Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

गुंडगिरीबद्दल गुन्हा का नोंदवला नाही ?
सुरक्षा रक्षक काय करत होते ?
‘टेंडर सेल’ ताब्यात घेण्याच्या प्रकाराबद्दल संस्था-संघटनांकडून विचारणा
पुणे, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नगरसेवक महापालिका भवनात खुलेआम गुंडगिरी करत असताना महापालिकेचा सुरक्षा विभाग काय करत होता आणि एवढय़ा गंभीर प्रकारानंतरही महापालिकेने पोलिसांकडे तक्रार का दाखल केली नाही, अशी विचारणा सर्व स्तरांतून केली जात आहे.

िपपरीत सफाईकर, जाहिरात कर आणि मलप्रवाह सुविधा करात वाढ
स्थायी समितीच्या बैठकीत ४०० कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता
िपपरी, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

करवाढ करण्यास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी विरोध दर्शविला असला तरी लोकप्रतिनिधींच्या गळी उतरवून सफाईकर, जाहिरात कर आणि मलप्रवाह सुविधा कराच्या वाढीस मान्यता मिळविण्याची कामगिरी पालिका प्रशासनाने बजावली. स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत बीआरटीच्या विविध कामांसाठी ४०० कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली.

महाविद्यालयांमध्ये वाहताहेत ‘डेज’चे वारे
पुणे, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

ट्रॅडिशनल डे, वार्षिक स्नेहसंमेलन, युवक महोत्सव अनेक महाविद्यालयामध्ये सुरू असून यामध्ये नृत्य, नाटय़ सादर करण्यासाठी लागणारे पोषाख घेण्यासाठी शहरातील विविध वेशभूषाकारांकडे विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. शहरामधील महाविद्यालयांतील स्नेहसंमेलने, युवक महोत्सवामध्ये नाटय़ापासून ते पाश्चिमात्य संगीताचे प्रयोग एकाच व्यासपीठावर सादर केले जातात.

धर्माचे पालन न करणारा मनुष्य नव्हे, प्राणी - आढळराव
िपपरी, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

धर्माचे पालन न करणारा मनुष्य नसून प्राणी आहे, असे मत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. दिव्य ज्योती जागृती संस्थानमार्फत धर्माचे रक्षण तसेच जनतेचे प्रबोधन होते, असेही ते म्हणाले.दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने संभाजीनगर येथील साई विवेकानंद क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या सातदिवसीय श्रीराम कथामृत महोत्सवाचे उद्घाटन आढळराव यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते.यावेळी भाजपचे शहराध्यक्ष भगवान मनसुख, शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख सोमनाथ लांडगे, माजी नगरसेवक सुरेश गादिया, संयोजक नगरसेवक एकनाथ पवार, नामदेव ढाके, वासुदेव लोखंडे आदी उपस्थित होते.
आढळराव म्हणाले की, देशात आदर्शाची सर्व विशेषणे लावली जातात, त्या श्रीराम प्रभूंच्या कथेची पर्वणी श्रीराम कथामृत महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांना मिळणार आहे. महोत्सवामुळे उद्योगनगरी पावन होणार आहे, असे ते म्हणाले.

सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी निदर्शने
पुणे, ३ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी जलसंपदा कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी आज राज्य सरकारविरोधात रोष प्रकट केला. जलसंपदा कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून सिंचन भवनात निदर्शने केली. सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य सरकार टाळटाळ व दिरंगाई करीत आहे. या वेतन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी जलसंपदा खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश झणझणे यांनी सांगितले. या आंदोलनात अधिकारी महासंघ, कनिष्ठ अभियंता संघटना, रेखाचित्र संघटना, पदवीधर कर्मचारी संघटना, बिनतारी संदेश संघटना, सिंचन कर्मचारी संघटना, वित्तलेखा अधिकारी संघटना, भारतीय मजदूर महासंघ आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याबाबत हकीम समिती नेमण्यात आली आहे. या समितीने अहवाल देऊनही सरकार त्याची अंमलबजावणी करण्यास वेळकाढूपणा करीत आहे. सरकारकडून याबाबत होत असलेल्या दिरंगाईचा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने निषेध केला आहे. आयोग तातडीने लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र जगताप यांनी दिला आहे. वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत या मागणीसाठी पुणे जिल्हा राज्य सरकारी संयुक्त कृती समितीचे डॉ. नारायण जोशी, रमेशभाई आगावणे यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली.

