Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ७ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

शहिदांच्या श्रद्धांजली फलकावर धुळीचे थर
पनवेल/प्रतिनिधी : मुंबईवर २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा ठरलेल्या पोलीस

 

अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर धुळीचे थर जमा झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे हा फलक पनवेल शहर पोलीस ठाण्याबाहेरच पत्रकारांच्या एका संघटनेतर्फे लावण्यात आल्याने यातील गांभीर्य वाढले आहे. पनवेलमधील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर लावण्यात आलेला हा फलक गेले अडीच महिने धूळ व धूर झेलत असून हुतात्मा झालेल्या पोलिसांचा हा अवमान असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्यांचे प्रतिनिधी तसेच दिवंगत सहकर्मचाऱ्यांचा आदर न करणारे पोलीस एवढे उदासीन व संवेदनाहीन असतील तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. संबंधितांनी हा फलक काढून हुतात्म्यांची विटंबना थांबवावी, अशीही मागणी होत आहे.