Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

  मुलगा/ मुलगी दोघांसाठी सामायिक प्रश्न
  थर्ड आय : without SMS लिट्ल चॅम्प्स्
  दवंडी : सिनेमाची बाजारपेठ!
 

क्रेझी कॉर्नर : पॉण्डस् रोमान्स सव्‍‌र्हे

  लँग्वेज कॉर्नर : भाषा वर्ग
  मनी मॅटर्स : सगळं काही वेळेतच झालं पाहिजे
  दिशा : एलिगन्ट अफेअर्स-इव्हेंट डेकोरेटर्स्
  इव्हेंट कॉर्नर : सासनगीर नॅशनल पार्क
  बुक कॉर्नर : शुभमंगल सावधान
  फूडकॉर्नर : भेंडी

स्वगता : हॅलो नेहा, स्वगता बोलतेय.
नेहा : बोल स्वगता, कशी आहेस तू? काय चाललंय? किती दिवसांनी फोन करतेयस?
स्वगता : अग हो! हो! किती प्रश्न एकदम विचारशील? मी मजेत आहे ग. पण तुला तर माहितीच आहे नं की, माझं ऑफिसचं टायमिंग किती विचित्र आहे ते! भेटणं तर सोडच, फोनही करायला वेळ मिळत नाही.
नेहा : ते खरंय. पण तुला ‘गुड न्यूज’ कळली का नाही?
स्वगता : कुठली?
नेहा : अग, प्रणोतीचं लग्न ठरलंय.
स्वगता : खरंच? कुणाशी? कोण आहे मुलगा? आणि काय करतो?
नेहा : घरचाच व्यवसाय आहे त्यांचा. गडगंज श्रीमंत आहेत. चार भाऊ आणि एक बहीण. सगळे एकत्र राहतात. अगदी के

 

