Leading International Marathi News Daily

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

प्रशांत ननावरे
‘व्हॅलेंटाईन्स डे’ म्हणजे जगभरातल्या सर्व प्रेमी युगलांचा हक्काचा दिवस. रोमच्या साम्राज्यात ल्युफॉनस आणि फाँन्स या देवतांचा तसंच रोमन साम्राज्याचे संस्थापक रोम्युलस आणि रोमस यांच्या स्मरणार्थ प्रेमाचा उत्सव १५ फेब्रुवारीला साजरा केला जात असे. या उत्सवाच्या दिवशी तरुण मुलं एका खोक्यातून मुलींच्या नावाच्या चिठ्ठय़ा काढत. चिठ्ठीत नाव असलेली मुलगी आणि तो तरुण वर्षभर एकमेकांचे जोडीदार म्हणून ओळखले जात आणि या वर्षभरात एकमेकांच्या प्रेमात पडले तर लग्न करत. पुढे इसवी सन २७०च्या सुमारास रोमला अनेक युद्धांना सामोरं जावं लागलं. लोक आपल्या पत्नींना, प्रेयसींना सोडून युद्धावर जाण्यास, सैन्यात भरती होण्यास तयार नसत.

शुभेच्छापत्रांना पर्याय नाही
प्रतिनिधी

आजकाल बहुतेक सर्वाच्याच घरी इंटरनेट असते. आपली प्रिय व्यक्ती कितीही दूर असली तरी इ-मेल, चॅट, मोबाइलच्या माध्यमातून आपण सतत तिच्या संपर्कात राहू शकतो. असे असतानाही गिफ्ट शॉप्स सध्या गुलाबी दिसू लागली आहेत.

‘आनंदवन' भुवनी!
प्रशांत मोरे

सगे-सोयरे आणि समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्यांनी स्वकष्टाने उभारलेली आदर्श वसाहत, एवढय़ापुरतीच आता आनंदवनची ओळख सीमित राहिलेली नाही. ‘श्रम ही है श्रीराम हमारा’ हा बाबा आमटे यांनी दिलेला मंत्र आचरणात आणून प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देत आनंदवनातले हे रहिवासी सन्मानाने जगायला शिकलेच, शिवाय आजूबाजूच्या हताश आणि निराश समाजजीवनातही त्यांनी चैतन्याचे बीज पेरले. येत्या ९ फेब्रुवारीला बाबा आमटे यांचा प्रथम स्मृतिदिन. या निमित्ताने आनंदवन, झरी-झामणी, हेमलकसा आणि सोमनाथ या प्रकल्पांना भेट देऊन लिहिलेला वृत्तान्त..

७ फेब्रुवारी
सक्काळी सक्काळी कोणाचे तोंड पाहून निघालो होतो देव जाणे. कॉलेजमध्ये बघून न बघितल्यासारखे करणारा जसबीर, मांजर आडवं यावं तसा आडवा आला. ‘बेस्ट’चा किंवा रिक्षाचा संप असेल तेव्हा लांबच लांब रांगेत मला पाहून याने कधीही बाईक थांबवली नाही.

आपलं आपलं आभाळ
सस्नेह कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, सांगली या संस्थ्येच्यावतीने राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत सोमवार ९ फेब्रुवारी रोजी ‘आपलं आपलं आभाळ’ हे नाटक सादर केले जाणार आहे.
प्रसिद्ध आफ्रिकन नाटककार सर अॅथल फुगार्ड यांच्या ‘रोड टू मक्का’ या नाटकाचे प्राची गोडबोले यांनी केलेले हे स्वैर भाषांतर आहे. १९८० च्या दरम्यान आफ्रिकेत सर्वत्र वर्णद्वेषाच्या विरोधात जोरदार आंदोलन सूरू असताना घडणारे हे कथानक सत्य घटनेवर आधारित आहे.

माझे नाना आजोबा
चित्रकार आणि ज. जी. कला महाविद्यालयातील माजी शिक्षक बाळकृष्ण शिरगावकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अलीकडेच ज. जी. कला महाविद्यालयाच्या उपयोजित कला दालनात त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यानिमित्त त्यांची नात दीप्ती शिरगावकर यांनी व्यक्त केलेल्या आपल्या भावना..
असं म्हणतात की, माणसाला म्हातारपण आलं की, त्याचं आयुष्य एकलकोंडं उदासीन होतं.मात्र अशी फार थोडी माणसं असतात ती, त्यांच्या ऐन वार्धक्यात ते जीवनाची नवीन तेजस्वी पहाट फुलवतात, त्याचा आनंद सर्वत्र पसरवतात आणि ‘आयुष्यात अजून काहीतरी करायचं राहून गेलं आहे’, अशा खंबीर ध्यासानं एका अपूर्व उत्साहानं कार्यमग्न राहतात. असंच एक सदासतेज, प्रफुल्लित, रुबाबदार, स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व माझ्या आजोबांचं होतं.

