Leading International Marathi News Daily

रविवार , ८ फेब्रुवारी २००९

पाचव्या बहुभाषिक ब्राह्मण महाअधिवेशनाच्या निमित्ताने पुण्यात गेल्या आठवडय़ामध्ये चर्चेचा एकच धुरळा उडाला. जात-धर्म, संस्कृतीच्या आणाभाका खात क ोण प्रगत नि क ोण बुरसटलेले हे सिद्ध करण्यासाठी जणू अहमहमिका सुरू होती. अशा प्रकारची संमेलने व्हावीत की नाहीत, यावर कदाचित मतभेद होऊ शकतील. परंतु, एक गोष्ट नक्की; धर्माच्या नावाखाली व्यक्त होणारे अभिनिवेश आणि दांभिकता याला कडाडून विरोध केला पाहिजे. ‘यापुढे आम्हाला गृहीत धरू नका,’ असा झणझणीत इशारा या महाअधिवेशनाच्या निमित्ताने ब्राह्मणी व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षासारख्या घटकांना देण्यात आला आहे!

उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य लोकसभा मतदारसंघातील लढत नक्की कोणत्या उमेदवारांमध्ये होणार हे सांगणे जरी कठीण असले तरी ही लढत म्हणजे मुंबईत सुरू झालेल्या उत्तर भारतीय विरुद्ध मराठी या राजकारणाने सामान्य माणसांच्या मनात काय खदखदते आहे ते दाखवून देणारी लढत असणार आहे. मराठीच्या नावावर कितीही राजकारण केले तरी मराठी म्हणून मते शिवसेनेलाच मिळतात की, राज यांच्या आंदोलनाने दुखावलेले उत्तर भारतीय एक होऊन दोन्ही सेनांना धूळ चारतात हे या मतदारसंघात स्पष्ट होणार आहे. उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य लोकसभा मतदारसंघ हा मुंबईतील लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेमध्ये नव्याने तयार झालेला मतदारसंघ आहे. जुना दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ नव्या रचनेत दक्षिण मुंबईत विलीन झाला आणि जुन्या वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन उत्तर-मध्य व उत्तर पश्चिम असे दोन मतदारसंघ तयार झाले.

मोरेश्वर घैसास गुरुजी हे वेदभवन पाठशालेच्या माध्यमातून गुरुकुल पद्धतीने वेदाचे शास्त्रोक्त धडे देत आहेत. त्यांचे वडील वेदाचार्य विनायकशास्त्री यांनी १९४५ साली स्थापन केलेल्या या संस्थेचे १९८९ साली कोथरूड उपनगरातील देखण्या वास्तूमध्ये स्थलांतर करण्यात आले. सध्या तेथे १५ विद्यार्थी निशु:ल्क शिक्षण घेत आहेत. १० ते १२ वर्षांमधील विद्यार्थ्यांची त्यासाठी निवड करण्यात येते. त्यांना सुमारे १२ ते १५ वर्षांचा वेदशास्त्र अभ्यासक्रम शिकविला जातो. केवळ पौरोहित्याचे शिक्षण देणारी ही पाठशाला नाही. म्हणूनच हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वैदिक म्हणून या विद्यार्थ्यांना जगभर सन्मानाने बोलाविले जाते. त्यांच्याकडून वेदांचे धडे घेतले जातात. बोलाविले जाते. त्यांच्याकडून वेदांचे धडे घेतले जातात. पुण्यात झालेल्या पाचव्या बहुभाषिक ब्राह्मण महाअधिवेशनाचे घैसास गुरूजी हे अध्यक्ष होते. अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांवर घैसास गुरुजींनी व्यक्त केलेली ही भूमिका..

