Leading International Marathi News Daily

रविवार , १ फेब्रुवारी २००९

डोंबिवलीचा विनोद पुनमिया
भगवान मंडलिक

मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर यामधील शहिद जवानांना, नागरिकांना श्रध्दांजली वाहण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देशभर झाले. परंतु, डोंबिवलीचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सायकलपटू विनोद पुनमिया (५०) याने प्रजासत्ताक दिनापासून ‘गेटवे ऑफ इंडिया ते नवी दिल्ली’ अशी ‘व्हिल टू हिल’ नावाची अनोखी सायकल यात्रा काढली. शहिद जवानांना श्रध्दांजली वाहणे आणि शांतता, एकात्मतेचा, तसेच गांधीजींचा उर्जा संवर्धनाचा संदेश देशभर पोहचविणे हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट होते. या यात्रेत पुनमिया यांनी दररोज सुमारे पाचशे किलोमीटरचे अंतर सायकलने कापले, दिल्ली गाठली नि देशभर शांततेचा संदेश पोहचविला. चाळीशी उलटली की माणूस चाचपडायला लागतो, छाती भरून येते, डोळे तिरमिरायला लागतात. मग पन्नास वर्षांच्या तरूण विनोदजींमध्ये असे कोणते अजब रसायन आहे की ते वायू आणि वेगालाही मागे टाकते.

किड्स् अ‍ॅण्ड यूथ आयुर्वेद सर्वासाठी ८ फेब्रुवारी रोजी वाशीमध्ये
प्रतिनिधी

बाळाचा जन्म झाला की, आई-वडिलांसह सर्व नातेवाईकांच्या ओठांवर हसू उमलते आणि आनंदाने त्याच्या नामकरणाच्या विधीची सुरुवात होते. बाळ आईसारखं दिसते की, बाबांसारखं, नाही ते तर आजी-आजोबांची आठवण घेऊन आले आहे असे बाळाच्या अंगावरची एखादी जन्मखूण पाहून म्हटले जाते. परंतु बाळ जसजसे वयाने मोठे होऊ लागते तसे त्याच्यात हवामानाच्या बदलांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल चर्चा सुरू होते.

असे चित्रपट, अशी माणसे!
भारतीय चित्रपट नावाचं एक अजब रसायन जगातील इतर चित्रपटसृष्टींना नेहमीच अचंबित करतं. हिंदी चित्रपटांच्या या प्रकृतीकडे पाहण्याचा एक जागतिक दृष्टिकोण आपण अलीकडेच ‘स्लमडॉग मिलियोनर’मध्ये पाहिला. प्रत्यक्ष हिंदी चित्रपटसृष्टी, तेथील व्यवहार आणि माणसे हा सुद्धा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. यश, अपयश, नैराश्य, राजकारण, गॉसिप, प्रसिद्धी, पैसा यांच्या मिश्रणातून आकाराला येणारं हे एक आकर्षक विश्व आहे.दिग्दर्शिका झोया अख्तर हिने ‘लक बाय चान्स’ या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टी आणि तेथील व्यक्तिरेखांचे जग ज्या ताकदीने उभे केले आहे, ते एकाच वेळी मनोरंजक आहे आणि अंतर्मुख करणारेही आहे.

‘आम्ही सारे लेकुरवाळे’ - पवार मसाले = हास्यस्फोट
लेखक-दिग्दर्शक संतोष पवार हे सध्या मराठी व्यावसायिक रंगभूमीचे एकमेव तारणहार आहेत. खाजगीत त्यांना आणि त्यांच्या नाटकांना ‘थिल्लर’ म्हणून हिणवणारे बडे बडे नाटय़निर्मातेही मंदीचा कठीण समय येता संतोष पवार यांच्याच आश्रयाला जाताना दिसत आहेत. यावरून ‘पवार-महिमा’ किती अगाध आहे, याची कल्पना यावी. खुद्द संतोष पवार हे मात्र ‘कुणी निंदा, कुणी वंदा, करमणूक करणं हाच माझा धंदा’ या आपल्या ब्रीदावर ठाम आहेत.

पॅकेजिंग नवे, माल जुनाच!
मराठी प्रेक्षकांचे मानसिक वय १० आहे, त्यांना काहीही चालते, चार विनोदी कलाकार एकत्र आणायचे, त्यांच्यात फिरणारे एक कथानक गुंफायचे, आठ विनोदी प्रसंग टाकायचे, भरत जाधवला चार वेगवेगळ्या वेशभूषा चढवून विविध आवाज काढायला लावायचे.. आणि एक विनोदी चित्रपट तय्यार अशी मानसिकता अलीकडे दिसून येत आहे. त्याच मानसिकेतून ‘जावईबापू झिंदाबाद’ चित्रपट तयार झाला आहे.सलमान खान व करिश्मा कपूर यांचे एकमेकांवर प्रेम असते. करिश्मा कपूरच्या तीनही मामांना (परेश रावल, ओम पुरी, अनुपम खेर) यांना आपापल्या पसंतीनुसार जावई निवडायचा असतो.

