Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

बंधुराज लोणे
मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यात ‘पर्यावरण’ या विषयात अभियंता असणाऱ्यांची भरती करावी, असे सवरेच्य न्यायालयाचे आदेश असतानाही पालिका प्रशासनाने या खात्यात विद्युत अभियंत्यांची भरती केली आहे. विशेष म्हणजे सवरेच्य न्यायालयाच्या आदेशाची माहिती प्रशासनाने स्थायी समिती आणि पालिका सभागृहाला न देता या अभियंत्यांच्या भरतीला मान्यता घेण्यात आली आहे. मुंबईसारख्या मोठय़ा शहरात घन कचरा व्यवस्थापन अतिशय महत्वाचे असताना पालिका प्रशासन याची दखल घेत नाही. म्हणून अलमिता पटेल या समाजिक कार्यकर्तीने सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने एक समिती नेमण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार नेमण्यात आलेल्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार या खात्याने व्यवस्थापन आणि हाताळणी बाबत काही नियम तयार केले.

‘लहान’ घरफोडय़ांकडे लक्ष देण्यास पोलिसांना वेळ नाही!
प्राजक्ता कदम

दहशतवादी हल्ल्यानंतर शहरात ठेवण्यात आलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे घरफोडी, चोऱ्यांचे प्रमाण मोठय़ा संख्येने घटले आहे, असा सह आयुक्त (गुन्हे) राकेश मारिया यांनी केलेला दावा महिन्यानंतर सपशेल फोल ठरला आहे. या घटनांच्या महिनाभरातील आकडेवारीनेच मारिया यांचा हा दावा फोल ठरवला आहे.भविष्यात दहशतवाद्यांशी अत्याधुनिक शस्त्रांनिशी कसा मुकाबला करता येईल यावर सध्या लक्ष केंद्रित करणाऱ्या पोलीस दलाचे शहरातील ‘लहान’ घरफोडी व चोरीच्या घटनांकडे वेळ नसल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

४ फेब्रुवारी
आज कॉलेजच्या नोटिसबोर्डवर फिल्म फेस्टिवलची नोटिस! ही खरे तर सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी नोटिस होती. कारण वर्ष संपता संपता जिथे ब्लॅक लिस्ट लागायची तिथे ‘बायसिकल थिव्ज’, ‘शिंडलर्स्ट लिस्ट’, ‘चिल्ड्रन ऑफ हेव्हन’, पोस्टमॅन इन द माऊंटन’, अशी काही नावे लिहिली होती. अर्थात, आपली मजल ‘पस्र्युट ऑफ हॅपिनेस’, ‘कास्ट अवे’, ‘डीपार्टेड’पर्यंतच.

मुंबई विद्यापीठाचे कुलपती अद्याप एस. एम. कृष्णाच!
तुषार खरात

राज्याच्या राज्यपाल पदावर एस. सी. जमीर हे ९ मार्च २००८ पासून कार्यरत आहेत. तेव्हापासूनच ते मुंबई विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपतीही आहेत. पण याबद्दल मुंबई विद्यापीठाला काहीच माहिती नसल्याचे मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्पष्ट होते. या संकेतस्थळावर आजही कुलपती पदावर एस. एम. कृष्णा कार्यरत असल्याचा उल्लेख असून ते विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्यही असल्याचेही नमूद केले आहे.

‘अन्नदाता आहार योजनेत झुणका भाकर केंद्र चालकांना समाविष्ट करणार’
प्रतिनिधी

युती सरकारच्या काळात सुरू झालेल्या योजना कॉंग्रेसने सत्ता मिळताच बंद केल्या असल्या तरी शिववडापाव व झुणका भाकर योजना वेगळ्या स्वरुपात महापालिकेतर्फे आणल्या जातील. मूळ झुणका भाकर केंद्र चालकांना महापालिकेतर्फे अन्नदाता आहार योजनेत समाविष्ट केले जाईल, असे आश्वासन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी झुणका भाकर केंद्र चालक संघटनेला दिली. झुणका भाकर केंद्र चालक संघटनेचे अध्यक्ष उमेश वागळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केंद्र चालकांच्या विविध समस्यांचे निवेदन नुकतेच सादर केले. या निवेदनातील रास्त मागण्या आयुक्तांकडून मंजूर करून घेण्याचे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. शिवसेनेचा झुणका भाकर केंद्र चालक संघटनेला नेहमीच पाठिंबा राहील, असे शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितले.

