Leading International Marathi News Daily
 


बुधवार, २८ जानेवारी २००९
  नव्या युगातील खेळी
  डिझाइन क्षेत्रातील आकर्षक संधी
  चला सिम्युलेशन्सद्वारे शिकूया
  श्रीमती आगाथा हॅरिसन मेमोरियल फेलोशिप
  परदेशातील शिक्षणासाठी बँकांचे कर्ज
  उपसमस्यांचे निश्चितीकरण
  अलाहाबाद बँक लिपिकपदाची तयारी
  अ‍ॅग्रोटुरिझम
  मी निवडलेल्या क्षेत्रात..
  विकासकाचे अनोखे करिअर..
  पर्यटन क्षेत्रातील करिअर प्रवास

 

प्रत्येक कर्जासाठी मालमत्ता किंवा मिळकत तारण म्हणून लागेल. चार लाखांपर्यंतच्या कर्जासाठी बँका तारण किंवा जामीनदार मागत नाहीत. चार ते ७.५ लाखांच्या कर्जासाठी बँक प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र विचार करून मालमत्ता गहाण न ठेवता कर्ज देऊ शकते. पण अशा प्रकरणात जामीनदार मात्र लागेलच. ७.५ लाखांवर मात्र बँक मान्य करील अशी काही मालमत्ता गहाण ठेवावीच लागेल.
बोझा नसलेले घर, बँकेतील मुदत ठेवी, शेअर्स, पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूकयोजना अशा प्रकारची मालमत्ता या शिक्षणासाठीच्या कर्जाकरिता बँकेकडे गहाण ठेवता येईल. ही नावे नमुन्यादाखल दिलेली आहेत, आणखी काही प्रकारची मालमत्ताही गहाण ठेवली जाऊ शकते. मात्र बँका, औद्योगिक प्लॉट किंवा शेतजमीन यांचा तारण म्हणून स्वीकार करत नाहीत. काही सहकारी बँका सोनेसुद्धा तारण म्हणून स्वीकारतात.
व्याजदर : शैक्षणिक कर्जासाठी बँका १०.५ टक्के ते १२.५ टक्के इतके व्याज आकारतात.
अधिस्थगन काळ : कोर्स पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष किंवा नोकरी मिळाल्यानंतर सहा महिने (जे काही असेल ते) इतका काळ बँक कर्जाची वसुली स्थगित ठेवते. या काळात विद्यार्थ्यांला फक्त व्याजाची रक्कम चुकती करावी लागते. बहुतेक राष्ट्रीयीकृत बँकांबाबतीत व्याज व मूळ कर्जाची परतफेड या अधिस्थगन काळानंतरच सुरू करायची असते.
कर्ज परत फेडण्याची मुदत : शिक्षणासाठीचे कर्ज हे विद्यार्थ्यांच्या नावे दिले जाते व आई-वडील/ पालक/ पती किंवा पत्नैी/
 
इतर नातेवाईक हे पुरस्कर्ते किंवा संयुक्त कर्जदार असतात. हे कर्ज विद्यार्थ्यांने फेडायचे असते (जे ते न चुकता फेडतात). विद्यार्थ्यांना हे कर्ज त्यांच्या इच्छेनुसार दोन,चार, ३६ किंवा ४८ समान मासिक हप्त्यांतून फेडता येते. हे हप्ते कर्जाच्या अधिस्थगन काळानंतर सुरू होतात. कोर्ससाठी लागणाऱ्या कालावधीसहीत कर्जाचा एकूण कालावधी सात वर्षांपेक्षा जास्त नसतो.
प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) : काही मोजक्याच बँका ०.५ ते एक टक्के इतका प्रोसेसिंग चार्ज आकारतात.
शिक्षणासाठीच्या कर्जाची इतर वैशिष्टय़े
१. विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर काढलेली एक विमा पॉलिसी आवश्यक असते. ही पॉलिसी कर्जाच्या रकमेइतकी असावी आणि ती बँकेच्या नावे निर्देशित केलेली असावी. या पॉलिसीचे हप्ते वार्षिक किंवा एकरकमी असू शकतात. फक्त कर्जाच्या परतफेडीसाठी एक लोन कव्हर टर्म अ‍ॅशुअरन्स नावाची पॉलिसी मिळते तीही चालू शकते.
२. विशिष्ट विद्यापीठातील विशिष्ट कोर्ससाठी कर्ज दिलेले असते. कोर्स/ कॉलेज/ विद्यापीठ बदलवायचे असेल तर विद्यार्थ्यांने बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे. नवीन कोर्सची फी किती आहे त्याची बँकेकडे नोंद करावी. कर्जाचे पुढील हप्ते या नवीन फीनुसार वितरित केले जातील.
३. कर्जाच्या प्रत्यक्ष अदा केलेल्या रकमेवरच व्याज आकारले जाते. मंजूर झालेल्या कर्जाच्या रकमेपैकी किती रक्कम घ्यावी याची विद्यार्थ्यांवर सक्ती नसते. या तरतुदीचा विद्यार्थी आपल्या फायद्यासाठी खूप चांगला उपयोग करून घेऊ शकतो. उदा. जो विद्यार्थी न्यूझीलंडसारख्या देशात जात आहे, त्याला व्हिसा मिळविण्यासाठी नऊ लाखांचे कर्ज मंजूर होणे आवश्यक असते. परंतु तिथल्या उदरनिर्वाहाचा बहुतेक खर्च त्याला तिथे अंशकालीन काम करून भागवता येईल. त्यामुळे त्याला प्रत्यक्षात पाच लाखांपेक्षा जास्त कर्ज उचलावे लागणार नाही आणि व्याज फक्त या पाच लाखांवरच द्यावे लागेल.
४. पुरस्कर्त्यांची व जामीनदारांची आयकरविषयक व नोकरी/ उद्योगांसंबंधीची कागदपत्रे अतिशय महत्त्वाची आहेत.
या कर्जाची परतफेड झाली नाही असे क्वचितच होते, त्यामुळे बँका या कर्जाला खूप सुरक्षित कर्ज मानतात. त्यांनी तुमच्यावर टाकलेल्या या विश्वासाचा उपयोग करून स्वत:च्या क्षमतेअनुरूप स्वत:चा जास्तीत जास्त फायदा करून घ्या!
विनायक कामत
vykamat@gmail.com