हॉटेल गिरिजाच्या चार खोल्या पाडल्या
लोणावळा, ३ फेब्रुवारी/वार्ताहर

लोणावळा नगरपरिषदेच्या द्वितीय सुधारित विकास आराखडय़ातील खंडाळा येथील नेचर झोनमध्ये आर. के. ट्रस्टशिप अँड एक्झिकुव्हिट प्रा. लि. यांनी हॉटेल गिरिजाच्या उभारलेल्या चार अनधिकृत खोल्यावर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई करत त्या उद्ध्वत केल्या. पहिल्या मजल्यावरील १३११ चौरस फूट पक्के बांधकाम असलेल्या चार खोल्यांचे स्लॅब ब्रेकर मशिनने तर भिंती जेसीबी मशिनद्वारे पाडण्यात आल्या. कारवाईविषयी दै. ‘लोकसत्ता’शी बोलताना इमारत निरीक्षक प्रशांत घुमे व सहायक दत्तात्रय गायकवाड यांनी सदर हॉटेल व्यावसायिकाला नेचर झोनमधील हे अनधिकृत बांधकाम काढण्याकरिता २ जानेवारी २००२ ला नोटीस दिली असल्याचे सांगितले. मोठय़ा पोलीस बंदोबस्तात शांततेत झालेल्या या कारवाईत मुख्याधिकारी लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पी. पी. सूर्यवंशीही सहभागी झाले होते. लोणावळ्याच्या निसर्गसौंदर्याला बाधा निर्माण करणारे बांधकाम हॉटेल गिरिजा यांनी केल्यानंतर २००२ साली त्यांना नगरपरिषदेने अनधिकृत बांधकाम काढण्याची नोटीस दिली. या घटनेला तब्बल ७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पालिका प्रशासनाची शहराविषयी उदासीनता व कामातील चालढलकलपणा या उदाहरणावरून समोर आला आहे, अशी किती अनधिकृत बांधकामे शहरात दिमाखात उभी आहेत, या चर्चेला उधाण आले आहे.

रामोशी समाजाची फेरी जेजुरीहून मुंबईला रवाना
जेजुरी, ३ फेब्रुवारी/वार्ताहर

‘महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी कायम रामोशी समाजाला फसवले. कर्नाटकात रामोशी (बेरड, बेडर, वाल्मीकी, तलवार) समाजाचे २० आमदार आहेत. इथे मात्र एकदाही संधी दिली नाही. आम्हाला उपेक्षित ठेवणारे राज्यकर्ते लबाड, ढोंगी व बहिरे आहेत,’ अशी टीका नरवीर उमाजी नाईक, समाजसुधारक मंडळाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी जेजुरी येथे केली. आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या १७८व्या पुण्यतिथीनिमित्त रामोशी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १०० मोटारसायकलींची फेरी जेजुरीहून आज मुंबईला रवाना झाली. सकाळी १० वाजता खंडोबा गडावरील राजे उमाजी यांच्या पुतळय़ावर भंडारा उधळून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर जेजुरी नगरपालिकेच्या पटांगणावर फेरीचा आरंभ करण्यात आला. राज्यातील रामोशी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, खडकमाळ येथील उमाजी नाईकांचे स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, समाजातील तरुणांना जगण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा आदी मागण्या या वेळी चव्हाण यांनी केल्या. ‘आजची फेरी ही ठिणगी आहे. आमचा आता अंत पाहू नका. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही संघर्ष करू’ असा इशाराही त्यांनी दिला.

अन्याय दूर करण्यासाठी पुरंदरवर भगवा फडकवा - सावंत
जेजुरी, ३ फेब्रुवारी/वार्ताहर

बारामतीकरांच्या कायम पाठीशी उभे राहूनही पुरंदरच्या जनतेला रस्ते, पाणी, वीज, रोजगार काहीच नीट मिळाले नाही. हा अन्याय दूर करण्यासाठी आता पुरंदरवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांनी जेजुरी येथे केले. शिवसेनेच्या वतीने नगरपालिका मैदानात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. महाराष्ट्रातील ५ हजार शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या, त्याचे पाप या राज्यकर्त्यांच्या डोक्यावर आहे. सहकार, शिक्षणक्षेत्र, बँका, पतसंस्था यावर काँग्रेस आघाडीचे वर्चस्व असताना पुरंदरचा विकास झाला नाही. केवळ बारामतीचाच विकास झाला. आता सत्ता शिवसेनेच्या हातात द्या, बारामतीपेक्षा जादा विकास करू, असे सावंत यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे महासचिव विजय शिवतारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुरंदर तालुक्याच्या वाडय़ावस्त्यांवर सभा घेऊन शिवसेनेच्या शाखा उघडण्याचा सपाटा लावला आहे. सासवड येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभेला मिळालेल्या मोठय़ा प्रतिसादानंतर जेजुरीत प्रथमच शिवसेनेची जाहीर सभा झाली.

