Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

‘टेकफेस्ट’च्या गावा जावे..
य मन्या कसा गेला मागचा वीकेण्ड?’’
‘‘एकदम झक्कास!’’
‘‘का रे तीन दिवस सुटी आली म्हणून फॅमिलीसोबत कुठं टूर ला वगैरे गेला होता का?’’
‘‘नाही रे राजू, तुझ्यासारखं थोडंच आमचं, सामान उचलायचं अन् जायचं एखाद्या रिसॉर्टवर.’’
‘‘मग, घरात बसून झक्कास कसा गेला तुझा वीकेण्ड!’’
‘‘नाही, टेकफेस्टमध्ये घालवला मी माझा मागचा वीकेण्ड.’’
‘‘टेकफेस्ट! ते आयआयटीमध्ये होतं ते. सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी येतात तिथं, अरे, मया तुझा काही संबंध तरी आहे का त्याच्याशी? मला ना खूप हसायला येतंय. तू खरंच बोलतोय का माझी खेचतोयस.’’
‘‘ हो, बाळा, मी खरं बोलतोय. तिथं जायचं असेल तर तुमचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी काही ????संबंध हवा असे काही नाही. फक्त तुम्हाला त्याची आवड पाहिजे अथवा तेथील नवीन गोष्टी जाणून घ्यायची इच्छा पाहिजे. ’’

दिल से..
प्रिय सायनी,
नमस्कार सवाई अभिनेत्री! अभिनंदन.. मी मिहीर, तुझा मित्र.. ओळखतेस ना? हल्ली दिल्लीला असतो. नाही सहजच विचारतोय. काय तुम्ही आता मोठे लोक झालात यार.. रोज बक्षीसजिंकताय. त्यात परवा ‘लक बाय चान्स’ हा मुवी पाहिला, जुन्या मित्राला विसरला असाल तर.. म्हटलं आठवण करून द्यावी, असो.. अगं माझी प्रोजेक्ट सबमिशन्स चालू होती. त्यामुळे बऱ्याच उशिराने पत्राचं उत्तर लिहायला बसतोय.
दिल्लीत आता थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. आजवर फक्त ऐकत होतो ‘दिल्ली की सर्दी’ म्हणून आता ती अनुभवताना जाम मजा येतेय. सालं इकडचं वातावरणच मुळी वेगळं आहे. एक वेगळाच थाट आहे या शहराचा. देशाची राजधानी असल्याने व या सम्यांचं अंतिम ध्येय दिल्लीचं तख्त असल्याने व त्यांच्या दिमतीसाठी सक्त पोलीस पहारा असल्याने आपसूक तुम्हालाही ते कवच मोफत.