Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

छोटय़ा पडद्यावरील तुमच्या स्मृती जपण्यासाठी..
पुणे, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

आजच्या रिअ‍ॅलिटी शोज् आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग असलेल्या दूरचित्रवाणीच्या जगतात आपल्यापैकी अनेकांना छोटय़ा पडद्यावर झळकण्याची संधी प्राप्त झाली आहे. परंतु काही कारणाने या

 

खास क्षणांची दृश्य पाहणे आपल्याला शक्य न झाल्यास..
समजा तुमचा मुलगा वा मुलगी, भाची किंवा पुतण्या अथवा घरातील कुणीही ‘झी’ मराठीच्या ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमात मंचावर गाणे गात आहे आणि या स्पर्धेत तो किंवा ती ‘लिटल चॅम्प’ म्हणून विजेतीही बनली आहे. या सुवर्णक्षणांची एक ध्वनिमुद्रित प्रत तुम्हाला जतन करून ठेवावीशी वाटणार नाही काय? ई टीव्हीच्या ‘धूम-धमाका’मध्ये तुम्ही बहारदार ‘परफॉर्मन्स’ सादर केला आणि तो दहा-बारा वर्षांनी आपल्या नातलगांना दाखविण्याची तुमची इच्छा झाली तर?
चिंता करण्याचे काहीही कारण नाही. कारण आता एका फोनद्वारे हव्या त्या कार्यक्रमाची सीडीज तुम्ही मिळवू शकता. फक्त १९९ रुपये नाममात्र शुल्क देऊन.
दिवसाचे २४ तास आणि आठवडय़ाचे सातही दिवस प्रसारित होणाऱ्या विविध भाषांतील १३० वाहिन्यांचे नियमित स्वरूपातील रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. ‘ईशा मॉनिटरिंग सव्‍‌र्हिसेस’ असे या कंपनीचे नाव आहे. कंपनीची स्थापना १९९९ ची. प्रथम मुंबईस्थित असलेली ही कंपनी पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन तसेच पुणेकरांच्या सांस्कृतिक प्रेमापोटी पुण्यात आली आहे. ही कंपनी पुणेकरांना स्थानिक वाहिन्यांसहित इच्छित कार्यक्रमाची प्रत मिळवून देणार आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या बातम्या, जाहिरातींचे ग्राहकांच्या विशिष्ट गरजांनुसार ईशाद्वारे निरीक्षण केले जात आहे. हे चित्रण ग्राहकांपपर्यंत सीडी, व्हीसीडी, डीव्हीडी किंवा एफटीपीवर एमपीईजी १/२, डब्ल्यूएनव्ही, एफएलव्ही या स्वरूपात पोहोचवले जात आहे.
या व्यतिरिक्त वृत्तपत्रे आणि ऑनलाईन मॉनिटरिंगच्या सेवा, ऑडिओ क्लिपला वर्ड फॉरमॅटमध्ये रूपांतरित करणारी ट्रान्सक्रिप्ट सेवा तसेच उद्योग क्षेत्रांवर आधारित रिपोर्ट्स आणि विश्लेषणाच्या सेवाही पुरविल्या जात आहेत.
या सेवेबद्दल अभिजित एअर सेफ्टी फाउंडेशनच्या संस्थापिका कविता गाडगीळ म्हणाल्या, ‘ईशा मॉनिटरिंग सव्‍‌र्हिसेसबद्दल मला आदर आणि त्यांच्या सेवांवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या आजपर्यंतच्या संघर्षांत त्यांची खूपच मदत झाली आहे. गेल्या सात वर्षांपासून मी त्यांच्या सेवांचा लाभ घेत आहे. पुणेकरांनाही या सेवेचा निश्चितच फार मोठा फायदा होईल.
ईशा न्यूज मॉनिटरिंग सव्‍‌र्हिसेस प्रा.लि.चे सीईओ आर. एस. अय्यर म्हणाले, ‘आजच्या गतिमान स्पर्धेच्या जगात ऐनवेळी आवश्यक ती माहिती मिळणे फार महत्त्वाचे आहे. प्रचंड युवाशक्ती आणि उदयोन्मुख उद्योजकतेचे शहर असलेल्या पुण्यात प्रत्येक व्यक्तीसाठी आमची सेवा खूपच उपयुक्त ठरेल. केवळ २४३३५४६० या क्रमांकावर फोन करा किंवा अन्य तपशिलासाठी www.eshanews.com ही वेबसाइट पाहा.