Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

आता पोलीस वापरणार ‘चोरी प्रतिबंधक उपकरण’
प्राजक्ता कदम

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत गाडीचोरांचा उपद्रव मोठय़ा प्रमाणात वाढला असून त्याचा फटका खुद्द पोलिसांनाच बसला आहे. पंधरवडय़ाच्या आत अतिरिक्त महासंचालक तसेच दहशतवादविरोधी पथकाच्या कार्यालयीन गाडय़ा चोरीला गेल्याने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचे चांगलेच धिंडवडे निघाले. पोलिसांच्या गाडय़ाच जेथे सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्यांची सुरक्षा काय असणार, असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागला आहे. मात्र यातून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी आता गाडय़ांमध्ये ‘जीपीएस’ व्यवस्थेशी जोडलेले ‘चोरी प्रतिबंधक उपकरण’ (अ‍ॅण्टी थेप्ट डिव्हायसेस) बसविण्याचा निर्णय घेतला असून गाडी चोरीला गेली तरी या नव्या तंत्रामुळे ती शोधून काढणे पोलिसांना सहज शक्य होणार आहे.

‘हॉबी रोबोटिक्स’च्या विद्यार्थ्यांचे यश
नीरज पंडित

सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांनी मिश्र दुहेरी टेनिस स्पर्धा जिंकली ही आनंदाची बाब आहे. पण समजा आपल्यासमोर अशी बातमी आली की, महेंद्र सिंग धोनी आणि युवराजसिंग टेनिस स्पर्धेत विजयी झाले ही आपल्यासाठी केवळ आनंदाचीच नव्हे तर आश्चर्याची बातमी ठरेल. असेच काहीसे यंदाच्या ‘टेकफेस्ट’मध्ये मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. या विभागातर्फे हौशी विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या ‘हॉबी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड रोबोटिक्स’ या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी यंदाच्या रोबोवॉरमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

३ फेब्रुवारी
कधी शाळेत पहिला नंबर आला नाही, पण ‘व्हॅलेन्टाइन्स डे’च्या तयारीत माझा पहिला नंबर असतो. कॉलेजमध्ये बाकी कोणाला काही पडलेलेच नाही. मीच आपला धडपडतोय. स्लो अ‍ॅण्ड स्टेडी विन्स द रेस. त्यामुळे १० फेब्रुवारीला अचानक जागा होऊन तयारी करू लागलो तर पंचाईत होईल. आज सकाळी.. खरे तर पहाटे साडेसहाला बस स्टॉपवर गेलो. म्हटलं, अ‍ॅटमॉस्फिअर क्रिएशनची सुरुवात करता येईल.

पहिले दुर्ग साहित्य संमेलन राजमाचीवर
प्रशांत मोरे

गडकिल्ल्यांविषयी लिहिणारे लेखक, निरनिराळ्या गडांवर भ्रमंती करणारे हौशी पर्यटक, गिर्यारोहक, निसर्गप्रेमी आणि इतिहासाचा संदर्भ असणाऱ्या साहित्याविषयी आस्था बाळगणारे रसिक वाचक यांना एकत्र आणण्यासाठी ‘गोनीदा’ दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या राजमाची किल्ल्यावर येत्या १४ व १५ फेब्रुवारी रोजी पहिले दुर्ग साहित्य संमेलन भरविले जाणार आहे.

‘झी गौरव’ पुरस्काराची नामांकने जाहीर
प्रतिनिधी

मराठी चित्रपटांची संख्या २००८ सालात मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे ‘झी गौरव पुरस्कार २००९’च्या विविध स्पर्धा गटांत यंदा पाच मराठी चित्रपटांना नामांकने देण्यात आली आहेत. यंदाच्या नामांकनांमध्ये सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी ‘जोशी की कांबळे’, इंडियन पॅनोरमामध्ये दाखविण्यात आलेला ‘महासत्ता’, स्टार-स्क्रीन पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकाविलेला ‘मेड इन चायना’, ‘जोगवा’ आणि ‘घो मला असला हवा’ या चित्रपटांमध्ये स्पर्धा आहे.

