Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राज ठाकरे आज वाशीत मराठीविषयी भूमिका मांडणार
पत्रकार संघटनेचा कार्यक्रम असल्याने पालकमंत्री या नात्याने गणेश नाईक उद्घाटन समारंभाला हजर

 

राहणार असले तरीही राज ठाकरे यांच्या भाषणाच्या वेळी ते तिथे नसतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे राज ठाकरे यांची मराठीविषयीची भूमिका ऐकून घेणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

बेलापूर/वार्ताहर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या वाशी येथे एका कार्यक्रमात मराठीविषयीची आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. नवी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पाचव्या वर्धापनदिनानिमित्त भावे नाटय़गृहात एका कार्यक्रमाचे आयोजन ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ठाकरे तर उद्घाटक म्हणून पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित राहणार आहेत.
मार्मिकचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. राज ठाकरे ‘मी मराठी व माझी भूमिका’ या विषयावर बोलणार आहेत. राज ठाकरेंसह शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे, काँग्रेसचे उल्हासदादा पवार, आमदार मंदा म्हात्रे आदी सर्वपक्षीय नेते नवी मुंबईत प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र येणार असल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. ठाकरे हे नवी मुंबईत प्रथमच जाहीर कार्यक्रमातून नवी मुंबईकरांच्या मनाला गवसणी घालणार आहेत.