‘स्लमडॉग मिलेनिअर’मध्ये हिंदूंच्या भावना दुखावण्यात आल्याचा आरोप
पुणे, ३ फेब्रुवारी /प्रतिनिधी

‘स्लमडॉग मिलेनिअर’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात हिंदूंचे आराध्य दैवत श्रीरामचंद्रांना विद्रुप स्वरूपात दाखवून त्यांचे विडंबन करण्यात आले आहे, तर हिंदू समाज दंगलखोर असल्याचे दाखवून आंतरराष्ट्रीय स्तरावर या समाजाची प्रतिमा खराब करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळावा, अन्यथा चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे. समितीचे प्रवक्ते सुनील धनवट यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या चित्रपटात भारतीय दारिद्रय़ाचेच प्रदर्शन करण्यात आले आहे. तसेच काही जातीय तेढ निर्माण करणारे प्रसंग दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे समितीने ‘केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाकडे’ तक्रार केली असून, मंडळाने योग्य प्रतिसाद न दिल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. या मागणीसाठी समितीने देशातील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व अन्य राज्यात आंदोलन करण्यास सुरु केले असून, पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. चिंचवडमधील ‘गोल्ड अ‍ॅडलॅब’ व ‘जयगणेश फेम’ या चित्रपटगृहांतील या चित्रपटांचे प्रयोग रद्द करण्यात समितीला यश आले आहे, असे धनवट यांनी सांगितले.

घरकुल योजनेच्या मागणीसाठी विडी कामगारांचा मंत्रालयावर मोर्चा
पुणे, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या इंटिग्रेट हाऊसिंग स्कीमअंतर्गत विडी कामगारांना घरकुल योजना राबविण्यासाठी भोर तालुक्यातील धांगवाडी येथील जागा शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी भारतीय मजूर संघातर्फे विडी कामगारांचा मंत्रालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी महसूलमंत्री पतंगराव कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. १५ मार्चपूर्वी संबंधित जमीन घरकुल योजनेसाठी उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री कदम यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. आश्वासनाची पूर्तता वेळेत न झाल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर विडी कामगार बेमुदत उपोषण करतील, असा इशारा संघटनेचे प्रदेश सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी दिला आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी उमेश विश्वास, लक्ष्मी जिंदम, साफिया खान, लतानिली, नारायण आहेर, लक्ष्मी मंडास, वासंती तुम्मा, राजमणी वल्लाकट्टी, सुरेखा गुंडा यांनी विशेष परिश्रम घेतले. ही माहिती संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख सचिन मेंगाळे यांनी कळविली आहे.

महिलांची छेड काढणाऱ्यांच्या उपद्रवात वाढ
हडपसर, ३ फेब्रुवारी /वार्ताहर

साधना विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी विद्यार्थिनी व महिलांची छेड काढणाऱ्या सडक सख्याहरींचा उपद्रव वाढला आहे. यांच्यामुळे विद्यार्थिनी व महिला त्रस्त झाल्या असून, याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊनही फारसा उपयोग होत नाही, असे निदर्शनास आले असल्याचे पालकांनी सांगितले. या संकुलामध्ये सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांची संख्या आहे. यात दोन सत्रामध्ये शालेय कामकाज चालते. सकाळी बालवाडी विभागातील मुलांना ने-आण करण्यासाठी पालकांना ये-जा करावी लागते. या संकुलातील सर्व विभागांच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने शाळेत येणारे पालक, शिक्षक, हितचिंतक व इतर प्रतिनिधींची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. या गर्दीचा फायदा घेऊन मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने हे सडक सख्याहरी थांबलेले असतात. वेगवेगळ्या दुचाकींवरून हे सडक सख्याहरी येथे येऊन बसतात. यांच्यामुळे वाहतूक कोंडी होतेच. पण ये-जा करणाऱ्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच येथील क्रीडांगणावरही यांचा वावर असल्यामुळे येथे भांडणाचे प्रसंग घडत असतात. शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन अशा अपप्रवृत्तींवर आवर घालू शकत नसल्याने पोलिसांनीच पुढाकार घ्यावा व येथे गस्तिपथक नेमावे, अशी विनंती पोलीस निरीक्षकांना पालकवर्गाने व शालेय व्यवस्थापनाने लेखी निवेदनाद्वारे केली आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत सोनवणे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांनी शाळा सुटण्याच्या वेळी दोन पोलिसांची नियुक्ती करणार असल्याचे सांगितले. आतापर्यंत या ठिकाणाहून अनेक सख्या हरींना पकडून त्यांच्या पालकासमोर समज दिली आहे.

