Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘स्वच्छ व सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल जाहीर
पुणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी

 

किलरेस्कर फाउंडेशनतर्फे २००८-०९ या वर्षांसाठी घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ व सुंदर शाळा’ या स्पर्धेमध्ये निरनिराळ्या सात गटांमधून ३३ शाळांनी पारितोषिक पटकाविले आहे. या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
स्वच्छता, नीटनेटकेपणा, शिस्त या मूलभूत संस्कारांबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव, पर्यावरण जागृती या जाणिवा मुलांमध्ये रूजवाव्यात या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत पहिल्या गटात विमाननगर येथील इंटरविडा उत्कर्ष शिक्षण केंद्र, दुसऱ्या गटात एरंडवण्यातील अभिनव विद्यालय, तिसऱ्या गटात लुल्लानगरमधील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, चौथ्या गटात धायरी गावातील बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालय, पाचव्या गटात जेजुरीतील जिजामाता हायस्कूल, सहाव्या गटात करंदीचे विद्या विकास मंदिर व सातव्या गटामध्ये खंडाळ्याच्या राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालय या शाळांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.
याबरोबरच सवरेत्कृष्ट स्वच्छताविषयक सामाजिक प्रकल्प राबविणाऱ्या शाळांमध्ये करंदीच्याच विद्या विकास मंदिराने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी चार पारितोषिके अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दोन हजार आणि उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली असल्याचे किलरेस्कर फाउंडेशनतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.