Leading International Marathi News Daily                                  रविवार , १ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

युकी रॉक्स!
विजेतेपद मिळविल्यानंतर भांब्री याने सांगितले, आज मला वर्चस्व राखण्याची खात्री होती. मी परतीचे

 

फटके व सíव्हस यावर चांगले नियंत्रण ठेवू शकलो. या विजेतेपदामुळे मला खूप आनंद झाला आहे. आणखी ग्रॅन्ड स्लॅम मला जिंकायच्या आहेत.
मेलबर्न,३१ जानेवारी/पीटीआय
भारताच्या युकी भांब्री याने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील कुमार मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. त्याने एकतर्फी लढतीत जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांद्रोस फर्निनादोसला ६-३,६-१ असे हरविले. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच भारतीय ज्युनियर खेळाडू आहे.
भारताच्या रामनाथन कृष्णन यांनी १९५४ मध्ये विम्बल्डनमध्ये कुमार मुलांच्या गटात विजेतेपद मिळविले होते. त्यांचा मुलगा रमेश याने १९७९ मध्ये विम्बल्डन व फ्रेंच स्पर्धेतील कुमार मुलांच्या गटात विजेतेपद मिळविले होते. लिएण्डर पेस याने १९९० मध्ये विम्बल्डन व अमेरिकन स्पर्धेतील कुमार मुलांच्या गटात विजेतेपद मिळविले होते.त्यानंतर ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद मिळविणारा भांब्री हा पहिला भारतीय खेळाडू आहे.गतवर्षी त्याला येथे उपान्त्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. भांब्री याला येथे अग्रमानांकन देण्यात आले होते. दिल्लीचा खेळाडू भांब्री याने आज सुरुवातीपासून विजेतेपदास साजेसा खेळ केला व निर्विवाद वर्चस्व गाजविले.त्याने पहिल्या सेटमध्ये चौथ्या गेमच्या वेळी सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. त्याने परतीच्या फटक्यांचा सुरेख उपयोग केला. या ब्रेकसह त्याने ३-१ अशी आघाडी घेतली. हा सेट त्याने ३१ मिनिटांत जिंकला.तेथून त्याने प्रतिस्पध्र्यास संधी दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये त्याने दोन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला व हा सेट त्याने ३१ मिनिटांत जिंकून अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. हा सेट त्याने २६ मिनिटांत जिंकला. त्याने २९ अजोड फटके लगावले. त्याने सात ब्रेक पॉईन्टपैकी चार पॉईन्टचा फायदा घेतला.त्याने स्वत: एकदाही सíव्हस गमावली नाही. भांब्रीने दुहेरीतही भाग घेतला आहे, मात्र तेथे त्याला लियांग चिहुआंग (चीन तैपेई) याच्यासह उपान्त्य फेरीत मिखाईल बीर्याकोव (रशिया) आणि यासुक्तका उचीयामा (जपान) यांच्याविरुध्द ३-६,१-६ असा पराभव पत्करावा लागला.