Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

लालूंच्या रेल्वेतील ‘चालू’ घडय़ाळे
प्रतिनिधी

चर्चगेट स्थानकातून रात्री ९.४६ वाजता निघालेली अंधेरी धीमी लोकल चक्क रात्री ९.४५ वाजता मरिन लाइन्स स्थानकात पोहोचल्याचा अनुभव आजकाल पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना वारंवार येत आहे. पश्चिम रेल्वे स्थानकांवर बसविलेल्या डिजीटल घडय़ाळांनी ताळतंत्र सोडल्याने प्रवाशांना एकाच स्थानकातील दोन फलाटांवर वेगवेगळ्या वेळा दिसत आहेत. अनेकदा एकाच फलाटावरील दोन घडय़ाळांतील वेगवेगळ्या वेळा पाहिल्यानंतर प्रवाशांना ही घडय़ाळे नक्की ‘चालु’ आहेत की ‘चालू’ आहेत, असा प्रश्न प्रवाशांना पडतो.

सुमारे ४४ वर्षांपूर्वी ‘नाथा कामत’ होऊन गेला. ‘गेला’ म्हणणे चुकीचे ठरेल. त्या आधीही तो होता, आणि आजही तो आहे. फक्त त्या वेळी पु. ल. देशपांडे यांनी आपल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातून नाथाला जगासमोर आणले. ‘चेंज इज कॉन्स्टन्ट’ या नियमाला ‘नाथा कामत’ मात्र अपवाद आहे. तो कॉलेजमध्ये आहे, कॉल सेंटरमध्ये आहे, जस्ट पासआऊट होऊन एखाद्या आयटी कंपनीत कामाला लागला आहे आणि आता तर तो शाळेतही ‘पाळण्यातले पाय’ दाखवू लागला आहे.

‘म्हाडा’ची घरे
दलालांचा घोडेबाजार जोरात
आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन

प्रतिनिधी

म्हाडाच्या मुंबईतील सुमारे तीन हजार ८६३ घरांसाठी तब्बल दोन लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले असून येत्या ७ फेब्रुवारीपर्यंत ही संख्या तीन ते साडेतीन लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर म्हाडातील दलालांनी जोरात मोर्चेबांधणी सुरू केली असून अनेकजण दलालांच्या आमीषाला बळी पडल्याची चर्चा आहे. हे दलाल म्हाडाचे घर मिळवून देण्याचे खुलेआम आश्वासन देत आहेत.

जपानी ‘वूडकट'चा भारतीय अविष्कार!
प्रतिनिधी

‘वूडकट' अर्थात लाकडावरील मुद्राचित्रांमध्ये स्वतंत्र शैली निर्माण करून देश विदेशात ख्याती मिळविलेले बुजुर्ग कलावंत दामोदर पुजारे यांच्या मुद्राचित्रांचे ‘इम्प्रेशन्स' या शीर्षकाचे प्रदर्शन १ फेब्रुवारीपासून नीताई- गौराज कलादालनात भरले असून यानिमित्ताने या मूळ जपानी कलाप्रकाराचा भारतीय अविष्कार रसिकांना पाहता येणार आहे. ‘वूडकट' हा मूळचा जपानी कलाप्रकार. तुलनेने मऊ लाकडावर कोरीव काम, रंगलेपन करून त्यातून ही चित्रकृती साकारली जाते.

हेरॉइनचा असाही तस्कर
‘आम्हाला हेरॉइन पुरविणारा एक बडा पोलीस अधिकारी आहे.. ’, असे दहशतवादविरोधी पथकाला एका आरोपीने सांगितले तेव्हा क्षणभर तपास अधिकारी सुनील माने यांचा विश्वासच बसला नाही. परंतु हेरॉईन प्रकरणात अटक केलेल्या आरोपीकडून पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली तेव्हा मात्र कारवाईसाठी सापळा रचण्यावाचून पर्याय उरला नाही. पावणेदोन किलो हेरॉइन सापडल्यामुळे दहशतवादविरोधी पथकाच्या जाळ्यात अडकलेल्या विकी ओबेराय आणि हरयाणातील पोलीस शिपाई राजेश कुमार याच्या चौकशीत या बडय़ा पोलीस अधिकाऱ्याचे नाव आले.

