Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

िपपरीत सफाईकर, जाहिरात कर आणि मलप्रवाह सुविधा करात वाढ
स्थायी समितीच्या बैठकीत ४०० कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता
िपपरी, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

करवाढ करण्यास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी विरोध दर्शविला असला तरी लोकप्रतिनिधींच्या गळी उतरवून सफाईकर, जाहिरात कर आणि मलप्रवाह सुविधा कराच्या वाढीस मान्यता मिळविण्याची कामगिरी पालिका प्रशासनाने बजावली. स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत बीआरटीच्या विविध कामांसाठी ४०० कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली.
स्थायी समितीच्या अध्यक्षा उषा वाघेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत करवाढीसंदर्भात पुन्हा चर्चा झाली. आयुक्त आशिष शर्मा यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेत्याची बैठक झाली होती. त्याच वेळी मागील वर्षीचे दर कायम ठेवण्याचा निर्णय झाला होता. आजच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीत याबाबतचे प्रस्ताव चर्चेसाठी आले असता सदस्यांनी करवाढीच्या विविध प्रस्तावांना तीव्र विरोध दर्शविला. तर, प्रशासनाने दरवाढीचे समर्थन केले. अखेर साफसफाई करात अडीच टक्के ऐवजी पाच टक्के, मलप्रवाह सुविधा कर चारऐवजी दहा टक्के, जाहिरात करात दहा टक्के वाढ करण्याची शिफारस स्थायी समितीने पालिका सभेकडे केली. मागील वर्षी असणारे दर

 

आगामी वर्षांसाठी कायम ठेवण्याची भूमिका घेत सदस्यांनी करवाढीचे इतर सर्व प्रस्ताव फेटाळले.
अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. याप्रसंगी शहर अभियंता एकनाथ उगिले, प्रशासन अधिकारी सुधाकर देशमुख, सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड, कार्यकारी अभियंता मदनमोहन सावळे आदी उपस्थित होते.
बीआरटीसाठी आवश्यक सर्व कामांसाठी ४०० कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून कमी व्याजदरात मिळणारे हे पैसे नाशिकफाटा ते वाकड आणि काळेवाडी ते देहू-आळंदी रस्ता या मार्गासाठी वापरण्यात येणार असल्याचे एकनाथ उगिले यांनी िपपरी पालिकेने जागतिक बँकेकडून प्रथमच कर्ज घेण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा अंतिम निर्णय येत्या पालिका सभेत (१३ फेब्रुवारी) घेतला येणार आहे, असे ते म्हणाले.