Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सातारा जिल्ह्य़ातील गुणवंत शिक्षकांचा उद्या गौरव
सातारा, ५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते जिल्ह्य़ातील गुणवंत शिक्षक- विद्यार्थ्यांचा गौरव येत्या ७ फेब्रुवारी रोजी क्रांतिस्मृती मैदानावर होणाऱ्या शिक्षकांच्या महामेळाव्यात होणार आहे. निवड करण्यात आलेल्या गुणवंत शिक्षकांची नावे जि.प.चे उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
जि.प. अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पाटील यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आलेले तालुकानिहाय गुणवंत शिक्षक पुढीलप्रमाणे- कराड- कमल शेलार (मुख्याध्यापक, विठामाता विद्यालय), माण- विठ्ठल सजगणे (उपशिक्षक, कन्या विद्यालय, म्हसवड), खटाव- अंकुश शिंदे (उपमुख्याध्यापक, श्री विद्यालय, औंध), पाटण- सुधीर कुंभार (उपशिक्षक, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, ढेबेवाडी), महाबळेश्वर- विनायक पवार (मुख्याध्यापक, गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर), कोरेगाव- अनिल बोधे (उपशिक्षक, आदर्श विद्यालय, रहिमतपूर), खंडाळा- विजय वैद्य (उपप्राचार्य, राजेंद्र उच्च प्राथमिक विद्यालय, खंडाळा), सातारा- सुनंदा शिवदास (उपशिक्षिका, श्रीपतराव पाटील हायस्कूल, सातारा), फलटण- महम्मद शेख (उपशिक्षक, मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण), जावळी- मानसिंग पवार (मुख्याध्यापक, महाराजा शिवाजी हायस्कूल, तुडाळ), वाई-प्रकाश काटवटे (मुख्याध्यापक- बाळासाहेब पवार हायस्कूल, उडतरे), विशेष पुरस्कार- रंगराव दरेकर (क्रीडाशिक्षक, महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा), सर्व शिक्षा अभियान- मिलन मुळे (जि.प. मुख्यालय), शिक्षकेतर गुणवंत कर्मचारी- राजेश भोसले (वाय. सी. कॉलेज, सातारा). निरंतर शिक्षण प्रेरक- कराड- खंडोजी गुगले (कार्वे), पाटण- रामचंद्र भिसे (थेरपळे), फलटण- पंढरीनाथ शिंदे (ताथवडा), सातारा- प्रमिला जाधव (न.प. शाळा क्र.६), जावळी- संजय दळवी (केळघर), खंडाळा- चंद्रकला राऊत (शिरवळ), वाई- सुनंदा घाडगे (एकसर), माण- सुवर्णा एकबोटे (पळशी), खटाव- जयश्री कुलकर्णी (म्हासुर्णे), कोरेगाव- मीना साळुंखे (वाठार किरोली), महाबळेश्वर- भारती बावळेकर (मेतगुताड)
उत्कृष्ट शाळा-
सर्वागीण शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये सवरेत्कृष्ठ पुढील शाळांची निवड जाहीर झाली आहे- वरिष्ठ शाळा- प्रथम- जि.प. शाळा, वाघेश्वर (कराड), द्वितीय- जि.प. शाळा एकंबे (कोरेगाव), तृतीय- जि.प. शाळा वाघोशी (खंडाळा).
कनिष्ठ प्राथमिक शाळा- प्रथम- शिवाजीनगर (सातारा), द्वितीय- संजय गांधीनगर (फलटण), तृतीय- ११ शिंदेनगर (माण), २) निकमवाडी (वाई).
न.पा. वरिष्ठ प्राथमिक शाळा- प्रथम- न.पा. शाळा क्र.३ (फलटण), न.पा. कनिष्ठ प्राथमिक शाळा- प्रथम- न.पा. शाळा क्र.५ (वाई)
द्विशिक्षकी शाळा- प्रथम- जि.प. प्राथमिक शाळा करदोशी (जावळी), द्वितीय- जि.प. प्राथमिक शाळा- रेठरे पवारमळा (कराड), तृतीय- जि.प. प्राथमिक शाळा मुसांडवाडी (खटाव)
बहुशिक्षिकी शाळा- प्रथम- जि.प. प्राथमिक शाळा, म्हाते खुर्द (जावली), द्वितीय- जि.प. शाळा निरगुडी (फलटण), तृतीय- जि.प. शाळा वाघोशी (खंडाळा), तृतीय क्र. जि.प. निगडी (कोरेगाव)