१० मात्रांच्या झपतालातील बहारदार पेशकारा..
तबला हे वाद्यच असे आहे की त्याची मोहिनी आबालवृध्दांपासून सर्वांना असते. कारण स्वर आणि त्याच्याशी निगडित असलेले काव्य कितीही विकसित करून गायचे म्हटले तरी त्याला जर तालाचे व मात्रांचे बंधन नसेल तर ते बांधेसूद होणार नाही. संगीतकार दशरथ पुजारी याबाबत नेहमीच आपले अनुभव स्पष्टपणे सांगायचे. ते म्हणायचे की एखाद्या गाण्याची निर्मिती रसिक समजतात तशी मुळीच नसते. त्यातली वाद्यांची निवड, सुरावटींचे तुकडे, मुख्य चाल आणि हरकती हे सर्व मागाहून येते. काव्य हातात पडले म्हणजे त्याचे वजन काय आहे हे संगीतकार प्रथम तपासून बघतो.

वसुंधरेसाठी..
जगभरातील सगळ्याच लोकांना सध्या ग्लोबल वॉर्मिगचे विपरित परिणाम भोगावे लागत आहेत. हवामान बदलामुळे जगभर अनेक नैसर्गिक आपत्तींना माणसाला तोंड द्यावे लागत आहे. ‘क्लायमेट चेंज’चा अभ्यासही जागतिक पातळीवर सुरू आहे. जंगलतोडीमुळेही मानवजातीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वेगवेगळ्या पातळीवर या विषयाचा गांभीर्याने अभ्यास करून ग्लोबल वॉर्मिगमुळे निर्माण होणारी परिस्थिती कशी आटोक्यात आणता येईल याबाबत संशोधक, हवामानतज्ज्ञ, शास्त्रज्ञ एकत्र येऊन अभ्यास तसेच चर्चा विनिमय करीत आहेत.

मुंबई मलनि:सारण प्रकल्पाचा दुसरा टप्पा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन
किरण कोळी यांचा इशारा
प्रतिनिधी

मढ ते गोराई या सागरी पट्टय़ातीस सुमारे लाखो मच्छिमारांना उध्वस्त करणारा मुंबई मलनि:सारण प्रकल्पाचा दुसरा टप्पा पालेकने त्वरित रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मढ-गोराई मच्छिमार संघर्ष समितीचे सरचिटणीस व युवा मच्छिमार नेते किरण कोळी यांनी दिला आहे. समितीच्या वतीने या प्रकल्पाच्या विरोधात नुकताच ‘आयएनएस हमला’ ते मार्वे बंदरापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. यात मढ, पातवाडी, भाटी, एरंगळ, धारवली, अक्सा, मालवणी, मार्वे, मनोरी व गोराई येथील मच्छिमार समाज मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता. या वेळी त्यांनी मुंबई मलनि:सारण प्रकल्पाचा दुसरा टप्पा रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसोबत राज्य शासनाने मासळी दुष्काळ जाहीर करण्याची, मालाड येथील साईनाथ मासळी बाजारातील खासगी व्यापाऱ्यांचे घाऊक परवाने रद्द करावे, वांद्रे बंदर समूह कार्यालयामार्फत फायबर नौका नोंदणी प्रमाण पत्रावर १० वर्षांची मुदत टाकणाऱ्या प्रसाद या मुख्य अधिकाऱ्याची बदली करावी या मागण्या करण्यात आल्या. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रभाकर कोळी, आ. पी. यू. मेहता, रामभाऊ पाटील, राजहंस टपके, दिगंबर वैती, हरेश्वर कोळी, अ‍ॅड. किशोर सुत्राळे, सतीश चवाटे, रामदास संधे, सुनील कोळी, पर्यावरण तज्ज्ञ व कायदेपंडित बी. आर. देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.