सिरियलमध्ये शोभेल असं घर आहे म्हणे..
स्वगता : बरीच माहिती काढली आहेस की..
नेहा : मी कुठली एवढय़ा मॅक्रो लेव्हलवर जाऊन माहिती काढणार आहे? अगं, तिच्या सासूबाई माझ्या मावशीच्या लांबच्या नात्यातल्या. त्यामुळे सगळी बित्तंबातमी मिळाली आणि तुला गंमत सांगू का, आधी माझी आई आणि मावशी, या स्थळाचाच माझ्यासाठी विचार करत होत्या.
स्वगता : काय सांगतेस काय? म्हणजे खरं तर तूच ‘श्रीमंत पतीची राणी’ व्हायचीस!
नेहा : छे! शक्यच नाही.
स्वगता : का गं! असं का म्हणतेस?
नेहा : अगं, घरची श्रीमंती आहे. नोकर-चाकर, बंगला, गाडी सगळं आहे.. एखाद्या मुलीच्या दृष्टीनं अगदी आयडियल स्थळ. लग्नानंतर फक्त ताटावरून पाटावर आणि पाटावरून ताटावर.
स्वगता : मग? घोडं कुठं अडलं?
नेहा : अगं, त्यांना नोकरी करणारी मुलगी नको होती. लग्न झाल्यावर मुलीनं नोकरी सोडायची ही अटच होती त्यांची आणि मला तर ते पटणं शक्यच नव्हतं. आई-मावशी वैतागल्या होत्या माझ्यावर पण मी ठाम सांगितलं, मी नोकरी सोडणार नाही. प्रणोतीचं लग्न ठरल्यावर, आईसाहेबांचं चाललंच होतं की बघ, जे तू नाकारलं, ते तिनं स्वीकारलं.
स्वगता : पण प्रणोतीनं तरी कशी ही अट मान्य केली गं! एवढी इंजिनीयर झालेली मुलगी.. एमएनसीत छान नोकरी होती तिला..
नेहा : मी विचारलं तिला त्याबद्दल. तेव्हा ती काय म्हणाली माहित्ये!
स्वगता : काय?
नेहा : ती म्हणाली, शेवटी नोकरी-करिअर करायची ती पैशासाठीच ना? आणि सासर श्रीमंत असेल तर मग कशाला ही नोकरीची दगदग करायची?
स्वगता : अगं, पण ती इंजिनीयर झाली आहे ना? असेच विचार होते, तर मग कशाला एवढं इंजिनीयरिंगला जायचं?
नेहा : एक्झ्ॉक्टली. मी पण हेच विचारलं तिला. तर त्यावर मी म्हणाली, म्हणजे काय? ती माझी आवड आहे. म्हणून गेले. बी. ए. बी. कॉम. होण्यापेक्षा इंजिनीयर झाले आणि तिचा नवरा.. तोही धन्य.
स्वगता : आता त्यानं काय केलं?
नेहा : तो तिला म्हणत होता. चारचौघात तू इंजिनीयर आहेस असं सांगायला तरी छान वाटतंय.. आता बोल.
स्वगता : म्हणजे अगदी ३६ गुण जमताहेत गं. बरंय.. सुखी संसार होईल त्यांचा.
नेहा : असंच दिसतंय. पण आपलं काय मॅडम? आपली वरसंशोधनाची मोहीम कुठपर्यंत?
स्वगता : अजून तुझ्यापर्यंत ‘गुड न्यूज’ आलेली नाही म्हणजे जैसे थे. आमचं काही तुमच्यासारखं नाही बाबा. लव्ह मॅरेज नाही म्हटल्यावर कांदेपोहे लग्नाला पर्यायच नाही..
नेहा : स्वगता, मला असं वाटतं, ब्लड टेस्ट करून घेणं वगैरे अटीबाबत तू एवढी आग्रही राहू नकोस.
स्वगता : तू आता माझ्या आई-आजीसारखंच बोलायला लागलीस. अग, तू आजच्या पिढीची आहेस. तू तरी निदान याची गरज मान्य केली पाहिजेस.
नेहा : बरोबर आहे ग तुझं म्हणणं पण अशा टेस्ट करून घेणं म्हणजे सुरुवातच अविश्वासाच्या पायावर होतेय, असं वाटतं.
स्वगता : असं कसं म्हणून चालेल? आज काळाची गरज आहे. विश्वास- अविश्वासाचा प्रश्न येतोच कुठे? आपल्याकडे एखादी गोष्ट मान्य करायची नसेल तर भावनाना हात घातला जातो. इथं भावनेपेक्षा रॅशनल थिंकिंगची गरज आहे.
नेहा : पटतंय ग मला तुझं म्हणणं.
स्वगता : नुसतं पटून उपयोग नाही. स्वप्नाचं काय झालं माहित्येय ना?
नेहा : हो गं. तिची एच. आय. व्ही. टेस्ट पॉझिटिव्ह आली ना! असं कसं झालं असेल गं? चेहेऱ्यावरून किती साधी वाटते नाही!
स्वगता : साधी वाटते नाही. साधीच आहे. तिला झालेली एचआयव्हीची लागण ही तिच्या नवऱ्याकडून मिळालेली ‘भेट’ होती.
नेहा : काय सांगतेस काय!
स्वगत : तीच तर गंमत आहे. ती एचआयव्ही पॉझिटिव्ह निघाल्यानंतर लगेच सगळ्यांनी तिलाच दोषी ठरवलं. तिच्या आई-वडिलांनी तिच्या नवऱ्याला टेस्ट करून घ्यायला सांगितली तर तिच्या सासरच्यांचं माथंच भडकलं. तुमचीच मुलगी वाईट चालीची आहे. आम्हाला फसवलं.. वगैरे कांगावा केला. पण तिच्या आई-वडिलांनी सोडलं नाही त्याला. या गोष्टीचा पाठपुरावाच केला. तेव्हा खरी गोष्ट बाहेर आली.
नेहा : म्हणजे तो लफडेबाज होता का काय!
स्वगता : तर काय! महाराजांनी आधी बरेच रंगढंग उधळले होते. अनेक पोरींबरोबर मजा केली होती..
नेहा : आणि हे सगळं लपवून ठेवलं?
स्वगता: उघड आहे. आणि दिसायला बोलायला- वागायला असा मिठ्ठास आहे ना की, शंका म्हणून येऊ नये.
नेहा : हो ग, पण स्वप्नाच्या आणि तिच्या होणाऱ्या बाळाचं नुकसान झालं त्याचं काय?
स्वगता : म्हणूनच तर आधी या सगळ्या टेस्टस् करून घ्यायच्या. प्रेम आंधळं असतं, पण लग्न डोळस असायला हवं.
नेहा : पण मला एक सांग, एचआयव्ही टेस्ट पॉझिटिव्ह झाली याचा अर्थ तो मुलगा बाहेरख्यालीच आहे, असं नाही म्हणता येत.
स्वगता : पण त्या शक्यतेची शक्यता जास्त असते. अदरवाइज ब्लड ट्रान्सफ्युजन करतानाही या रोगाची लागण होऊ शकते. नाही असं नाही.
नेहा : अशा आणखी कुठल्या टेस्टस् करून घ्यायला लागतात?
स्वगता : ब्लड ग्रुप, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस (एचआयव्ही, व्हीडीआर एल आणि हिपॅटायटीस बी) सीबीसी (ब्लड काऊंट) हिमोग्लोबिन, ब्लड शुगर, थॅलॅसिमिया.. या लग्नाआधीच्या चाचण्या मस्ट.
नेहा : बराच अभ्यास केला आहेस की..
स्वगता : म्हणजे काय? व्यवस्थित डॉक्टरांशी बोलून ही लिस्ट तयार केलीये.
नेहा : पण मग मुलं या टेस्टना तयार होतात?
स्वगता : कोणी तयार होतात. कोणी नाही. कुणाला माझी ही
मागणी अवास्तव वाटते. कोणाला मी आगाऊ वाटते. एका मुलाच्या
आईनं निरोप पाठवला होता की, आतापासूनच ही मुलगी अशी वागतेय, लग्नानंतर अजूनच डोईजड होईल. तेव्हा आम्हाला नको.
नेहा : तीच तर भीती वाटते. लोकांना कळतंय पण वळत नाही, अशी स्थिती आहे.
स्वगता : म्हणून तर आपण फर्म राहायचं. शिवाजी जन्मू देत तर दुसऱ्याच्या घरी, हा अ‍ॅटिटय़ूड काय कामाचा? सुरुवात स्वत:पासूनच करायची.
नेहा : पण या अट्टाहासात तुझं लग्नाचं वय उलटून जातंय, असं नाही वाटत? आणि रागावू नकोस, पण एक शक्यता म्हणून विचारते, समजा तुझं लग्नच झालं नाही तर?
स्वगता : कसं अगदी आई-आजीसारखं बोललीस.. नाही, पण मी खूप आशावादी आहे. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येत ‘शहाण्या’ आणि ‘समजूतदार’ मुलांची संख्या एवढी कमी असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला वाटतं तसं होणार नाही. एक दिवस तुलाही माझ्याकडून ‘गुड न्यूज’ मिळेलच.
नेहा : असंच होईल पोरी, माझा आशीर्वाद आहे तुला. पण मला एक सांग, या सगळ्या टेस्टस् होतात कुठं?
स्वगता : का ग बाई?
नेहा : नाही म्हणजे मीही विचार करतेय, करूनच घ्याव्यात या टेस्टस्..
स्वगता : देअर यू आर..
shubhadey@gmail.com