सावधान, पुढे वळण आहे! देव डी
चित्रपट चांगले, वाईट, जमलेले, फसलेले, चाललेले, पडलेले असे अनेक प्रकारचे असतात. चित्रपट पाहण्याच्या आणि चित्रपट बनविण्याच्या साधारणत: काही चौकटी असतात. काहींना वेगळे पहायला, बनवायला आवडते, परंतु त्या वेगळेपणाच्याही चौकटी तयार झालेल्या असतात. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काहींना चौकटींची मोडतोड करण्यात आणि चित्रपटाची व्याकरणे भिरकावून देण्यातच अधिक स्वारस्य असते. थोडक्यात चित्रपटाच्या तंत्राशी खेळण्यात त्यांना गंमत वाटत असते.

‘चेहरामोहरा’ ‘रहस्य’ नसलेलं रहस्यनाटय़
‘डॉ. जेकिल अॅंड मि. हाईड’ ही जगप्रसिद्ध कलाकृती आहे. त्यावर आधारित किंवा तिचं रूपांतर वा भाषांतर असलेल्या अनेक कलाकृती जगभरात विविध भाषांतून आजवर आलेल्या आहेत. चंद्रलेखा संस्थेचं यशवंत रांजणकर लिखित आणि दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित ‘चेहरामोहरा’ हे नाटकही त्यावर बेतलेलं आहे. मात्र, यात रहस्य सुरुवातीलाच उघड झाल्यानं त्यात काहीच उरत नाही. ते एक सामान्य नाटक होऊन जातं.डॉ. विवेकच्या वडिलांचे धंद्यातील दोन भागीदार आणि त्यांचे मुनिम नाना कीर्तने यांनी त्यांना धंद्यातल्या एका व्यवहारात फसवून गजाआड केलेलं असतं आणि त्यांचा धंदा बळकावलेला असतो.

कशी असते पुरस्कार प्रक्रिया?
भारताला ‘ग्रॅमी’ पुरस्कार फार मिळत नाही. त्यामागे अॅकॅडमीत एकही भारतीय सभासद नाही हे महत्त्वाचं कारण सांगितलं जात असलं, तरी सभासद होण्यासाठीदेखील आधी ‘ग्रॅमी’ मिळवावं लागतं हेही कटू सत्य आहे. कलाकार, निर्माते, साऊंड इंजिनीअर या माजी पुरस्कार प्राप्त व्यक्तींनाच अॅकॅडमीचे सभासदत्व दिले जाते.नामांकने दरवर्षी ३ डिसेंबर रोजी घोषित केल्यानंतर वर्षभरात तयार झालेल्या गाण्यांची, आल्बम्सची शिफारस जगभरातील एकूण सात हजार सभासदांकडे विभागून केली जाते. त्यातून या सभासदांनी निपक्षपातीपणे आपले मत व्यक्त करणे अनिवार्य असते.

देबाशिष भट्टाचार्य आणि लक्ष्मी शंकर
‘बेस्ट ट्रॅडिशनल वर्ल्ड म्युझिक आल्बम’ या गटात या दोन्ही भारतीयांची ‘ग्रॅमी’साठी यंदा चुरस आहे. ‘कलकत्ता क्रॉनिकल्स : स्लाईड गिटार ओडिसी’ हा देबाशिष भट्टाचार्य यांच्या आल्बममध्ये गिटारवर मिंड काढून रागदारी संगीताचा वापर करण्यात आला आहे. गिटार हे मुळात पाश्चात्य वाद्य असल्याने, त्यावर रागदारी वाजवणे स्वरसातत्याच्या अभावामुळे अवघड असते. मात्र देबाशिष भट्टाचार्य यांनी गिटारमधून स्वरसातत्य मिळविण्यासाठी आपल्या गिटारच्या रचनेत विशिष्ट असा बदल केला आहे. भारतीय रागदारीसोबत आपल्या वादनाच्या शैलीत त्यांनी जॅझ, ब्लू या म्यूझिकचाही समावेश केला आहे. लक्ष्मी अय्यर यापूर्वीच्या नृत्यांगना असून आपल्या ‘डान्सिंग इन द लाइट’ या आल्बममध्ये त्यांनी पुरिया धनाश्री, खमाज आणि सिंधभैरवी या रागांचा आधार घेऊन ख्याल, ठुमरी आणि भजने स्वरबद्ध केली आहेत. या दोघा कलाकारांसोबत या गटामध्ये माली या देशातील तौमनी डायाबेट हा संगीतकार आणि गायक व ‘लेडी स्मिथ अॅण्ड ब्लॅक मम्बाझो’ या दक्षिण अफ्रिकेतील कोरस बँडचा नवा आल्बमदेखील आहे. ‘लेडी स्मिथ अॅण्ड ब्लॅक मम्बाझो’ हा बँड गेल्या ४० वर्षांंपासून संगीत प्रवाहात आहे. सत्तराहून अधिक आल्बम बनविणाऱ्या या बँडने ‘ग्रॅमी’ पुरस्कार आधी पटकावला आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांंपूर्वीदेखील आशा भोसले, अनुष्का शंकर यांच्या गटातदेखील या बँडच्या आल्बमला नामांकन मिळाले होते.