कामगारांना शासकीय चार सुट्टय़ा देण्याचे आवाहन
पुणे, ३ फेब्रुवारी /प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील सर्व संस्था, चित्रपटगृहे, दुकाने, उपाहारगृह आणि शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक, स्वातंत्र्यदिन, कामगार दिन आणि गांधी जयंती या शासकीय सुट्टय़ा देण्यात याव्यात, असे आवाहन कामगार उपआयुक्त अनिल लाकसवार यांनी सर्व मालक आणि व्यवस्थापकांना केले आहे. मुंबई दुकाने व संस्था अधिनियम १९४८ व महाराष्ट्र दुकाने व संस्था नियम १९६१ च्या तरतुदीनुसार सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टय़ा देणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच या दिवशीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाऊ नये अथवा या दिवशी कर्मचाऱ्याने काम केल्यास दुप्पट दराने अतिरिक्त वेतन आणि पर्यायी सुट्टी देण्यात यावी असे अधिनियमाच्या कलम ३५ (४) मध्ये तरतूद केली आहे.

वनकामगार संघटनेतर्फे निदर्शने
पुणे, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

वनकामगारांच्या प्रश्नांबाबत चालढकल करणाऱ्या शासनाच्या कृतीचा निषेध म्हणून येत्या ९ फेब्रुवारी रोजी वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या श्रीगोंदा येथील ‘माऊली’ कार्यालयावर वनकामगार संघटनेतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत. संघटनेचे सचिव प्रकाश शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये वनकामगारांना सेवेत कायम करण्याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन पाचपुते यांनी दिले होते. परंतु त्याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे श्रीगोंदा शहरात मोर्चा काढून पाचपुते यांच्या माऊली कार्यालयावर निदर्शने करण्यात येतील, तसेच हा प्रश्न आचारसंहिता लागू होण्याअगोदर सोडवावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी या वेळी दिला.

‘रेबीज लसीचे धोरण महाराष्ट्रात लागू व्हावे’ जन आरोग्य अभियानची मागणी
पुणे, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

स्नायूऐवजी कातडीच्या आतील थरातून रेबीजची लस देण्याचा नवा प्रयोग लवकरच करण्यात येणार असून ती सर्वानाच मोफत मिळणार आहे. त्यामुळे पुण्यासाठी हा प्रयोग न करता रेबीजच्या लसीचे धोरण संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची मागणी जन आरोग्य अभियानने केली आहे. श्वानदंशावरील परिणामकारक आणि सुरक्षित अशी रेबीजची लस स्नायू ऐवजी कातडीच्या आतील थरातून द्यावी. त्यामुळे लसीच्या खर्चात ८० टक्के बचत होणार आहे. या धोरणासाठी जन आरोग्य अभियानने २००५ पासून सरकारकडे मागणी केली होती. त्यानंतर पुण्यात या धोरणाची आता लवकरच अंमलबजावणी सुरू होईल. आता ही अंमलबजावणी महाराष्ट्रात करावी. त्यासाठी उशीर करू नये, असे आवाहन जन आरोग्य अभियानचे सहसमन्वयक डॉ. अनंत फडके यांनी केले आहे. बीसीजीसी लस टोचण्यासाठी लहान सुईची गरज असते. त्या सुयांसाठी आणखी उशीर करू नये, असेही अभियानच्या वतीने सांगण्यात आले.

चार्ल्स यांच्या वास्तुकलेविषयी माहितीपट
पुणे, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुतज्ज्ञ चार्ल्स कोरिया यांच्या वास्तुकलाविष्कारांवर तयार करण्यात आलेल्या ‘व्हॉल्युम झिरो’ या माहितीपटाचा खेळ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानुबेन नानावटी आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अरुण खोपकर यांनी तयार केलेला हा माहितीपट पुणे विद्यापीठाच्या चंद्रशेखर सभागृहात सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दाखविला जाणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य अनुराग कश्यप यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी संस्थेचे प्रा. अरुण ओगले उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रवेश मर्यादित असून यासाठीच्या प्रवेशपत्रिका महाविद्यालयात उपलब्ध आहेत. या प्रवेशपत्रिका सभागृहावर उपलब्ध राहणार नाहीत, असेही कश्यप यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरिया व आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांमध्ये संवाद निर्माण करण्यासाठी विद्यापीठातील ‘आयुका’च्या कुंडात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे कश्यप म्हणाले. शहरातील सर्व आर्किटेक्चर विद्यार्थी, व्यावसायिक व अन्य इच्छुकांना कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार, मात्र त्यांनी महाविद्यालयातून प्रवेशपत्रिका घेणे आवश्यक आहे, अशी माहिती प्रा. ओगले यांनी दिली.

