Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘मविप्र’मध्ये ‘डॉक्टर व रूग्ण सुसंवाद’ परिसंवादाचे आयोजन
नाशिक, ५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) संचलीत

 

वैद्यकिय महाविद्यालयातर्फे डॉक्टर रूग्ण यांच्यामधील ‘सुसंवाद’ या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी आडगांव येथील मविप्र रूग्णालय सभागृहात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भालचंद्र गाडगीळ यांच्या हस्ते परिसंवादाचे उद्घाटन होईल, असे सरचिटणीस डॉ. वसंत पवार यांनी कळविले आहे.
यावेळी भारतीय आयुर्विज्ञान परिषद अमृत महोत्सव समितीचे डॉ. पी. जी. जाधव, दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या औषधशास्त्र विभागचे अधिष्ठाता डॉ. शंशाक दळवी, भारतीय आयुर्विज्ञान समितीचे सदस्य डॉ. दिलीप म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे विशेष अधिकारी डॉ. संजय बिजवे उपस्थित राहणार आहेत. मविप्रच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील या उपस्थितांना संबोधन करतील.
परिसंवादा दरम्यान डॉक्टर आणि रूग्ण यामधील नात्यांचे विविध पैलू उलगडण्यात येवून या विषयास अनुसरून डॉक्टर-रूग्ण संबधाच्या अनुषंगाने नैतिक बाबी आणि संवादाचे मह्तव या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. वेदप्रकाश मिश्रा ,रोगप्रतिबंधक व सामाजिक वैद्यक विभाग विभागप्रमुख डॉ. रेखा रेगे, विकृतीविज्ञान विभाग प्रमुख डॉ. सुरेश महाजन सहभागी होतील.
‘व्यवसायिक आहार आणि आदर्श आचरण’ या विषयावर वैद्यकशास्त्र विभाग अधिष्ठाता डॉ. शशांक दळवी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत संकलेचा, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ, किरण पाटोळे यांचा सहभाग असेल. डॉक्टर रूग्ण संबधातील कायदेशीर बाबी’ या विषयावरील परिसंवादात आ. डॉ. पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भालसिंग, शल्यचिकीत्सा विभागप्रमुख डॉ. सुधीर भामरे सहभागी होतील.