Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३० जानेवारी २००९

व्यापार - उद्योग

व्होल्क्सवॉगनतर्फे ‘व्हीडब्ल्यू इंडिया असिस्टंस’ उपक्रम

 

व्यापार प्रतिनिधी: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व्होल्क्सवॉगन इंडियाने ‘व्हीडब्ल्यू असिस्टंस’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. याद्वारे ग्राहकांप्रति असलेली वचनबद्धता कंपनी पुनप्र्रस्थापित करत आहे. व्हीडब्ल्यू इंडिया असिस्टंस हा एक एकीकृत आणि गरजेनुसार बनवण्यात आलेला कार्यक्रम असून याच्या माध्यमातून विशेष ग्राहक संबंध व्यवस्थापन सेवा प्रदान केली जाते. ही सेवा ग्राहकांसाठी वन-स्टॉप सोल्युशन्स प्रदान करते. या कार्यक्रमामध्ये रोडसाइड असिस्टंटस कार्यक्रम, व्हीडब्ल्यू इन्फो सेवा आणि व्हीडब्ल्यू कस्टमर्स क्लब यांचा समावेश असून त्यांच्या मौल्यवान ग्राहकांपासून ही सेवा फक्त एका कॉलच्या अंतरावर आहे. आपल्या ग्राहकांसोबत केवळ विक्री संबंधाच्या पलीकडील दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि विश्वास आणि खात्रीलायकता या वैशिष्टय़ांवर आधारलेली आपली ब्रॅन्ड ओळख ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे एक बळकट व्यासपीठ आहे. ‘रोडसाईड असिस्टंस प्रोग्राम’ हा एक खास उपक्रम असून रस्त्यात गाडी बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास ही सेवा ग्राहकांना विशेष उपयुक्त ठरेल.

अतुल लिमिटेडची नऊमाही विक्री ९१९ कोटींवर; २४ टक्के वाढ
व्यापार प्रतिनिधी: लालभाई ग्रुपची कंपनी अतुल लिमिटेडने ३१ डिसेंबर २००८ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचा लेखापरीक्षणापूर्वीचा निकाल जाहीर केला आहे. ३१ डिसेंबर २००८ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांमध्ये गतवर्षीच्या याच काळातील आकडय़ांचा विचार करता कंपनीची नक्त विक्री २४ टक्क्यांनी वाढून ती ९१९ कोटी रुपयांवर (त्यात ४६६ कोटी रुपयांच्या निर्यातीचा समावेश आहे.) गेली आहे. स्थानिक विक्री १७ टक्क्यांनी वाढली असून निर्यातीमध्ये ३१ टक्क्यांची वृद्धी झाली आहे. विक्रीतील वृद्धीबरोबरच ढोबळ उत्पन्नातील वाढही भव्य अशीच आहे. ती ६८ कोटी रुपयांवरून ९४ कोटी रुपयांवर गेली असून ही वृद्धी ३८ टक्के एवढी आहे. अ‍ॅग्रोकेमिकल्स आणि अ‍ॅरोमॅटिक्स व्यवसायांनी केलेल्या उमद्या कामगिरीच्या माध्यमातून ही वृद्धी नोंदविण्यात आली आहे. अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपयांच्या किमतीतील दोलायमान स्थितीमुळे परकीय चलनामध्ये जो फरक पडत गेला त्यामुळे ३४ कोटी रुपयांचा तोटा कंपनीला सोसावा लागला होता. त्याउपरही कंपनीने वर उल्लेखित कामगिरी केली आहे आणि याचाच अर्थ खरी कामगिरी ही त्यापेक्षा किती तरी उजवी आहे. परकीय चलनामधील कर्जामुळे आणि आवकीमधील घसरणीमुळे नऊ महिन्यांमध्ये (एप्रिल-डिसेंबर) ३४ कोटी रुपयांचा उलटा परिणाम झाला होता. वर उल्लेखित परकीय चलनातील फरक हा ३४ कोटी रुपयांवर गेल्याची गोष्ट ध्यानात घेतली तरी करपूर्व नफा २२.६ कोटी रुपयांवरून ४०.२ कोटी रुपये एवढा झाला आहे आणि ही वाढ ७८ टक्के एवढी आहे.

गोदरेज अप्लायन्सेसकडून ‘लक बाय चान्स’ स्पर्धा
व्यापार प्रतिनिधी: अप्लायन्सेसच्या निर्मितीमधील एक आघाडीची कंपनी गोदरेज अप्लायन्सेस ‘गोदरेज लक बाय चान्स’ हा आकर्षक उपक्रम दाखल करत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना केवळ भाग्याच्या आधारावर तारांकित बक्षिसे मिळविण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २००९ या काळात जे ग्राहक गोदरेज रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, वॉशिंग मशिन मायक्रोवेव्ह ओव्हन यांची खरेदी करतील त्या प्रत्येकाला बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. एक्सेल एन्टरटेन्मेंटच्या पुढील चित्रपटासाठी दोघांना परदेशी चित्रीकरणासाठी कोणत्याही खर्चाविना जाण्याची संधी; ‘लक बाय चान्स’ या चित्रपटातील स्टार्सबरोबर डिनर घेण्याची संधी; गोदरेज रेफ्रिजरेटर्स, वॉिशंग मशिन्स, मायक्रोवेव्ह ओव्हन्स, एअर कंडिशनर्स, डीव्हीडी प्लेयर्स ही बक्षिसे आणि ‘लक बाय चान्स’च्या म्युझिक सीडी (स्पेशल एडिशन) मिळविता येईल. प्रत्येक खरेदीबरोबर ग्राहकाला एक स्क्रॅच कार्ड मिळेल. ग्राहकांनी हे कार्ड स्क्रॅच करायचे आणि त्याच्या वाटय़ाला काय बक्षीस आले आहे हे पाहायचे, असे या स्पर्धेचे स्वरूप आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्यावरील पुस्तकाचे कन्नड भाषांतर प्रकाशित
प्रतिनिधी: पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. बजरंग कोरडे यांनी नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या ‘मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर’ या मालिकेत मराठीतील प्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व साहित्यावर इंग्रजीतून लिहिलेल्या पुस्तकाचे कन्नड भाषांतर नुकतेच प्रकाशित झाले. धारवाड विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ. मल्लिकार्जुन पाटील यांनी डॉ. कोरडे यांच्या या पुस्तकाचे कन्नडमध्ये भाषांतर केले आहे. साहित्य अकादमीच्या बंगलोर येथील दक्षिण विभागातील कार्यालयाने हे भाषांतर प्रसिद्ध केले. डॉ. कोरडे यांच्या या पुस्तकाचे मराठीत यापूर्वीच भाषांतर झालेले आहे.

पब्लिक इश्यूंचा पुन्हा सुकाळ!
भांडवली बाजारात गेल्या महिनाभरपासून दिसून आलेल्या स्थिरतेने कंपन्यांच्या आयपीओ अर्थात प्रारंभिक समभाग विक्रीच्या प्रयासांना पुन्हा चालना मिळाली असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून गुंतवणूकदारांपुढे खुल्या होत असलेले तीन पब्लिक इश्यू..