Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

मराठी नाटकांतील सामाजिक-राजकीय प्रवाह
ब्रिटिशकालीन तसंच स्वातंत्र्योत्तर काळातील ‘मराठी नाटकाच्या इतिहासातील प्रमुख सामाजिक आणि राजकीय प्रवाह’ या विषयावरील संशोधन प्रकल्पाकरिता नाटककार मकरंद साठे यांना बंगलोरच्या इंडिया फाऊंडेशन फॉर द आर्ट्स या संस्थेची दीड वर्षांकरिता फेलोशिप मिळाली आहे. याअंतर्गत ते संशोधनावर आधारित प्रबंध लिहिणार नसून, डॉक्यूड्रामा स्वरूपातील काही संहिता त्यातून साकारण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी या फेलोशिपकरिता पाठविलेल्या मसुद्याचं हे संकलित व स्वैर रूप..
कुकुठल्याही कलेप्रमाणंच नाटक हेही अपरिहार्यपणे सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचंच असतं. ‘राजकीय’ म्हणताना त्याकडे दोन दृष्टीनं पाहता येईल. एक म्हणजे- कुठलंही नाटक हे त्या लेखकाचा सामाजिक-राजकीय दृष्टिकोनच मांडत असतं. त्या अर्थानं ते एक प्रकारे राजकीय विधान करीत असतं. मग ते विधान हेतुत: केलेलं असो वा नकळतपणे! या अर्थानं प्रत्येक नाटक हे राजकीय नाटकच ठरतं. दुसरं म्हणजे- ज्याच्या केद्रस्थानी राजकारण वा सत्ताकारण असतं, ते नाटक ‘राजकीय’ होय.

यशवंत हो!
लाघवं कर्मसामथ्र्य दीप्तोग्निमेंदस: क्षय:।
विभक्त घनगात्रत्वं मल्लखांबात उपजायते ।।

भारतीयांना पाश्चात्यांचे आकर्षण अधिक. पाश्चिमात्य राष्ट्रांमधून येणारे जे जे काही ते ते सर्व चांगले, अशी मानसिकताच निर्माण झाली आहे. क्रीडा क्षेत्रही त्यास अपवाद नाही. त्यामुळे अस्सल भारतीय खेळ मागे पडत असून विदेशी क्रीडा प्रकारांचे भूत मानगुटीवर बसल्यासारखी स्थिती आहे. जिम्नॅस्टिकसाठी अत्याधुनिक व्यायामशाळांमधून विशेष व्यवस्था करण्यात येत असताना त्यापेक्षा काकणभर सरस असलेल्या मराठमोळ्या मलखांबचा खुंटा मात्र हलताना दिसत आहे. त्यामुळेच मलखांबाची महती सांगणारा हा श्लोक शाळाशाळांच्या भिंतींवर लावण्याची गरज आहे. शासनाकडून दुर्लक्ष होत असतानाही विपरीत परिस्थितीत हलणारा हा खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न काही जण प्रयत्नपूर्वक करीत आहेत. यशवंत जाधव हे नाव त्यापैकीच एक.