Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

संशयास्पद ट्रक पकडण्यात पोलिसांना यश
* अडथळे तोडणाऱ्या ट्रकवर पोलिसांचा गोळीबार
* औरंगाबादपासून सुरू झालेल्या थरारनाटय़ाची येवल्याजवळ अखेर
वार्ताहर / येवला

औरंगाबाद, शिऊर व वैजापूरच्या पोलिसांनी रस्त्यावर उभे केलेले अडथळे न जुमानता सूसाट पुढे जाणारा क्षमतेपेक्षा अधिक माल भरलेला ट्रक सुमारे तीन तासाच्या पाठलागानंतर येवल्याजवळ पकडण्यात पोलिसांना यश आले. ट्रकला थांबविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चालक जखमी झाला असून ट्रकचे मागील टायर फुटले. छत्तीसगडचा चालक व त्याच्या मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अवैध फलकांविरोधात कारवाईची मागणी
वार्ताहर / अमळनेर

सांस्कृतिक वारसा जोपासणाऱ्या अमळनेर शहराला गेल्या दोन वर्षांपासून जाहिरात फलकांनी वेढले असून त्यातील काही फलकांची कालमर्यादा संपुष्टात आली असली तरी ते आज विद्रुपीकरणास हातभार लावत असल्याची तक्रार केली जात आहे. अनधिकृतपणे झळकणाऱ्या फलकांवर नगरपालिकेने कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र युवा फेडरेशनने केली आहे. होर्डिग्ज लावण्यावरून खून, दंगल अशा घटना वर्षभरात झाल्या असताना डिजिटलच्या तंत्राने नवी फलक संस्कृती उदयास आल्याचे दिसते.
या थरारनाटय़ास सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सुरूवात झाली. औरंगाबाद ग्रामीण नियंत्रण कक्षाकडून निर्देश मिळाल्याने औरंगाबाद छावणी पोलिसांनी संशयित ट्रकला अडविण्यासाठी महामार्गावर अडथळे उभे केले.

यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे दरोडय़ातील मृत्यू झाल्याचा आरोप
शेंदुर्णीतही घरफोडय़ांचे सत्र
वार्ताहर / जळगाव
जिल्ह्य़ात फैजपूर-खिरोदा या यावल तालुक्यातील रस्त्यावर शुक्रवारी रात्री रस्ता लूट व दरोडय़ात एकाचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या मुलाने मृत्यूस शासकीय यंत्रणेतील दिरंगाई, कायदा व सुव्यवस्था जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. भुसावळच्या प्रांत कार्यालयात लाचखोरीमुळे वेळ लागला नसता तर वडिलांचा बळी गेलाच नसता, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शेंदुर्णीतही एकाच रात्रीतून अनेक घरफोडय़ा झाल्याने नागरीक हादरले आहेत.

धुळ्यात सूर्यनमस्काराचे एकत्रित प्रात्यक्षिक
वार्ताहर / धुळे

येथील मिनी स्टेडियममध्ये आज सूर्य नमस्काराचे एकत्रित प्रात्यक्षिक करण्यात आले. क्रीडाभारती व जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे, महापौर मोहन नवले, आ. जयकुमार रावल, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूर्य नमस्कार कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चारासह सूर्याची आराधना केली. प्रत्येकी तेरा सूर्यनमस्कार घालण्यात आले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल, क्रीडा भारती देवगिरी विभागाच्या उपाध्यक्षा इंदुमती घुगरी, धुळे जिल्हा क्रीडा भारतीचे अध्यक्ष ओमप्रकाश खंडेलवाल उपस्थित होते. प्रा. बी. बी. बारसे यांनी प्रास्ताविक केले. सुरेश खरे यांनी सूत्रसंचालन केले.

पारोळा बाजार समितीवर सेना-भाजपचे वर्चस्व
वार्ताहर / पारोळा

शिवसेना-भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १६ जागाजिंकून पारोळा बाजार समितीवर वर्चस्व सिद्ध केले. बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान सभापती व उपसभापतींना पराभव सहन करावा लागला. जळगाव जिल्ह्य़ाचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनल विरूध्द सेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात लढत झाली. शेतकरी पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे- अमोल पाटील (४६३), गोविंद पाटील (४२४), चतुर पाटील (४३१), पंढरीनाथ पाटील (३९१), बापू पाटील (४११), विजय पाटील (४१२), सुभाष पाटील (३९६), विजया पाटील (४३६), संगीता पाटील (४०३), दगडू पाटील (४३१), पोपट वंजारी (४५८), दिलीप पाटील (३१७), प्रकाश पाटील (३०८), धोंडू वाघ (३१४), रोहिदास पाटील (३१३), वसंत वाणी (६४), सुभाष वाणी (४९),
पांडुरंग पाटील (१२५). निकाल जाहीर झाल्यानंतर सेना-भाजपच्या समर्थकांनी मिरवणूक काढून एकच जल्लोष केला.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास ‘नॅक’ची ‘बी’ श्रेणी
वार्ताहर / जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला नॅशनल अ‍ॅसेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिल अर्थात ‘नॅक’ संस्थेकडून पुनर्मूल्यांकनात ‘बी’ मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यापीठाचे महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ. एस. बी. चिंचोलकर यांनी ही माहिती देताना विद्यापीठाचे ए मानांकन केवळ ०.१२ गुणांनी हुकल्याची खंत व्यक्त केली. आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी, सामाजिक शास्त्रे तसेच सुविधा केंद्राचे प्रमाण कमी, प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी, तसेच ग्रंथालयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिके व ग्रंथांची संख्या कमी असल्याच्या उणिवा नॅक समितीने दिल्या असून त्यांची पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत, असे चिंचोलकर म्हणाले.