Leading International Marathi News Daily
 


बुधवार, २८ जानेवारी २००९
  नव्या युगातील खेळी
  डिझाइन क्षेत्रातील आकर्षक संधी
  चला सिम्युलेशन्सद्वारे शिकूया
  श्रीमती आगाथा हॅरिसन मेमोरियल फेलोशिप
  परदेशातील शिक्षणासाठी बँकांचे कर्ज
  उपसमस्यांचे निश्चितीकरण
  अलाहाबाद बँक लिपिकपदाची तयारी
  अ‍ॅग्रोटुरिझम
  मी निवडलेल्या क्षेत्रात..
  विकासकाचे अनोखे करिअर..
  पर्यटन क्षेत्रातील करिअर प्रवास

 

भारतीय नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक १७ लाख रुपयांची बहाल केली जाणारी ही फेलोशिप आहे. भारत सरकारने ब्रिटनच्या सेंट अ‍ॅन्टोनीज् कॉलेज, ऑक्सफर्ड येथे सुरू केलेली ही एकमेव अभ्यासवृत्ती (फेलोशिप) योजना आहे. या योजनेचे श्रीमती आगाथा हॅरिसन मेमोरियल फेलोशिप असे नामाभिधान करण्यात आले आहे. प्रथमत: केवळ एक वर्ष कालावधीसाठी असलेली ही अभ्यासवृत्ती, उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारे आणखी एका वर्षांसाठी वाढविता येते.
आधुनिक भारतीय इतिहास, अर्थशास्त्र आणि राज्य शास्त्र या विषयात रस असलेल्या गुणवान विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासवृत्ती बहाल केली जाते. उमेदवाराची शैक्षणिक कारकीर्द मात्र गुणात्मक म्हणजे पदव्युत्तर पदवी परीक्षेपर्यंतच्या प्रत्येक महत्त्वाच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण असायला हवेत. शिवाय पीएच्.डी. डिग्रीचा विषय हा वरील विषयानुषंगिक किंवा तत्सम गुणवत्तेचे आणि असामान्य मान्यता मिळालेले त्याचे प्रकाशित साहित्य असायला हवे. ज्या ठिकाणी फक्त श्रेणी बहाल केली जाते, अशा विद्यार्थ्यांना त्या श्रेणीनिहाय नेमके गुणांक आणि हा रूपांतरणाचा (कन्व्हर्जन) नेमका फॉम्र्युला सांगावा लागेल. फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ही अभ्यासवृत्ती तरुण
 
बुद्धिमंतांसाठी आणि शिक्षणक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी असल्याचे लक्षात घ्यावे. लाभार्थी उमेदवाराला मिळणारा दर्जा हा ऑक्सफर्ड विद्यापीठातील ‘ज्युनियर रिसर्च फेलो’चा असल्याचे लक्षात ठेवावे.
उमेदवाराकडे पीएच्.डी. पूर्ण केल्यानंतर, पदवी/पदव्युत्तर स्तरावर अध्यापनाचा १३ फेब्रुवारी २००९ रोजी किमान तीन वर्षांचा अनुभव असायला हवा.
उमेदवाराच्या वयाचा दाखला, शैक्षणिक पात्रता दाखविणाऱ्या गुणपत्रिका, त्याचप्रमाणे अनुभवाचे मालकांकडून प्राप्त प्रमाणपत्र वगैरे सर्व अर्जासोबत जोडावयाच्या आवश्यक दस्तऐवजांच्या नक्कल प्रती या साक्षांकित केल्या गेल्या पाहिजेत. उमेदवाराचे अलीकडेच काढलेले पासपोर्ट आकाराचे एक छायाचित्र त्यावर स्वाक्षरी करून अर्जावर चिकटविला पाहिजे. अभ्यास अथवा संशोधनासंबंधी संक्षिप्त (किमान ३०० शब्दांमधील) पूर्वपिठिका उमेदवाराने सुस्पष्टपणे मांडली पाहिजे, जेणेकरून ब्रिटनमध्ये त्या संबंधाने सविस्तर अभ्यास/संशोधन केले जाऊ शकेल याचे समर्थन होईल.
यापूर्वी विदेशात सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ जर उमेदवार शिक्षण, प्रशिक्षण किंवा स्पेशलायझेशनच्या उद्देशाने शिष्यवृत्ती मिळवून किंवा स्व-खर्चाने गेला असेल तरी तो या फेलोशिपला अर्ज करण्यास पात्र ठरू शकेल. मात्र विदेशातून परतल्यावर तो
किमान सलग तीन वर्षे भारतात वास्तव्यास असायला हवा. भारताबाहेर वास्तव्य असलेल्या कोणासही या फेलोशिपसाठी अर्ज करता येणार नाही.
फेलोशिपच्या लाभार्थीना वार्षिक १७ लाख रुपये बहाल केले जातील. या रकमेपैकी बहुतांश रक्कम विद्यावेतन म्हणून तर उर्वरित रक्कम ही प्रवास भत्ता, जेवण भत्ता व अन्य प्रशासकीय खर्च म्हणून आहे. या व्यतिरिक्त उमेदवाराला इकॉनॉमी श्रेणीचा येण्या-जाण्याचा विमान प्रवास खर्च प्रदान केला जाईल. लाभार्थी उमेदवाराच्या केवळ पती/पत्नीला इकॉनॉमी श्रेणीचा येण्या-जाण्याचा विमान प्रवास खर्चही मिळू शकेल, मात्र त्याने/तिने लाभार्थीसोबत ब्रिटनमध्ये सलग एक वर्षांसाठी वास्तव्य करावयास हवे. (फेलोशिपची रक्कम मात्र एकटय़ा लाभार्थीच्या राहणीमानाला पुरेल इतकीच मर्यादित असल्याने लाभार्थीच्या जोडीदाराच्या राहणीमानासाठी येणाऱ्या खर्चाची तजवीज लाभार्थीलाच करावी लागेल.)
वयोमर्यादा: लाभार्थीचे वय हे ३० ते ४० वर्षे या दरम्यान असावे.
अर्जाची शेवटची तारीख: १३ फेब्रुवारी २००९
संपर्क पत्ता: कक्ष अधिकारी (ईएस-४ विभाग), उच्च शिक्षण विभाग, मनुष्यबळ विकास मंत्रालय, ए-२/डब्ल्यू-४, कर्झन रोड बरॅक्स, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली- ११०००१.
चंद्रगुप्त अमृतकर
globalfeatures@lycos.com