‘झंडु आणि लोकसत्ता’ प्रस्तुत ‘आयुर्वेद अॅण्ड यू’ वाशीमध्ये
प्रतिनिधी

‘झंडु आणि लोकसत्ता’ प्रस्तुत ‘आयुर्वेद अॅण्ड यू’ कार्यक्रमाच्या मुंबई आणि ठाणे येथील यशस्वी आयोजनानंतर येत्या रविवारी ८ फेब्रुवारी २००९ रोजी सकाळी १० वाजता पुन्हा हा कार्यक्रम वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहामध्ये होत आहे.
के. ई. एम. रुग्णालयाचे डीन डॉ. संजय ओक आणि डॉ. रवी बापट हे मुंबई आणि ठाणे येथील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आजच्या युगासाठी आयुर्वेदाचे किती महत्त्व आहे, हे त्यांनी यावेळी उपस्थितांना पटवून दिले. वैद्य भी. के. पाध्ये-गुर्जर आणि वैद्य शं. पा. किंजवडेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मुंबई व ठाणे येथील उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेला ‘आयुर्वेद अॅण्ड यू’ हा कार्यक्रम आता खास विष्णुदास भावे येथे आयोजिण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, उपस्थितांनी आपल्या आरोग्याची माहिती कार्यक्रमस्थळी देण्यात येणाऱ्या प्रश्नावलीमध्ये भरून दिल्यास, कार्यक्रम संपल्यावर प्रकृतीची ओळख स्पष्ट करणारी ‘आरोग्य कुंडली’ विनामूल्य मिळणार आहे. ‘किडस् अॅण्ड युथ’साठी आयुर्वेद या विषयावर वैद्य प्रकाश ताथेड, वैद्य उदय कुलकर्णी आणि वैद्य मधुरा कुलकर्णी उपस्थितांबरोबर संवाद साधणार आहेत. तसेच या वेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. शिक्षण घेताना अनेक वेळा आपण कोण होणार याविषयी मनामध्ये विचारांचे काहुर माजलेले असते आणि मग एखाद्या आवडीच्या विषयामध्ये स्पेशलायझेशन करून करिअरची सुरुवात केली जाते; पण जसे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीस ताण-तणावांमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतो, कफ प्रकृती असणाऱ्याला सर्दी, ताप असे विकार संभवत असतात. या विकारांचा करिअरमधील प्रगतीसाठी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार करिअरची निवड केली तर भविष्यात असे प्रश्न निर्माण होत नाहीत. कफ प्रकृतीच्या लहान मुलांमध्ये आढळून येणारी सदी; वात प्रकृतीच्या मुलांमध्ये आढळून येणारी चिडचिड किंवा पित्त प्रकृतीच्या मुलांमधील नाकाचा घोणा फुटण्यासारखे आजार, यामुळे तरुणपणी कधी कधी, अस्थमा, डोकेदुखी आणि आम्लपित्तसारखे विकार जडलेले दिसून येतात. हे टाळण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून कोणते उपाय करता येणे सहज शक्य असते, यामुळे निरोगी आरोग्य मिळविता येते या विषयावर वैद्य उदय कुलकर्णी आणि वैद्य मधुरा कुलकर्णी स्लाइड शोच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. सोबत प्रकृतीची ओळख अगोदरच कळली तर करिअरची निवड असो किंवा व्यवहार करण्यासाठी आवश्यक असणारा संवाद सोबतच्या व्यक्तीची प्रकृती ओळखून तो यशस्वी कशा प्रकारे करता येतो ते दाखवून देणार आहेत.
‘झंडु आणि लोकसत्ता’ प्रस्तुत ‘आयुर्वेद अॅण्ड यू’ कार्यक्रमाचा लहान मुलांमधील आजार आणि तरुणपणी जुने झालेले विकार या विषयावर सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. यशवंत आमडेकर कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा जोगळेकर- कुलकर्णी करणार असून, कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. उपस्थितांना ऋतूमानानुसार कशा प्रकारे दिनचर्या करावी याची माहिती देणारी दिनदर्शिका विनामूल्य देण्यात येणार आहे.