लुईस बँक
आपल्याकडे जॅझ म्युझिकचं फारसं वेड सहसा दिसत नाही. प्रख्यात जॅझ पियानोवादक लुईस बँक यांनी माईल्स डेव्हिस या आधुनिक जॅझच्या प्रणेत्याला आपला ‘माईल्स फ्रॉम इंडिया’ हा आल्बम अर्पण केला आहे. माईल्स डेव्हिस यांचे भारतीय संगीतावर प्रचंड प्रेम होते. ‘माईल्स फॉर इंडिया’ आणि जगप्रसिद्ध गिटार वादक जॉन मॅकक्कॉलिन यांच्यासोबत केलेल्या ‘फ्लोटिंग पॉईंट’ या आल्बमसाठी ‘कन्टेम्पररी जॅझ आल्बम’ या गटात बँक यांना नामांकने मिळाली आहेत. त्यांच्यासोबत या गटात अमेरिकेतील ट्रम्पेट वादक रॅण्डी ब्रेकर, फ्यूजन-जॅझ संगीत वाजविणारा येलोजॅकेट बँड आणि ग्रॅग फिल्ड, टॉम स्कॉट यांना नामांकने मिळाली आहेत.

रेकॉर्ड ऑफ दी इयर
मथांगी माया अरुलप्रगासम (एम.आय.ए) हिला ‘ग्रॅमी’साठी ‘रेकॉर्ड ऑफ दी इयर’चे नामांकन मिळाले आहे, असं म्हटलं तर काहीच कळणार नाही. या तामिळ वंशीय आणि सध्या ब्रिटनची नागरिक असलेल्या गायिकेचं ‘ऑस्कर’साठी नामांकन झालेलं ‘ओ सय्या’ हे रेहमानसोबतचं गाणं आपण ‘स्लमडॉग मिलियेनर’मध्ये अनेकदा ऐकलेलं आहे. तिचं ‘पेपर प्लान’ हे इंग्रजी गाणेदेखील ‘स्लमडॉग मिलियेनर’मध्ये वापरण्यात आलं आहे. ‘कला’ या सिंगल आल्बमसाठी गेल्या वर्षी एम.आय.ए हिने हे गाणं बनवलं होतं. हे गाणे आधी सेट रॉगनच्या ‘पायनॅपल एक्स्प्रेस’ आणि डॅनी बॉयल यांच्या ‘स्लमडॉग’मध्ये झळकलं आणि प्रचंड लोकप्रिय बनलं. त्यामुळेच ‘ग्रॅमी’च्या ‘रेकॉर्ड ऑफ दी इयर’च्या सन्मानासाठी गाण्याला नामांकन मिळाले आहे.

गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन शिबीर
प्रतिनिधी: महाराष्ट्र सोसायटीज् वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने रविवारी ८ फेब्रुवारी रोजी कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल येथील सर्व गृहनिर्माण संस्थांसाठी विनामूल्य चर्चासत्र व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे शिबीर होणार असून दैनिक सकाळचे संपादक विनायक पात्रुडकर यावेळी प्रमुख पाहुणे आहेत. पनवेल येथे चिंतामणी मंगल कार्यालय प्लॉट क्रमांक ५७/४ तालुका पोलीस ठाण्यानजीक हे शिबीर होणार आहे. गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन - प्रभाकर चुरी,कन्व्हेयन्स - विजय सामंत, स्टँप डय़ुटी व नोंदणी - रमेश प्रभु यांची मार्गदर्शनपर भाषणे होतील. अधिक माहितीसाठी संपर्क सायंकाळी ७ नंतर व्ही. पी. महाजन - ९३२१८६६३३३ .

‘कोंडून घेतले नव्हते’
प्रतिनिधी : ‘स्पिरिच्युअल जर्नी आस्पेक्ट ऑफ सिख स्टडीज’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेनंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी स्वत:ला कोंडून घेतले नव्हते. तर ते एका कार्यक्रमासाठी निघून गेले होते, असा खुलासा मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे. ‘कुलगुरूंनी कोंडून घेतले’ या ५ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत विद्यापीठाने हा खुलासा केला आहे. विद्यापीठाने केलेल्या खुलाशात पुढे म्हटले आहे की, पत्रकार परिषदेचा विषय हा केवळ त्या अध्यासनाच्याच संदर्भात असल्याने आणि विद्यापीठातील अनेक बाबींची चौकशी सुरू असल्याने इतर कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देणार नाही, अशी भूमिका कुलगुरुंनी जाहीर केली होती. शिवाय वेळ येताच पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करू, असेही कुलगुरू खोले यांनी स्पष्ट केले होते, असे विद्यापीठाने खुलाशात म्हटले आहे. दरम्यान, ‘मुंबई विद्यापीठाचे कुलपती अद्याप एस. एम. कृष्णाच’ या मुंबई वृत्तान्तमध्ये ५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबतही विद्यापीठाने खुलासा केला आहे. या वृत्तानंतर संकेतस्थळावर तातडीने दुरूस्ती करण्यात आली आहे. अधिसभेची यादी नजरचुकीने अद्ययावत करण्याचे राहून गेल्याचा कबुली विद्यापीठाने या खुलाशामध्ये दिली आहे.