Leading International Marathi News Daily
 


बुधवार, २८ जानेवारी २००९
  नव्या युगातील खेळी
  डिझाइन क्षेत्रातील आकर्षक संधी
  चला सिम्युलेशन्सद्वारे शिकूया
  श्रीमती आगाथा हॅरिसन मेमोरियल फेलोशिप
  परदेशातील शिक्षणासाठी बँकांचे कर्ज
  उपसमस्यांचे निश्चितीकरण
  अलाहाबाद बँक लिपिकपदाची तयारी
  अ‍ॅग्रोटुरिझम
  मी निवडलेल्या क्षेत्रात..
  विकासकाचे अनोखे करिअर..
  पर्यटन क्षेत्रातील करिअर प्रवास

 

वर्तमांनपत्रांत अनेक मोठमोठय़ा जाहिराती आपण बघतो. घर, बंगला, जमीन घ्या व आपली स्वप्नं पूर्ण करा अशा जाहिराती बघितल्यावर साहजिकच हे सर्व डेव्हलपमेंट करणारे लोक कोण? त्यांना किती पैसे मिळत असतील? या व्यवसायात किती पैसे लागत असतील असे नानाविध प्रश्नही तुमच्या मनात असतील. पण आपणही बिल्डर-डेव्हलपर होऊ शकतो. कमीत कमी त्या दृष्टीने एक करिअर म्हणून बघायला काय हरकत आहे? असा विचार मात्र करणारे मोजकेच लोक असतील.
आजही विकासक म्हटल्यावर रहेजा, हिरानंदानी इ. अनेक नावं आपल्या डोळ्यांसमोर येतील पण किती महाराष्ट्रीय विकासकांची नावं डोळ्यासमोर येतात? डी. एस. कुलकर्णी, हावरे, पुराणिक, परांजपे अशी काही नावं निश्चितच महाराष्ट्रीय लोकांना प्रेरणादायी आहेत.
घर ही आपली मूलभूत गरज आहे. योग्य असा निवारा/घर हे प्रत्येकजणच शोधत असतो. घराशी आपली प्रचंड emotional
 
attachment असते आणि माझं घर सुंदर असावे तसंच ते समाधान देणारं, शांती देणारं असावं ही प्रत्येकाची गरज आहे. त्याचबरोबर माझं घर हे dream home असावे, जो कोणी माझ्या घरी येईल त्यांनी या घराच्या, वास्तूच्या व माणसांच्या प्रेमात पडावे असे प्रत्येकालाच वाटत असतं.
मुलं व घर या दोन बाबतींत कोणीही व्यक्ती कधीच तडजोड करायला इच्छुक नसतो. आपल्यापैकी काही भाग्यवंत सोडले तर उरलेल्या सर्वाच्या आयुष्यात, नोकरीतच अर्धे आयुष्य घराचे हप्ते फेडण्यात जातं. त्यामुळे प्रचंड वेळ व पैसा तर खर्च होतोच पण मानसिक ओढाताणही होते.
या सर्व पाश्र्वभूमीवर चांगले तयार विकासक होण्याची आवश्यकता आहे व आपल्या मुलांनी विकासक या करिअरकडे गंभीरतेने व अधिक संख्येने बघण्याची आवश्यकता आहे.
इतकं सगळं असूनही विकासकाच्या करिअरकडे थोडंसं शंकेने पाहिलं जातं त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे असावीत असं म्हणता येईल :
१. विकासकाचं करिअर म्हणजे नेमकं काय याची कल्पनाच नाही.
२. विकासकाला खूप गैरव्यवहार करावे लागतात.
३. मोठय़ा प्रमाणात काळा पैसा असेल तरच विकासक होता येतं.
४. सर्व विकासकांचे राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांशी साटेलोटे असतात.
५. गुन्हेगारी समाजाशी खूप सांभाळून राहावं लागतं.
६. बिल्डरची इमेज समाजात तितकीशी चांगली नाही.
मात्र ही सर्व कारणं पूर्णपणे खरी नाहीत. प्रत्येक क्षेत्रात काही माणसे चांगली तर काही वाईट अशी असतातच. सत्यम ही अगदी कळ क्षेत्रातील सर्वाच्या कौतुकाचा विषय असावा अशी कंपनी पण तिथेही गोंधळ झालाच ना?
सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायला पाहिजे की विकासक हा देखील एक उद्योजकच आहे आणि प्रत्येक उद्योजकाला काही challenges हे त्याच्या त्याच्या उद्योगाच्या स्वरूपाप्रमाणे असतातच. पण challenges आहेत म्हणून उद्योजक होणार नाही हा attitude असेल तर तुम्ही उद्योजक कधीच होऊ शकत नाही. पण त्या त्या व्यवसायातील trade secrets जाणून घेणे मात्र आवश्यक आहे.
उत्तम प्रकारे professionalism ठेवून माझ्याकडे येणारे ग्राहक हा त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आला आहे असा दृष्टिकोन असेल तर उत्तमात उत्तम सेवा आपण लोकांना देऊ शकतो त्यासाठी कुठेही तडजोड करावी लागत नाही. वर दिलेले सर्व समज हे अशामुळे झाले आहेत की या क्षेत्रात असलेल्या पैशामुळे मध्यंतरीच्या काळात अनेक असामाजिक तत्त्वे या व्यवसायात प्रवेश करीत होते. पण आता परिस्थिती बदलत आहे कारण या सर्व तत्त्वांच्या असं लक्षात आलंय की फक्त पैसे आहेत म्हणून किंवा फक्त दादागिरी करून आपण या क्षेत्रात टिकू शकत नाही. त्यामुळे या लोकांचा सहभाग कमी झाला.
सध्याच्या corpoterisation च्या युगात चांगले लोक ज्यांच्याकडे systems बसवण्याची कल्पकता आहे. चांगली vision ्ल आहे. तेच लोक या व्यवसायात टिकतील. आज परदेशातील विकासक कंपन्या अतिशय professional पद्धतीने काम करीत आहेत. उद्या डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकेतील विकासाच्या धर्तीवर आपल्या देशात विकासक तयार होण्याची अनिवार्य गरज आहे.
विकासक होण्यासाठी कोणत्याही पदवीची/पदविकेची आवश्यकता नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. डी.एस.के. सारखा टेलिफोन साफ करणारा माणूस हा सवार्ंत चांगला, professional’, आणि दिशादर्शक विकासक होऊ शकतो. ते आज भारतातच नाही तर अमेरिकेतही स्वत:चे प्रकल्प विकसित करीत आहेत आणि सुरेश हावरेसारखा B.Tech. Gold Medalist, B.A.R.C. मधील वैज्ञानिक आज स्वत:च्या भावाने सुरू केलेल्या हावरे बिल्डर्सच्या घोडदौडीत भावाच्या पश्चात धुरा नुसतीच सांभाळत नाहीत तर व्यवसाय १०० पटींनी मोठा करीत आहेत.
मग कमीत कमी शिक्षणाची गरज नसलेले हे क्षेत्र निश्चितच खूप स्फूर्तिदायक आहे. त्यासाठी पुढील गोष्टी मात्र तरुणांनी लक्षात घ्यायला हव्यात:
१. विकासक होण्यासाठी व्यक्तीचा दृष्टिकोन तसा असायला हवा उदा. बऱ्याचदा शहरात मर्यादित जागेवर प्रकल्पाची गर्दी तर इतरत्र घरांची कमतरता दिसते. अशा वेळी नवीन प्रकल्प नवीन ठिकाणी सुरू करण्यासाठी तसा दृष्टिकोन (vision) असणे आवश्यक असते. प्रकल्प जेथे सुरू करायचा तिथे कसा प्रकल्प आखावा की जेणे करून सर्वानाच फायदा होईल हे पाहणे आवश्यक ठरते.
२. विकासक civil engg असल्यास उत्तम, पण नसेल तरी प्रत्यक्ष site वरचा अनुभव, नवीन ठिकाणी प्रकल्प चालू करताना मोलाचा ठरतो. ज्यांना विकासक व्हायची इच्छा आहे त्यांनी असा अनुभव जरुर घ्यावा हे मी आमच्या अनुभवावरून आग्रहाने सांगतो.
३. विकासक होण्यासाठी multidimensional personality असणं अत्यंत आवश्यक आहे. एकाच वेळी बँकिंग, कायदेशीर बाबी, मार्केटिंगच्या policies, ग्राहकांशी नातेसंबंध, दगड-माती, सीमेंट इ. सामान व त्याचा पुरवठा, कामाची सुयोग्य गती राखणं, दर्जा राखणं या रोजच्या बाबींबरोबरच बदलणारे जागतिक व्यापारी प्रवाह, बदलणारी सरकारी ध्येयधोरणे policies, बदलणाऱ्या गरजा व अपेक्षा या सर्वाचा सुयोग्य ताळमेळ राखावा लागतो.
त्यामुळे ज्यांच्याकडे एकाच वेळी अनेक क्षेत्रात/ बाबीत लक्ष देण्याची देणगी आहे, त्या सर्व व्यक्ती हे करियर करण्यासाठी सुयोग्य आहेत.
४. वरील चर्चा केलेल्या सर्व योग्यता एकदम एकाच वेळी व्यक्ती संपादू शकत नाही हे खरेच पण म्हणून एखाद्या छोटय़ा प्रकल्पापासून सुरुवात केल्यास, अनुभवातून शिकत पुढे जाता येईल.
५. सर्व प्रकल्पात पैशांची मोठय़ा प्रमाणावर उलाढाल होते. त्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या पैशाकडे पहाण्याची योग्य मानसिकता विकासकाला असावी लागते.
६. आज आपल्या देशाची प्रगती उत्तम गतीने आहे. अशा वेळी समाजाच्या प्रत्येक घटकाला, उत्तम निवारा मिळून त्याचे आयुष्य उत्तम दर्जाचे व्हावे ही इच्छा विकासकाची असावी.
७. ऊर्जा, पर्यावरण हे फक्त पर्यावरणवादी किंवा तत्सम गटाचे मुद्दे नव्हेत. या दोन्ही मुद्दय़ांकडे अतिशय जिव्हाळ्याने विकासकाने बघावे. याचा फायदा आपल्या संपूर्ण विश्वाला होईल यात शंका नाही.
आज कोणतीही सामाजिक कामं उभी राहाण्यासाठी पैसा व कार्यकर्ते या दोन्हींची आवश्यकता आहे. यासाठी विकासकांनी आतापर्यंत केलेले योगदान खूप महत्त्वाचे आहे. अनेक बगीचे, रस्ते, मंदिर, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल हे विकासकांच्या देणगीतून व प्रत्यक्ष सहभागातून उभे राहिले आहे.
आज जे विकासक हे आघाडीच्या कंपन्यांचे मालक आहेत त्यांनी त्यांची करियर कशी सुरू केली हे समजणे आवश्यक आहे.
डी. एस. कुलकर्णी (टेलिफोन सुगंधीत करणे, छोटी प्लंबिंगची कामे, इंटिरियल, विकासक, मोठे उद्योजक.) मोहन देशमुख (शिक्षक, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, विकासक.) रहेजा (रियल इस्टेट एजंट.) विजय मच्छिंद्र- (मेकॅनिकल इंजिनीयर) यातील कोणीही व्यक्ती पिढीजात पैसे घेऊन आली नव्हती. पैसे जमा करण्यासाठी attitude महत्त्वाचा आहे. तो असेल तर बँका, गुंतवणूकदार पैसे मागे घेऊन उभे राहतात. छोटय़ा विकास कामांपासून सुरू करा व एकेक टप्पा पार करत मोठे विकासक बना हे शक्य आहे!
आमचे ध्येय आहे २५ विकासक तयार करण्याचे. त्यासाठी आमचे हात पुढे आहेत, ते हात धरायचे की नाही हा choice तुमचा आहे. या जगामध्ये तुम्ही काहीतरी सुंदर निर्मिती करणे ही तुम्ही जगाला दिलेली सर्वात सुंदर देणगी आहे. कारण निर्मिती ही शाश्वत असते तुम्ही नाही. आजचा ताजमहाल आपण आनंदाने बघायला जातो आणि पिढय़ान् पिढय़ा जात राहू. तसेच तुम्ही या जगात निर्माण केलेली सुंदर वास्तू हीच टिकेल. आज कुठल्याही देशात आपण गेलो की त्या देशातील सुंदर इमारती, रस्ते, बगीचे इ. बघून आपण देश किती प्रगत आहे हे ठरवितो.
आपला देश प्रगत करण्याची जबाबदारी आपली आहे. ती आपण या देशात सुंदर चांगली घरं, वास्तू, बगीचे निर्माण करून करूया. आज अशा भावनेनी काम करणाऱ्या विकासकांची देशाला व लोकांना गरज आहे.
अजित मराठे
संपर्क- ९८२१२१५३९९