Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

व्यापार - उद्योग

इंडियन मशीन टुल्सचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन
व्यापार प्रतिनिधी : या ऑक्टोबरमध्ये मिलान इथे भरणारे, धातुकाम विश्वाला वाहिलेले सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, इमो मिलानो २००९ संघटनेने, सहा वर्षांनंतर इटलीला परतणाऱ्या प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्टय़े प्रस्तुत करण्यासाठी, आयएमटीईक्स आणि टुलटेक २००९ या भारतातील, इंडियन मशीन टुल प्रदर्शनाची निवड केली आहे. सीईसीआयएमओ (युरोपियन कमिटी फॉर को-ऑपरेशन ऑफ द मशीन टुल इंडस्ट्री) यांनी पुरस्कृत केलेले जगभरातील कारखानदार (मॅन्युफॅक्चरिंग) उद्योगात कार्यरत असणाऱ्यांसाठी ईमो हे महत्त्वपूर्ण प्रदर्शन असून, हे पहिल्यांदाच न्यू मिलान एक्झिबिशन सेंटर, फायरामिलानो येथे भरविण्यात येणार आहे.

दीपक पारेख २००८ सालचे आऊटस्टँडिंग बिझनेस लीडर; तर रिलायन्स इंडस्ट्रीज आऊटस्टँडिंग कंपनी
व्यापार प्रतिनिधी : सीएनबीसी-टीव्ही १८ इंडिया बिझनेस लीडर अ‍ॅवॉर्डस् २००८ सोहळ्यामध्ये अ‍ॅक्सेंचरतर्फे एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांना आऊटस्टँडिंग बिझनेस लीडर, रिलायन्स इंडस्ट्रीज लि.ला आऊटस्टँडिंग कंपनी, आमीर खान यांना एन्टरटेन्मेंट बिझनेस लीडर, उदय कोटक यांना सीएनबीसी आशियाचा इंडिया बिझनेस लीडर ऑफ द इयर, या पुरस्कारांनी गौरवण्यात आले, तर कमलनाथ यांना उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. कॉर्पोरेट विश्वातील मंडळींचा गौरव करण्यासाठी पुरस्कार सोहळ्याला भारतीय उद्योगजगतातील नामवंत व्यक्ती आवर्जून उपस्थित होत्या.

रुस्तुमजी इस्टेटचा विरारमध्ये २१७ एकरमध्ये घरांचा प्रकल्प
व्यापार प्रतिनिधी : गृहनिर्माण क्षेत्रातील प्रीमियर ब्रँड म्हणून ओळखल्या गेलेल्या रुस्तुमजी इस्टेटने आता सर्वसामान्यांना परवडणाऱ्या गृहनिर्मिती क्षेत्रात आता पाऊल टाकले असून विरार स्टेशनपासून दोन कि.मी. अंतरावर २१७ एकर विभागात परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बोमन ईराणी यांनी दिली. रुस्तुमजीसारख्या नामवंत बिल्डरना मंदीमुळे असा प्रकल्प सुरू करावे लागत आहे का? असे विचारले असता ते म्हणाले की, आजपर्यंत गोरेगाव, मालाड, दहिसरसारख्या पश्चिम उपनगरात आम्ही अनेक उत्कृष्ट सोयीसुविधांनी युक्त गृहनिर्माण प्रकल्प उभारले आहेत. आताचा विरारमधील प्रकल्पही अशा सर्व अत्याधुनिक सुविधांनीच उपलब्ध असेल.

सतीश परब यांना ‘सी.ओ.टी.’चा बहुमान
व्यापार प्रतिनिधी : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे आघाडीवर असलेले एजंट सतीश परब यांना २००९ सालचा ‘ग्रेड-वन’ असा ‘कोर्ट ऑफ दि टेबल’ (उ.ड.ळ.) चा बहुमान मिळालेला आहे. अधिकाधिक ‘प्रीमियम’ मिळविणाऱ्यांना हा मान दिला जातो. या मानामुळे सतीश परबना जागतिक स्तरावरील ‘मिलियन डॉलर टेबल’ परिषदेला उपस्थित राहता येईल. ही परिषद दरवर्षी कॅनडा वा अमेरिकेत भरत असते. अत्यंत कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन आयुर्विमा एजंट म्हणून त्यांनी हे यश प्राप्त केले आहे.

