Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ३० जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

व्हीआयटीतर्फे आज ‘इफिफनी’ महोत्सव
पुणे, २९ जानेवारी/प्रतिनिधी

 

विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे ३० जानेवारीपासून ‘इफिफनी २००९’ या वार्षकि कला, साहित्य व आनंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा महोत्सव भरविण्यात आल्याचे संस्थेचे संचालक हेमंत अभ्यंकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
महानगरपालिकेचे माजी आयुक्त अरुण भाटिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या कॅम्पसमधील तीन दिवसांच्या या महोत्सवाचे उद्घाटन होईल.
महोत्सवामध्ये चाळीस महाविद्यालयांचा सहभाग असून, प्रश्नमंजुषा, कॉम्प्युटर गेम, हिंदी ब्रॅन्ड कॉम्पिटिशन, फेस पेंटिंग, कॉमन मॅन व निबंध लेखन या विविध स्पर्धाचा समावेश असणार आहे. तसेच यंदा पहिल्यांदाच मराठी भाषेमध्ये वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन केले आहे. या महोत्सवात चोवीस कार्यक्रम व स्पर्धा होणार असून, त्यामध्ये विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालयांचा सहभाग असणार आहे. तेरा हजाराहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील.