४३१८१७/ २५४३००१७, विस्तारित क्र. २२३, वेबसाइट- www.ftiindia.com
आनंद मापुस्कर
फोन : ०२२-३२५०८४८७.