अलेम्बिकची विक्री आठ टक्क्यांनी वाढली
व्यापार प्रतिनिधी : आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी अलेम्बिक लिमिटेडने आज ३१ डिसेंबर २००८ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीमध्ये महसुलात गतवर्षीच्या याच काळाच्या तुलनेत आठ टक्क्यांची वृद्धी नोंदविली असून तो २८५.९७ कोटी रुपये झाला आहे. गतवर्षी याच काळात तो २६५.२६ कोटी रुपये होता. कंपनीने गतवर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत ३०.२२ कोटी रुपये ईबीडीआयटीए नोंदविला असून गतवर्षी याच कालावधीत तो ३१.६३ कोटी रुपये होता.कंपनीने तिसऱ्या तिमाहीत २.०८ कोटी रुपयांचा फायदा नोंदविला असून गतवर्षी याच तिमाहीत तो ४२.०२ कोटी रुपये (त्यात जमिनीच्या विक्रीवर झालेल्या २२.५५ कोटी रुपयांचा समावेश) होता आणि त्याचे कारण कर्मचाऱ्यांवरील वाढलेला आणि विक्रीचा खर्च हे होय. गंगाजळीमध्ये जी घट झाली आहे त्यामुळे व्याजावर करण्यात आलेला खर्चही खूप मोठा होता. कंपनीने चालू तिमाहीमध्ये गुंतवणुकीतील ७.५२ कोटी रुपयांच्या झालेल्या घटीसाठी प्रयोजनही केले आहे. स्थानिक फॉम्र्युलेशन व्यवसायाने महसुलामध्ये १२ टक्क्यांची वृद्धी नोंदविली असून तो १७०.८८ कोटी रुपये एवढा झाला आहे. गतवर्षीच्या याच काळातील तिमाहीमध्ये तो १५२.१२ कोटी रुपये एवढा होता.

काळेच्या महसुलात २६ टक्क्यांनी वाढ, निव्वळ नफा ७९ टक्क्यांनी वाढला
व्यापार प्रतिनिधी : एअरलाईन, लॉजिस्टिक आणि ट्रॅव्हल (एएलटी) उद्योगाचा आघाडीचा सेवा प्रदाता असलेल्या काळे कन्सल्टंट लिमिटेडने ३१ डिसेंबर २००८ रोजी संपलेल्या तिमाहीत २५१.२७ दशलक्ष रु. इतका महसूल नोंदवला आहे तर याच्या तुलनेत मागील वर्षीच्या याच कालावधीत १९९.८७ दशलक्ष रु. इतका नोंदवण्यात आला होता. म्हणजेच यामध्ये २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. करपश्चात नफा १४.७९ दशलक्ष रु. इतका नोंदवण्यात आला असून मागील वर्षी याच कालावधीत ८.२६ दशलक्ष रु. इतका करपश्चात नफा होता. म्हणजेच मागील वर्षीपेक्षा ७९ टक्क्यांनी वाढ दिसून आली. ३१ डिसेंबर २००९ रोजी संपत असलेल्या तिमाहीतील एकूण मिळकत ३६८.६६ दशलक्ष रु. इतकी असून मागील वर्षी याच कालावधीत २८६.७८ दशलक्ष रु. इतकी एकूण मिळकत जमा झाली होती. म्हणजेच ही वाढ २९ टक्क्यांएवढी आहे. या वर्षीचा एकूण करपश्चात नफा ३८.१४ दशलक्ष रु. व डिसेंबर २००८ रोजी संपत असलेल्या नऊ महिन्यांमध्ये एकूण महसूल १०६७.७५ दशलक्ष रु. तर मागील वर्षी याच कालावधीत ८८२.९३ दशलक्ष रु. इतका होता म्हणजेच २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संघवी मूव्हर्सच्या तिमाही विक्रीत वाढ
व्यापार प्रतिनिधी : भारतातील क्रेन व्यवसायात आघाडीवर असलेल्या संघवी मूव्हर्स लिमिटेड कंपनीने ३१ डिसेंबर २००८ रोजी समाप्त वित्तीय तिमाहीत ३९ टक्के वाढीने रु. ८८.४ कोटी विक्री उत्पन्न मिळवले आहे. गतसाली याच तिमाहीत कंपनीने रु. ६३.५१ कोटी उत्पन्न मिळवले होते. या उत्पन्नावर कंपनीने ३५ टक्के वाढीने रु. २३.९ कोटी निव्वळ नफा कमावला आहे. गतसाली या तिमाहीत कंपनीने रु. १७.७६ कोटी नफा कमावला होता. यामुळे कंपनीची प्रतिसमभाग मिळकत (ईपीएस) रु. ५.५३ झाली आहे. तसेच गत नऊमाहीत संघवी मूव्हर्स कंपनीने ५१ टक्के वाढीने रु. २६०.९ कोटी उत्पन्न कमावले आहे. गतसाली या कंपनीने रु. १७२.५ कोटी उत्पन्न मिळवले होते. या उत्पन्नावर कंपनीने ५४ टक्के वाढीने रु. ७५.५ कोटी निव्वळ नफा कमावला आहे. गतसाली याच नवमाहीत रु. ४९.०३ कोटी नफा कमावला होता.