भामटय़ांनी केली तीस हजारांची फसवणूक
पुणे, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पोलीस असल्याची बतावणी करून दोघा भामटय़ांनी वृद्ध जोडप्याची तीस हजाराची फसवणूक केली. आळंदी रस्त्यावर बीईजी प्रवेशद्वारासमोर काल सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
सुशीला सुदाम नेढे (वय ५७, रा. आंबेडकर सोसायटी, येरवडा) यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी नेढे व त्यांचे पती काल सायंकाळी आळंदी रस्त्यावर रिक्षाची वाट बघत असताना, मोटारसायकलवरून दोन अज्ञात व्यक्ती तेथे आल्या. सीआयडीचे अधिकारी असल्याची बतावणी करत दोघा भामटय़ांनी नेढे यांना त्यांच्याकडील सोन्याचे गंठण रुमालात बांधून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर रुमालाला गाठ मारून देण्याच्या बहाण्याने भामटय़ांनी नेढे यांच्याकडील गंठण घेतले व त्यांची नजर चुकवून पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक सर्वगौड याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

वेश्या व्यवसायासाठी मुली आणणाऱ्या दोघांना अटक
पुणे, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

परराज्यातील मुलींना वेश्याव्यवसायासाठी शहरात आणणाऱ्या दोनजणांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने अटक केली. आळंदी रस्त्यावर आश्रय लॉजजवळ आज दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी तीन मुलींची सुटका केली. सागर अश्रफ शेख (वय २२) आणि रतन गणेश सरकार (वय २०, दोघे रा. रा. भोसरी भाजी मंडईसमोर, भोसरी आळंदी रस्ता) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. दोघांविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र भामरे, पोलीस उपनिरीक्षक कांचन जाधव, पोलीस हवालदार सुभाष सुळके, सुभाष कांबळे, अरविंद कळसकर, पोलीस नाईक तानाजी निकम, हरिदास बांडे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता जाधव, महिला पोलीस शिपाई ऊर्मिला भंडलकर यांच्या पोलीस पथकाने ही कामगिरी केली.

वाहनाची धडक बसून हवालदाराचा मृत्यू
पिंपरी, ३ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

पुण्याहून चाकणकडे जाताना वाहनाची धडक बसल्याने शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार खंडू कोंडीभाऊ शिंदे (वय-५०,रा.शिरोली,खेड) हे जागीच ठार झाले. भोसरी पोलिसांनी अनोळखी वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.सोमवारी रात्री शिंदे हे दुचाकीवर आपले मेहूणे शरद एकनाथ गाडे यांच्या समवेत चाकणच्या दिशेने निघाले होते. मोशी येथे मागाहून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या गाडीला जबरदस्त धडक दिली.त्यात शिंदे हे गंभीर जखमी झाले.
उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यृ झाला.धडक देणारा वाहनचालक पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक वाय.एस.राक्षे तपास करत आहेत.

सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी निदर्शने
पुणे, ३ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी
सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी जलसंपदा कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी आज राज्य सरकारविरोधात रोष प्रकट केला. जलसंपदा कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून सिंचन भवनात निदर्शने केली. सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य सरकार टाळटाळ व दिरंगाई करीत आहे. या वेतन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी जलसंपदा खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश झणझणे यांनी सांगितले. या आंदोलनात अधिकारी महासंघ, कनिष्ठ अभियंता संघटना, रेखाचित्र संघटना, पदवीधर कर्मचारी संघटना, बिनतारी संदेश संघटना, सिंचन कर्मचारी संघटना, वित्तलेखा अधिकारी संघटना, भारतीय मजदूर महासंघ आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याबाबत हकीम समिती नेमण्यात आली आहे. या समितीने अहवाल देऊनही सरकार त्याची अंमलबजावणी करण्यास वेळकाढूपणा करीत आहे. सरकारकडून याबाबत होत असलेल्या दिरंगाईचा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने निषेध केला आहे. आयोग तातडीने लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र जगताप यांनी दिला आहे. वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत या मागणीसाठी पुणे जिल्हा राज्य सरकारी संयुक्त कृती समितीचे डॉ. नारायण जोशी, रमेशभाई आगावणे यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली.