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांसाठी आवाहन
प्रतिनिधी

जळगावस्थित शहरातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आले आहे राज्यस्तरीय सेवादास दलुभाऊ जैन साहित्य गौरव पुरस्कारासाठी जानेवारी २००४ ते डिसेंबर २००६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या कादंबरीच्या ३ प्रती लेखकांनी पाठवायच्या असून कथालेखकांनी जानेवार २००७ ते ऑक्टोबर २००८ या कालावधीत प्रकाशित झालेल्या कथासंग्रहाच्या ३ प्रती पाठवायच्या आहेत. दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रोख रुपये ७१७१, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह असे राहणार आहे. पुरस्कार फक्त लेखकांनाच दिला जाणार आहे. निकाल जून २००९ पर्यंत जाहीर होईल, तर ऑगस्ट २००९ मध्ये जळगावी पुरस्कार प्रदान सोहळा होईल. साहित्य ३१ मार्च २००९ पर्यंत सतीश जैन, अध्यक्ष सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, ९ क, खोटे नगर (सुरक्षा नगर), जळगाव, ४२५००२ (खानदेश) या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क- दूरध्वनी- ९४०३०२१५३१.

मुलुंड (पू.) येथील स्कायवॉकचा प्रयत्न ‘मनसे’ने हाणून पाडला
प्रतिनिधी

मुलुंड (पू.) येथे स्कायवॉक बांधण्याचा ‘एमएमआरडीए’चा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. सदर ठिकाणी स्कायवॉक बांधावा अशी कोणाचीही मागणी नसताना आणि तेथे गरजही नसताना ‘एमएमआरडीए’ने बांधकामाची तयारी सुरू केली होती. ही बाब समजताच मनसेचे सरचिटणीस शिशिर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी स्कायवॉकच्या कामासाठी रस्त्याच्या मधोमध उभारलेले पत्र्यांचे अडथळे काढून टाकले. त्यापूर्वी मनसेच्या वतीने येथे स्कायवॉकची गरज नसल्याबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात आले होते.

मधुशेठ नाईक यांचे निधन
प्रतिनिधी

वसईतील एक प्रतिथयश साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेचे माजी अध्यक्ष महादेव गजानन तथा मधुशेठ नाईक यांचे गेल्या शुक्रवारी निधन झाले. वसईत कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा स्थापन करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अनेक साहित्यिक कवी लेखकांशी त्यांचे घनिष्ट संबंध होता. कवी कुसुमाग्रज, मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, अशोक नायगावकर, प्रा. मुरलीधर सायनेकर हे त्यांच्या प्रेमापोटी वसईत येऊन गेले.

असा रंगला वेसाव्यातील ‘सी फूड फेस्टिवल’
प्रतिनिधी

वेसाव्यात भरविण्यात आलेला कोळी सी फूड फेस्टिवल यंदा रंगला तो परदेशी नागरिकांच्या खास उपस्थितीमुळे. याशिवाय ईशान्य भारतातील ‘माय होम इंडिया’ या संस्थेचे दीडशेहून अधिक कार्यकर्तेही या फेस्टिवलमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी तसेच परदेशी नागरिकांनी कोळी गीतांवर पावले थिरकवली आणि या कार्यक्रमात वेगळीच लज्जत आणली. मुंबई फेस्टिवलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅलेन यांनी या फेस्टिवलसाठी ५० हजार रुपयांची देणगी दिली. महापौर डॉ. शुभा राऊळ या कोळी पेहराव करीत कुटुंबीयांसमवेत तब्बल दोन तास या फेस्टिवलमध्ये सहभागी झाल्या होत्या. स्थानिक नगरसेविका छाया भानजी यांनी महापौरांना चक्क सोन्याचे दागिने काही काळ घालायला लावले. शिवसेनेचे विभागप्रमुख व आमदार अनिल परब, सेना नेते गजानन किर्तीकर, विरोधी पक्षनेते रामदास कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग, आमदार बलदेव खोसा, माजी नगरसेवक जयवंत परब, सुधार समितीचे अध्यक्ष शैलेश फणसे आदी सर्वपक्षीय मंडळींना या फेस्टिवलला भेट दिली. याशिवाय कविता लाड, प्राजक्ता कुलकर्णी, विनय येडेकर, मोहन भंडारी, तुषार दळवी आदी सिनेसृष्टीतील मंडळीही आवर्जून हजर होती. जगदिश भिकरू, महेंद्र लगडे व जयेंद्र लगडे यांनी या फेस्टिवलचे यशस्वी आयोजन केले.