आशियातील सर्वात मोठय़ा रबर एक्स्पो २००९ मध्ये लँक्सेस इंडियाचा सहभाग
व्यापार प्रतिनिधी : कोलकाता येथे सुरू होणाऱ्या रबर एक्स्पो २००९ मध्ये लँक्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपले रबर आणि पॉलिमर तंत्रज्ञान प्रकट करील. हे प्रदर्शन म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बंधूंना, उपलब्ध अद्यतन प्रगतीसह या क्षेत्रातील जागतिक उद्दिष्टप्राप्ती आणि कल यांचा अनुभव घेण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि देशातील प्रतिनिधी डॉ. जोर्ग स्ट्रॉसबर्गर म्हणाले, ‘‘इंडियन रबर एक्स्पो २००९ हे रबर उद्योगातील नवीन आव्हाने आणि संधी यासाठी स्वत:ला प्रेरित करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ आहे. यासारखे पुढाकार रबर उद्योगाला बळ देणारे उत्प्रेरक आहेत आणि ते या आव्हानाच्या काळात एक जोरदार साधन म्हणून काम करते. इंडियन रबर एक्स्पो २००९ सर्व आशियाई देशांना एकत्र काम करण्यासाठी, संधीचा फायदा घेण्यासाठी संयुक्त शक्ती वापरण्याची धोरणे- जी फार आवश्यक आहेत, कारण आज आशियाई बाजारपेठा या रबराच्या दुसऱ्या सर्वात मोठय़ा ग्राहक आहेत.

दक्षिण आशियातील सर्वात मोठय़ा वॉटर एक्स्पोमध्ये लँक्सेस इंडियाचा सहभाग
व्यापार प्रतिनिधी : लँक्सेस इंडिया प्रा. लि. एक स्पेशालिटी केमिकल्स कंपनी, दक्षिण आशियातील सर्वात मोठय़ा- नवी दिल्ली येथे जानेवारी २८ ते ३० च्या दरम्यान होणाऱ्या ६ व्या एव्हरीथिंग अबाऊट वॉटर- वॉटर एक्स्पोमध्ये आपली उच्च कामगिरी करणारी एक्स्चेंज रेझिन्स प्रदर्शित करील. एक्स्पोचे आयोजन इए वॉटर प्रायव्हेट लिमिटेडने केले आहे जे पाणी आणि सांडपाणी विभागात माहितीचे योगदान देईल. या एक्स्पोमध्ये पाणी उद्योगाच्या क्षेत्रातील अद्यतन तंत्रज्ञान, उत्पादने आणि पद्धतीच्या विस्तृत श्रेणीचा समावेश असेल. या एक्स्पोसाठी मुख्य चिंतेचा विषय म्हणजे उद्योगांसाठी पाणी आणि सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, कारण तो खर्च कमी करण्याची आणि प्रभाव वाढविण्याची प्रचंड संधी देतो. ६ व्या एव्हरीथिंग अबाऊट वॉटर एक्स्पो २००९ साठी लॅक्सेस इंडिया प्रा. लि.चे आयन एक्स्चेंज रेझिन्स बिझिनेस युनिट सहभागी होईल.