हॉटेल गिरिजाच्या चार खोल्या पाडल्या
लोणावळा, ३ फेब्रुवारी/वार्ताहर

लोणावळा नगरपरिषदेच्या द्वितीय सुधारित विकास आराखडय़ातील खंडाळा येथील नेचर झोनमध्ये आर. के. ट्रस्टशिप अँड एक्झिकुव्हिट प्रा. लि. यांनी हॉटेल गिरिजाच्या उभारलेल्या चार अनधिकृत खोल्यावर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई करत त्या उद्ध्वत केल्या. पहिल्या मजल्यावरील १३११ चौरस फूट पक्के बांधकाम असलेल्या चार खोल्यांचे स्लॅब ब्रेकर मशिनने तर भिंती जेसीबी मशिनद्वारे पाडण्यात आल्या. कारवाईविषयी दै. ‘लोकसत्ता’शी बोलताना इमारत निरीक्षक प्रशांत घुमे व सहायक दत्तात्रय गायकवाड यांनी सदर हॉटेल व्यावसायिकाला नेचर झोनमधील हे अनधिकृत बांधकाम काढण्याकरिता २ जानेवारी २००२ ला नोटीस दिली असल्याचे सांगितले. मोठय़ा पोलीस बंदोबस्तात शांततेत झालेल्या या कारवाईत मुख्याधिकारी लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पी. पी. सूर्यवंशीही सहभागी झाले होते. लोणावळ्याच्या निसर्गसौंदर्याला बाधा निर्माण करणारे बांधकाम हॉटेल गिरिजा यांनी केल्यानंतर २००२ साली त्यांना नगरपरिषदेने अनधिकृत बांधकाम काढण्याची नोटीस दिली. या घटनेला तब्बल ७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पालिका प्रशासनाची शहराविषयी उदासीनता व कामातील चालढलकलपणा या उदाहरणावरून समोर आला आहे, अशी किती अनधिकृत बांधकामे शहरात दिमाखात उभी आहेत, या चर्चेला उधाण आले आहे.

रामोशी समाजाची फेरी जेजुरीहून मुंबईला रवाना
जेजुरी, ३ फेब्रुवारी/वार्ताहर

‘महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी कायम रामोशी समाजाला फसवले. कर्नाटकात रामोशी (बेरड, बेडर, वाल्मीकी, तलवार) समाजाचे २० आमदार आहेत. इथे मात्र एकदाही संधी दिली नाही. आम्हाला उपेक्षित ठेवणारे राज्यकर्ते लबाड, ढोंगी व बहिरे आहेत,’ अशी टीका नरवीर उमाजी नाईक, समाजसुधारक मंडळाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी जेजुरी येथे केली. आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या १७८व्या पुण्यतिथीनिमित्त रामोशी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १०० मोटारसायकलींची फेरी जेजुरीहून आज मुंबईला रवाना झाली. सकाळी १० वाजता खंडोबा गडावरील राजे उमाजी यांच्या पुतळय़ावर भंडारा उधळून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर जेजुरी नगरपालिकेच्या पटांगणावर फेरीचा आरंभ करण्यात आला. राज्यातील रामोशी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, खडकमाळ येथील उमाजी नाईकांचे स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, समाजातील तरुणांना जगण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा आदी मागण्या या वेळी चव्हाण यांनी केल्या. ‘आजची फेरी ही ठिणगी आहे. आमचा आता अंत पाहू नका. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही संघर्ष करू’ असा इशाराही त्यांनी दिला.

अन्याय दूर करण्यासाठी पुरंदरवर भगवा फडकवा - सावंत
जेजुरी, ३ फेब्रुवारी/वार्ताहर

बारामतीकरांच्या कायम पाठीशी उभे राहूनही पुरंदरच्या जनतेला रस्ते, पाणी, वीज, रोजगार काहीच नीट मिळाले नाही. हा अन्याय दूर करण्यासाठी आता पुरंदरवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांनी जेजुरी येथे केले. शिवसेनेच्या वतीने नगरपालिका मैदानात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. महाराष्ट्रातील ५ हजार शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या, त्याचे पाप या राज्यकर्त्यांच्या डोक्यावर आहे. सहकार, शिक्षणक्षेत्र, बँका, पतसंस्था यावर काँग्रेस आघाडीचे वर्चस्व असताना पुरंदरचा विकास झाला नाही. केवळ बारामतीचाच विकास झाला. आता सत्ता शिवसेनेच्या हातात द्या, बारामतीपेक्षा जादा विकास करू, असे सावंत यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे महासचिव विजय शिवतारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुरंदर तालुक्याच्या वाडय़ावस्त्यांवर सभा घेऊन शिवसेनेच्या शाखा उघडण्याचा सपाटा लावला आहे. सासवड येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभेला मिळालेल्या मोठय़ा प्रतिसादानंतर जेजुरीत प्रथमच शिवसेनेची जाहीर सभा झाली.

‘स्लमडॉग मिलेनिअर’मध्ये हिंदूंच्या भावना दुखावण्यात आल्याचा आरोप
पुणे, ३ फेब्रुवारी /प्रतिनिधी

‘स्लमडॉग मिलेनिअर’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात हिंदूंचे आराध्य दैवत श्रीरामचंद्रांना विद्रुप स्वरूपात दाखवून त्यांचे विडंबन करण्यात आले आहे, तर हिंदू समाज दंगलखोर असल्याचे दाखवून आंतरराष्ट्रीय स्तरावर या समाजाची प्रतिमा खराब करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळावा, अन्यथा चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे.
समितीचे प्रवक्ते सुनील धनवट यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या चित्रपटात भारतीय दारिद्रय़ाचेच प्रदर्शन करण्यात आले आहे. तसेच काही जातीय तेढ निर्माण करणारे प्रसंग दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे समितीने ‘केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाकडे’ तक्रार केली असून, मंडळाने योग्य प्रतिसाद न दिल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. या मागणीसाठी समितीने देशातील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व अन्य राज्यात आंदोलन करण्यास सुरु केले असून, पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. चिंचवडमधील ‘गोल्ड अ‍ॅडलॅब’ व ‘जयगणेश फेम’ या चित्रपटगृहांतील या चित्रपटांचे प्रयोग रद्द करण्यात समितीला यश आले आहे, असे धनवट यांनी सांगितले.

