Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ६ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक
दिंडोरी मतदार संघातील परिस्थितीचा आढावा नुकत्याच येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत

 

घेण्यात आला. मागील वेळी ही जागा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आली असताना पक्षाने ती मित्रपक्ष जनता दलास सोडली होती. आगामी निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. दिंडोरी मतदारसंघात समाविष्ट झालेले विधानसभेचे कळवण, दिंडोरी, चांदवड, निफाड, येवला मतदारसंघात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आहेत. स्थानिक आमदारांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे करून विविध प्रश्नांची सोडवणूक केली आहे. पक्षाचे चांगले काम उभे राहत असताना स्थानिक पातळीवर कुठेही कमी पडता कामा नये, असा सल्ला पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटय़े यांनी दिला. गाव पातळीवर राष्ट्रवादीची शाखा असणे आवश्यक असून त्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करता येते. यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे जाळे अधिकाधिक कसे घट्ट करता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीस सुनील जाधव, धनंजय ठाकरे, विलास शिंदे, देवराम शिंदे, गुलाब भवर, माधवराव पवार आदी उपस्थित होते.