Leading International Marathi News Daily
रविवार, २५ जानेवारी २००९

यशस्वी कृतीचा काळ
गुरू-शनीच्या सहकार्याचे पर्व सुरू असल्याने मेष व्यक्तींचा प्रयत्नरथ पुढे पुढे सरकत राहणार आहे. त्यामध्ये बुध-मंगळ राश्यांतरामुळे नवा उत्साह निर्माण होईल आणि भराभर निर्णयातून यशस्वी कृती होत राहतील. शुक्र व्ययस्थानी प्रवेश करीत आहे. केतू चतुर्थात आहे. प्रापंचिक प्रश्नांत अधिक लक्ष घालणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळावा. बुध-मंगळ युतीमध्ये व्यापारात संयम ठेवावा लागतो.
दिनांक : २६ ते २९ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्न सुरू ठेवा, यश मिळेल.

आगेकूच सुरू राहील
गुरू-राहूचे शुभ परिणाम शुक्र-मंगळ राश्यांतरामुळे व्यापक यशाचा आधार ठरणार आहे. शनिवारी चंद्राच्या रवि-गुरू शुभयोगापर्यंत निर्वेध कार्यपथावरून आगेकूच सुरू राहील. बढती-बदलीचे योग येतील. अभिनव उपक्रम व्यापार व राजकारणात फायदेशीर ठरतील. आर्थिक समस्या सुटतील. प्रापंचिक प्रकरणे मार्गी लावता येतील. बुध वक्री असेपर्यंत सफलता मिळेपर्यंत सतर्क राहणे मात्र आवश्यक आहे.
दिनांक : २६ ते ३० शुभकाळ.
महिलांना : समस्या सुटतील. प्रभाव वाढेल.

गुप्तता यश देईल
अष्टमात गुरू-राहू आहेत. त्यात मंगळवारी मंगळाचा प्रवेश होईल आणि मिथुन व्यक्तीसमोर काजवे चमकावेत अशा काही समस्या उभ्या राहतील. परंतु विचलित न होता घाईगर्दीने निर्णय घेऊ नका. शनीचे भक्कम सहकार्य, तसेच मीन राशीत येत असलेला शुक्र प्रतिष्ठा मजबूत ठेवण्यासाठी उत्साह देतील. त्यातून प्रपंच, प्राप्ती, व्यापार, नोकरी, सत्ता सांभाळता येईल. शनिवापर्यंत कामाबद्दल गुप्तता मात्र पाळा.
दिनांक : २८ ते ३१ मार्ग सापडतील.
महिलांना : संयम व प्रार्थना यांचा समन्वय समस्यांत तारणार आहे.

प्रवास अविस्मरणीय होईल
रवि-गुरू सहयोग, शुक्र-मंगळाचे राश्यांतर कर्क व्यक्तींना साडेसातीच्या अशुभ परिणामांतून मुक्त करील. निर्णय घेऊन केलेली कृती प्रतिमा उजळून काढणारे यश देणार असल्याने व्यापारपेठ, राजकारण, कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा प्रांतातील मंडळींचा प्रवास अविस्मरणीय ठरू शकेल. बुध-मंगळ युतीमध्ये कष्टाने मिळवलेले शब्दांनी सटकू नये, यासाठी शनिवापर्यंत सतर्क राहावे लागेल. मंगलकार्य ठरेल.
दिनांक : २६, २७, ३०, ३१ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्नाने नेत्रदीपक यश मिळेल.

खिंडीत सापडाल
गुरू-राहूची नाराजी, साडेसाती सुरू आहे. शुक्र- मंगळाची राश्यांतरे नव्या समस्या निर्माण करतील. सिंह व्यक्ती बऱ्याच क्षेत्रांमध्ये खिंडीत सापडणं शक्य आहे. शत्रू व मित्र संभ्रमात टाकतील. प्राप्ती आणि प्रतिष्ठा चिंता निर्माण करतील. परंतु विचलित होऊ नका. अशा अटीतटीच्या प्रसंगांत श्रद्धा व सबुरीच आधार देते. त्यातून अशुभ काळ संपून नवा प्रकाश दिसेल. थोडं थांबा, याची प्रचीती येईल.
दिनांक : २६, २७, ३०, ३१ सावध राहा.
महिलांना : सामोपचाराने संधी साधा.

मोठी मजल मारता येईल
पंचमात सूर्य-गुरू सहयोग आणि शुक्र-मंगळाचे राश्यांतर कन्या व्यक्तींच्या कार्यप्रांतात नवा उत्साह निर्माण करतील. त्यातून मिळणारी शक्ती साडेसातीच्या अनिष्टतेवर विजय संपादन करू शकेल. शनिवारी चंद्राच्या रवि-गुरूशी होत असलेल्या शुभयोगापर्यंत अनेक क्षेत्रांत आपण मोठी मजल माराल. प्रपंचापासून परमार्थापर्यंत याची प्रचीती येईल. वक्री बुधाच्या परिणामांनी विचलित मात्र होऊ नका.
दिनांक : २६, २७, ३०, ३१ शुभकाळ.
महिलांना : प्रत्येक कार्य नेत्रदीपक यश देणार आहे.

