Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

जिवे मारण्याची धमकी देऊन वृद्ध महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल
फलटण, ६ फेब्रुवारी / वार्ताहर

 

एका वृद्ध देवॠषी महिलेस जिवे मारण्याची धमकी देत मुंजवडी (ता. फलटण) येथे तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित वृद्ध महिला व तो तरुण दोघेही सोलापूर जिल्ह्य़ातील आहेत.धर्मपुरी (ता. माळशिरस जि. सोलापूर) येथील ६९ वर्षीय वृद्धा देवॠषीचे काम करते. त्याच गावातील तिच्या ओळखीच्या महावीर काशिद (वय ४०) याने मुंजवडी (ता. फलटण) येथील नातेवाईकांचा मुलगा सारखा आजारी असतो. त्याला डॉक्टरचाही गुण येत नसल्यामुळे त्याला नजरेखालून घाला अशी विनवणी वारंवार काशिद याने त्या वृद्धेकडे केल्याने ती वृद्ध मुंजवडी येथे येण्यास तयार झाली.
गुरुवारी काशिद याने दु. ३.३० वा. दरम्यान त्या वृद्धेस धर्मपुरीहून निरा उजवा कालव्यावरून तिला चालत मुंजवडी गावाच्या हद्दीत आणल्यावर एका झाडाच्या सावलीत थकल्यामुळे दोघे विश्रांती घेत बसले. या वेळी महावीर काशिद याने खिशातील दारूची बाटली काढून मनसोक्त दारू पिली. त्याच्यावर दारूचा अंमल चढल्यावर त्याचे वर्तन बदलले आणि तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.
संबंधित घटनेची फिर्याद त्या वृद्धेने नातेपुते (ता. माळशिरस) पोलिसांकडे दिल्यावर संबंधित गुन्हा फलटण पोलिसांच्या हद्दीत घडल्याने तो फलटण पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्यावर फलटण पोलिसांनी मद्यपि काशिद याला अटक करून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्या. सी. पी. नेरे यांच्यासमोर उभे केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.अधिक तपास फौजदारवाघमोडे करीत आहेत.