मिशन मानवता रॅली
एक मूठ माती, फुलेल सृष्टी मानवतेची

पोलादपूर- महाडदरम्यान मानवतेचा कलश वाहून नेणारं वाहन थांबवलं जातं, ८२ वर्षांची एक वृद्ध महिला मानवता कलशात एक मूठ माती अर्पण करते, कलशासोबतच्या युवकांना सांगते, ‘‘मुलांनो, मी ८२ उन्हाळे-पावसाळे पाहिले, आजवर भारतावरची सर्व आक्रमणं या मानवता धर्माने परतवून लावली आहेत, आता हा मानवतेचा संदेश तुम्हीच पुढे न्यायचा आहे.’’ मिशन मानवता रॅलीतला हा अनुभव सर्वच युवकांना एक अनोखी प्रेरणा देऊन जातो. किंबहुना त्यांच्यातली मानवतेची भावना आणखीनच दृढ करतो आणि त्यांच्या अनोख्या प्रचारकार्याला बळकटी मिळवून देतो.

मसाकली म्हणजे नेमकं काय?
काय अर्थ आहे या शब्दाचा ?

पण खरं तर अर्थाशी कोणाला काही देणे घेणे आहे काय ? आज छोटय़ा-छोटय़ा मुलांच्या तोंडी हा शब्द रुळला आहे. तरुण पिढीही ‘मसाकली उड मटाकली’ या गाण्याच्या प्रेमात पडली आहे. थेट २० वर्षांंपूर्वीचं ‘कबुतर जा जा’ गाणं आठवतंय? अगदी त्या गाण्यासारखी क्रेझ मसाकलीने टीव्हीवरील पहिल्या ‘प्रोमो’पासून निर्माण केली आहे. गेल्या दोन दशकांत हिंदी गीत- संगीतात, प्रसिद्धीच्या तंत्रात, पडद्यावरल्या सादरीकरणात,गीतांच्या शब्दांत एवढा बदल झालाय, की ते पूर्वीचं कबुतरसुद्धा आज ‘मसाकली’ हे नाव घेऊन गाण्यात अवतरलंय.. !

टीव्हीला पर्याय, टीव्ही बंदचा..
टीव्ही बंद करा आणि जगणं सुरू करा.. असे म्हटले की, सगळेजण समोरच्या व्यक्तीला नक्कीच मूर्खात काढतील. पण हे शक्य आहे, आणि ते सत्यातही उतरले आहे. अनेक सुजाण पालकांना या मार्गाचा अवलंब करुन आपल्या पाल्याचे भविष्य योग्य वळणावर नेण्यास सुरूवात केली आहे. हे सर्व शक्य झाले आहे ते महेश गोरडे यांच्या टीव्ही बंद अभियानातून.टीव्हीतील कार्यक्रमांमधील जे जे वाईट ते ते सर्व विसरुन आचरणात आणण्याचा गुण जर तुमच्यात असेल तर या आंदोलनात सहभागी होऊ नका अन्यथा तुम्ही तुमच्या आयुष्यातील १५ वष्रे वाया घालवाल असे गोरडे यांनी सांगितले आणि अनेक सुजाण पालकांनी या अभियानात आपला सहभाग नोंदविला.मुलं टीव्ही पाहतात, आमची मुलं टीव्ही समोरुन ते उठतच नाहीत अशा एक ना अनेक तक्रारी पालक आपल्या मुलांच्या बाबतीत करीत असतात.

अवघा मराठी एकचि झाला!
अमेरिकेत आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर फिलाडेल्फियात बृहन्महाराष्ट्र मंडळाचे चौदावे अधिवेशन २ ते ५ जुलै दरम्यान होते आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. मात्र अनिवासी भारतीयांच्या नोकऱ्यांना जागतिक आर्थिक मंदीची झळ फारशी सोसावी लागणार नाही, हे वास्तव आहे. खुद्द बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष गिरीश ठकार यांनीच अलीकडेच पुण्यात झालेल्या या विषयावरील परिसंवादात या वास्तवाचा उलगडा केला. त्यामुळे सातासमुद्रापलिकडे होणाऱ्या या चौदाव्या मऱ्हाटी सोहळ्याचे रंग आधीच्या संमेलनांइतकेच किंबहुना त्याहूनही अधिक उत्कट असेच असणार आहेत !

‘आम्हाला बुवा यातच जगायचंय’ सवरेत्कृष्ट
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयातर्फे आयोजित ५६ व्या नाटय़स्पध्रेची प्राथमिक फेरीची नुकतीच पार पडली. उल्हासनगर केंद्राच्या ‘आम्हाला बुवा यातच जगायचंय’ या नाटकाने सवरेत्कृष्ट निर्मितीचे पारितोषिक पटकावले. ‘आनंद तरंग’ (का. क. केंद्र, कुडाळ), ‘मेन रोल’ (का. क. भवन, विक्रोळी) या नाटकांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. ‘बळी’ (शहाड केंद्र) आणि ‘भैरवी’ (चिपळूण केंद्र) यांची उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी निवड झाली. अक्षय असलेकर, विवेकानंद पारकर , राम दौण्ड यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम तीन क्रमांक मिळाले. उत्कृष्ट अभिनय पुरुष गटात नंदकुमार पाटील, संदीप जाधव, दिनेश सावंत, तर महिला गटात प्राजक्ता आठवले, पूनम कांबळे, मिताली हळदणकर यांना उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम तीन क्रमांक मिळाले. दत्ता गायकर यांना ‘उद्ध्वस्त चिमणी’ या नाटकाबद्दल उत्कृष्ट नाटय़लेखनाचे पारितोषिक मिळाले. अनंत घोगळे, मनोहर सुर्वे व प्रतिभा पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.