प्रश्न गर्दी करतील
सूर्य, गुरू, राहू चतुर्थात आहे. त्यात मंगळवारी मंगळाचा समावेश होईल आणि कार्यपथावर नवनवे प्रश्न गर्दी करू लागतील. त्यामुळे अपेक्षित स्थळ आणि यशापर्यंत वेळेवर पोहोचता येणे अवघड आहे. बुधाचं राश्यांतर, लाभात शनी हे युक्ती आणि जिद्द यांची रसद पुरवणार असल्याने गर्दीत धक्काबुक्की होणार नाही. मीन शुक्र प्रपंचाचा आधार ठरणार आहे. गर्दी आणि घडय़ाळ यांच्या दडपणाने प्रवास करू नका. सफलता सोपी होईल.
दिनांक : २५, २६, २७ सावध राहा.
महिलांना : प्रकृती सांभाळा. प्रपंचात शांत राहा.

सफलतेचा शोध सोपा होईल
गुरूची कृपा, शनीचे सहकार्य, शुक्र-मंगळाची राश्यांतरे या ग्रहांमुळे समस्या संपायला लागतील. सफलतेचा शोध सोपा होईल. नवीन मार्गावर प्रवास सुरू करता येईल. त्यातील नवे संपर्क, नवे संबंध श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास उपयुक्त ठरतील. नवा उद्योग सुरू करता येईल. सामाजिक चळवळीतून दबदबा तयार होईल. कला-साहित्यात चमकाल. बढती-बदलीचे ठरेल. मंगलकार्ये होतील.
दिनांक : २६, २७, ३०, ३१ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्न-कल्पकता संकल्प-सिद्धीतले दुवा ठरतील.

यशात मस्ती नको
गुरू-राहूचं सहकार्य, शनी भाग्यात, शुक्र-मंगळाची अनुकूल प्रतिक्रिया देणारी राश्यांतरे यांतून धनू व्यक्तीचा अनेक क्षेत्रांत प्रभाव प्रस्थापित होत राहील. त्यामध्ये सत्ताकेंद्र आणि बौद्धिक प्रांताचा समावेश असेल. शनिवारी होत असलेल्या चंद्राच्या रवि-गुरूचा शुभयोग प्रभाव चित्र आकर्षक करीत राहणार असल्याने व्यापारचक्र वेगाने फिरत राहील. प्राप्ती वाढेल. प्रपंच प्रसन्न कराल. तसंच शत्रूनाही जेरबंद करू शकाल. बुध वक्री होत असल्याने कुठल्याही परिस्थितीत यशाचं रूपांतर मस्तीत मात्र होऊ देऊ नका. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल.
दिनांक : २६ ते २९ शुभकाळ.
महिलांना : जबाबदाऱ्या पूर्ण करता येतील. प्रतिमा चकचकीत होईल.

नवे साथीदार मिळतील
राशीस्थानी सूर्य, गुरू आणि त्यात पुन्हा मंगळाचा समावेश होईल. शुक्र पराक्रमी मीन राशीत येत आहे. मकर व्यक्तींना कार्यप्रांतात नवे साथीदार मिळत राहतील. त्यातून उपक्रमांना वेग देता येईल. आकर्षक कार्ये उभी करता येतील. त्यात व्यापार, राजकारण, कला, विज्ञान, क्रीडा अशा काही विभागांचा समावेश होईल. वक्री बुधाचं राश्यांतर होत असल्याने, तसंच अष्टमात शनी असल्याने अनुकूल काळातही सतर्क राहूनच उलाढाली कराव्या लागतील.
दिनांक : २६ ते ३० शुभकाळ.
महिलांना : अनेक क्षेत्रांत आघाडीवर राहाल.

नवीन आव्हानांचा काळ
सूर्य, गुरू, राहू अनिष्ट. त्यात आणखी मंगळाचे आगमन होणार असल्याने कुंभ व्यक्तींसमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत. एखादे प्रकरण बुध- शनीच्या अनुकूलतेमुळे मार्गी लावले तरी त्रास देणारी नवनवी प्रकरणे उभी राहतील. सध्याचा अशुभ काळ संयम, सत्य आणि प्रार्थना यांच्या समन्वयातून नियंत्रणात आणता येईल. प्रत्यक्ष कृतीसाठी मात्र काही काळ थांबलात तर बरे होईल. बुध-मंगळ युती असताना महत्त्वाची कागदपत्रे आणि सामाजिक प्रतिक्रिया यासंबंधात सावध राहावेच लागेल. श्री मारुतीची उपासना- आराधना लाभाची ठरावी.
दिनांक : २६, २७, ३०, ३१ प्रतिष्ठा निश्चितपणे सावरता येईल.
महिलांना : चार-दोन पावले मागे येऊन वाद मिटवा. पुढे त्याचा फायदा होईल.

शुभ परिणामांचा काळ
गुरू, राहू अनुकूल आहे. बुध, शुक्र, मंगळाची राश्यांतरे मीन व्यक्तींना बौद्धिक क्षेत्रात, तसेच राजकीय प्रांतात, कला, क्रीडा विभागांत श्रेष्ठत्व सिद्ध करणारे यश देणार आहेत. शनिवारी चंद्राच्या रवि-गुरूशी होत असलेल्या शुभयोगापर्यंत शुभ परिणामांची ही प्रक्रिया सुरूच राहील. षष्ठातील शनीमुळे चुका आणि साहस याबाबतीत शत्रू टपून बसलेले असतात, याचे काही केल्या विस्मरण होऊ देऊ नये. धार्मिक उपक्रम प्रसन्नता देतील आणि शत्रूंच्या विचारांतही योग्य ते परिवर्तन घडवून आणू शकतील.
दिनांक : २६, २७, ३०, ३१ अशा काही चांगल्या घटनांचा हा काळ आहे.
महिलांना : निर्धाराने पुढे चला, यश नक्कीच मिळेल. प्रपंच, सामाजिक कार्यात सबुरीने घ्यावे. समन्वयच सर्व बाबतीत उपयोगी पडावा.