Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘कामगारांच्या गुणांना वाव देण्यासाठी मर्दानी खेळांचे आयोजन करावे’
पुणे, २९ जानेवारी/क्रीडा प्रतिनिधी

 

कामगारांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी क्रिकेट स्पर्धांबरोबरच कबड्डी आणि खो-खो या मर्दानी खेळांचे आयोजन करण्याचे आवाहन आमदार उल्हास पवार यांनी केले.
कात्रज येथील यंत्रनिर्माण चौकात आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीस देण्यात आले. इंडस्ट्रियल असोसिएशन व यंत्रनिर्माण नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला होता. या वेळी ते बोलत होते. कात्रज परिसरातील खेळाडूंसाठी शासकीय योजनेतून लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या वेळी नगरसेवक वसंत मोरे, शंकरराव बेलदरे, विशाल तांबे, संभाजी थोरवे, सुनील मांगडे, दीपक गुजर आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रथम- श्री सद्गुरू एंटरप्राईजेस व पदुशांत इंजिनिअरिंग. द्वितीय- सिद्धी पावडर कोटिंग व क्लायंबर इंजिनिअर. तृतीय- ऋषिकेश इंजिनिअरिंग यांना मिळाला. ‘मॅन ऑफ द सिरीज’ बाबा हगवणे या खेळाडूस मिळाले.
या परिसरामध्ये क्रिकेटप्रेमींसाठी भव्य क्रीडांगण असावे, अशी मागणी नगरसेवक वसंत मोरे यांनी केली.
या परिसरातील खेळाडूंसाठी शासकीय योजनेतून क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन आमदार पवार यांनी या वेळी दिले. क्रिकेटबरोबरच कबड्डी व खो-खो या मर्दानी खेळाचेही असोसिएशनने आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धेचे नियोजन यंत्रनिर्माण पतसंस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, किसनराव शिंदे, दीपक जाधव, अंकुश जाधव, देविदास जाधव, महेश महांगरे, राकेश फाटे, संदीप बेलदरे, नथुराम कोंढाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन विकास फाटे यांनी केले.