घरकुल योजनेच्या मागणीसाठी विडी कामगारांचा मंत्रालयावर मोर्चा
पुणे, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या इंटिग्रेट हाऊसिंग स्कीमअंतर्गत विडी कामगारांना घरकुल योजना राबविण्यासाठी भोर तालुक्यातील धांगवाडी येथील जागा शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी भारतीय मजूर संघातर्फे विडी कामगारांचा मंत्रालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी महसूलमंत्री पतंगराव कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. १५ मार्चपूर्वी संबंधित जमीन घरकुल योजनेसाठी उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री कदम यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. आश्वासनाची पूर्तता वेळेत न झाल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर विडी कामगार बेमुदत उपोषण करतील, असा इशारा संघटनेचे प्रदेश सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी दिला आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी उमेश विश्वास, लक्ष्मी जिंदम, साफिया खान, लतानिली, नारायण आहेर, लक्ष्मी मंडास, वासंती तुम्मा, राजमणी वल्लाकट्टी, सुरेखा गुंडा यांनी विशेष परिश्रम घेतले. ही माहिती संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख सचिन मेंगाळे यांनी कळविली आहे.

महिलांची छेड काढणाऱ्यांच्या उपद्रवात वाढ
हडपसर, ३ फेब्रुवारी /वार्ताहर

साधना विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी विद्यार्थिनी व महिलांची छेड काढणाऱ्या सडक सख्याहरींचा उपद्रव वाढला आहे. यांच्यामुळे विद्यार्थिनी व महिला त्रस्त झाल्या असून, याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊनही फारसा उपयोग होत नाही, असे निदर्शनास आले असल्याचे पालकांनी सांगितले. या संकुलामध्ये सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांची संख्या आहे. यात दोन सत्रामध्ये शालेय कामकाज चालते. सकाळी बालवाडी विभागातील मुलांना ने-आण करण्यासाठी पालकांना ये-जा करावी लागते. या संकुलातील सर्व विभागांच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने शाळेत येणारे पालक, शिक्षक, हितचिंतक व इतर प्रतिनिधींची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. या गर्दीचा फायदा घेऊन मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने हे सडक सख्याहरी थांबलेले असतात. वेगवेगळ्या दुचाकींवरून हे सडक सख्याहरी येथे येऊन बसतात. यांच्यामुळे वाहतूक कोंडी होतेच. पण ये-जा करणाऱ्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच येथील क्रीडांगणावरही यांचा वावर असल्यामुळे येथे भांडणाचे प्रसंग घडत असतात. शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन अशा अपप्रवृत्तींवर आवर घालू शकत नसल्याने पोलिसांनीच पुढाकार घ्यावा व येथे गस्तिपथक नेमावे, अशी विनंती पोलीस निरीक्षकांना पालकवर्गाने व शालेय व्यवस्थापनाने लेखी निवेदनाद्वारे केली आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत सोनवणे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांनी शाळा सुटण्याच्या वेळी दोन पोलिसांची नियुक्ती करणार असल्याचे सांगितले. आतापर्यंत या ठिकाणाहून अनेक सख्या हरींना पकडून त्यांच्या पालकासमोर समज दिली आहे.

कामगारांना शासकीय, चार सुट्टय़ा देण्याचे आवाहन
पुणे, ३ फेब्रुवारी /प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील सर्व संस्था, चित्रपटगृहे, दुकाने, उपाहारगृह आणि शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक, स्वातंत्र्यदिन, कामगार दिन आणि गांधी जयंती या शासकीय सुट्टय़ा देण्यात याव्यात, असे आवाहन कामगार उपआयुक्त अनिल लाकसवार यांनी सर्व मालक आणि व्यवस्थापकांना केले आहे. मुंबई दुकाने व संस्था अधिनियम १९४८ व महाराष्ट्र दुकाने व संस्था नियम १९६१ च्या तरतुदीनुसार सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टय़ा देणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच या दिवशीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाऊ नये अथवा या दिवशी कर्मचाऱ्याने काम केल्यास दुप्पट दराने अतिरिक्त वेतन आणि पर्यायी सुट्टी देण्यात यावी असे अधिनियमाच्या कलम ३५ (४) मध्ये तरतूद केली आहे.

वनकामगार संघटनेतर्फे निदर्शने
पुणे, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

वनकामगारांच्या प्रश्नांबाबत चालढकल करणाऱ्या शासनाच्या कृतीचा निषेध म्हणून येत्या ९ फेब्रुवारी रोजी वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या श्रीगोंदा येथील ‘माऊली’ कार्यालयावर वनकामगार संघटनेतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत.संघटनेचे सचिव प्रकाश शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये वनकामगारांना सेवेत कायम करण्याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन पाचपुते यांनी दिले होते. परंतु त्याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे श्रीगोंदा शहरात मोर्चा काढून पाचपुते यांच्या माऊली कार्यालयावर निदर्शने करण्यात येतील, तसेच हा प्रश्न आचारसंहिता लागू होण्याअगोदर सोडवावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी या वेळी दिला.

‘रेबीज लसीचे धोरण महाराष्ट्रात लागू व्हावे’ जन आरोग्य अभियानची मागणी
पुणे, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

स्नायूऐवजी कातडीच्या आतील थरातून रेबीजची लस देण्याचा नवा प्रयोग लवकरच करण्यात येणार असून ती सर्वानाच मोफत मिळणार आहे. त्यामुळे पुण्यासाठी हा प्रयोग न करता रेबीजच्या लसीचे धोरण संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची मागणी जन आरोग्य अभियानने केली आहे. श्वानदंशावरील परिणामकारक आणि सुरक्षित अशी रेबीजची लस स्नायू ऐवजी कातडीच्या आतील थरातून द्यावी. त्यामुळे लसीच्या खर्चात ८० टक्के बचत होणार आहे. या धोरणासाठी जन आरोग्य अभियानने २००५ पासून सरकारकडे मागणी केली होती. त्यानंतर पुण्यात या धोरणाची आता लवकरच अंमलबजावणी सुरू होईल. आता ही अंमलबजावणी महाराष्ट्रात करावी. त्यासाठी उशीर करू नये, असे आवाहन जन आरोग्य अभियानचे सहसमन्वयक डॉ. अनंत फडके यांनी केले आहे. बीसीजीसी लस टोचण्यासाठी लहान सुईची गरज असते. त्या सुयांसाठी आणखी उशीर करू नये, असेही अभियानच्या वतीने सांगण्यात आले.

चार्ल्स यांच्या वास्तुकलेविषयी माहितीपट
पुणे, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुतज्ज्ञ चार्ल्स कोरिया यांच्या वास्तुकलाविष्कारांवर तयार करण्यात आलेल्या ‘व्हॉल्युम झिरो’ या माहितीपटाचा खेळ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानुबेन नानावटी आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अरुण खोपकर यांनी तयार केलेला हा माहितीपट पुणे विद्यापीठाच्या चंद्रशेखर सभागृहात सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दाखविला जाणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य अनुराग कश्यप यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी संस्थेचे प्रा. अरुण ओगले उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रवेश मर्यादित असून यासाठीच्या प्रवेशपत्रिका महाविद्यालयात उपलब्ध आहेत. या प्रवेशपत्रिका सभागृहावर उपलब्ध राहणार नाहीत, असेही कश्यप यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरिया व आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांमध्ये संवाद निर्माण करण्यासाठी विद्यापीठातील ‘आयुका’च्या कुंडात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे कश्यप म्हणाले. शहरातील सर्व आर्किटेक्चर विद्यार्थी, व्यावसायिक व अन्य इच्छुकांना कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार, मात्र त्यांनी महाविद्यालयातून प्रवेशपत्रिका घेणे आवश्यक आहे, अशी माहिती प्रा. ओगले यांनी दिली.

भामटय़ांनी केली तीस हजारांची फसवणूक
पुणे, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पोलीस असल्याची बतावणी करून दोघा भामटय़ांनी वृद्ध जोडप्याची तीस हजाराची फसवणूक केली. आळंदी रस्त्यावर बीईजी प्रवेशद्वारासमोर काल सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
सुशीला सुदाम नेढे (वय ५७, रा. आंबेडकर सोसायटी, येरवडा) यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी नेढे व त्यांचे पती काल सायंकाळी आळंदी रस्त्यावर रिक्षाची वाट बघत असताना, मोटारसायकलवरून दोन अज्ञात व्यक्ती तेथे आल्या. सीआयडीचे अधिकारी असल्याची बतावणी करत दोघा भामटय़ांनी नेढे यांना त्यांच्याकडील सोन्याचे गंठण रुमालात बांधून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर रुमालाला गाठ मारून देण्याच्या बहाण्याने भामटय़ांनी नेढे यांच्याकडील गंठण घेतले व त्यांची नजर चुकवून पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक सर्वगौड याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.