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमाताई करंदीकर यांचे बुधवारी निधन झाले. त्यानिमित्त ‘साहित्य सहवास’मधील त्यांच्या शेजारी विजया राजाध्यक्ष आणि वासंती फडके यांनी जागविलेल्या आठवणी.. फक्त विंदांचीच नव्हे तर सर्वाचीच ‘आदिमाया’. प्रसन्न, हसतमुख, स्वागतशील, स्नेहशील आणि कविपत्नी असल्यामुळे सहनशीलही!; उत्तम गृहिणी, कुशल शिक्षिका, रसिक वाचक आणि ‘सावली’, ‘जिद्द’, रास’ या वेधक पुस्तकांची लेखिकाही. या लेखनात एक ‘मुक्त’, ‘अपूर्व’, ‘अनुभवामृता’चा झरा संथपणे वाहत होता. ते सुमाताईंना व विंदांना जया, नंदू आणि उदय यांनी दिलेले संचित होते आणि त्यांना आयुष्यात याखेरीज आणखी काही नकोच होते. सुमाताईंइतकी निरिच्छ, स्वत:च्या कुटुंबात रमलेली, कुटुंबाला सर्वस्व देऊनही ‘पाहुणी’ न होता स्वत:तच राहणारी स्त्री आयुष्यात फार विरळपणे भेटते. ती आम्हाला सुमाताईंच्या रूपाने भेटली.

सुमाताई आस्तिक, भाऊ नास्तिक. भाऊ उंच तर सुमाताई त्यामानाने कमी उंच. भाऊ आक्रमक तर सुमाताई सोशिक. असा वरवर विरोधाभास आहे, असे वाटणारे साहित्य सहवासातील ६२ वर्षांचा सहजीवन जगलेले जोडपे विंदा करंदीकर व सुमाताई. विरोधी ध्रुव परस्परांकडे आकर्षित होतात त्याप्रमाणे एकमेकांकडे आकर्षित होऊन मनोभावे प्रेमाची उधळण करणारे हे जोडपे. साहित्य सहवासात स्थिर होण्यापूर्वी भाऊ-सुमाताईंनी राहत्या जागेसाठी खूपच वणवण केली होती. इथे राहायला आल्यावर सुमाताईंशी स्नेहबंध जुळले. एक तर सख्खे शेजारी. दुसरे म्हणजे त्यांचा मनमिळाऊ स्वभाव. सदा हसतमुख असणारी त्यांची मूर्ती. अगदी आताआतापर्यंत दाट काळ्याभोर केसांचा अंबाडा त्यांच्या मानेवर फारच खुलून दिसत असे. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या सुमाताईंना दुसऱ्याचे भरभरून कौतुक करण्याची सवय होती. स्वत:च्या साडय़ांची कधी त्यांनी फारशी फिकीर केलेली नाही; पण दुसऱ्याच्या जुन्या साडीचेही त्या खूप भरभरून कौतुक करीत. प्रत्येकीच्या साडीबद्दल त्या असेच उद्गार काढीत. त्याबद्दल आम्ही त्यांची कधी थट्टाही करीत असू; पण त्यांनी ते कधी मनाला लावून घेतले नाही.

जॉन अपडाईक या अमेरिकन लेखकाचे अलीकडेच निधन झाले. ते ७६ वषार्ंचे होते. अमेरिकन लेखक दोन प्रकारचे असतात. निव्वळ अमेरिकन लेखक आणि ‘न्यूयॉर्कर’चे अमेरिकन लेखक. ‘न्यूयॉर्कर’ या साप्ताहिकात लिहिणारे अमेरिकन लेखक इतरत्र क्वचितच लिहितात. वयाच्या बाराव्या वर्षी या ‘न्यूयॉर्कर’चे सबस्क्रीप्शन जॉन अपडाईक यांना मावशीने भेट दिले तेव्हापासून ते ‘न्यूयॉर्कर’ वाचत. पुढे बावीसाव्या वर्षी त्यांची पहिली कथा ‘न्यूयॉर्कर’ने स्वीकारली आणि सातत्याने ते त्यात लिहू लागले. आजतागायत त्यांच्या १४६ कथा ‘न्यूयॉर्कर’ने प्रसिद्ध केल्या आणि शेकडो लेख. त्याव्यतिरिक्त त्यांनी २३ कादंबऱ्या लिहिल्या, कविता लिहिल्या, चित्रकलेवर एक पुस्तक लिहिले, ते हॉवर्डचे पदवीधर होते. विपुल लिहिणारे अनेक लेखक असतात पण खूप लिहूनही दर्जा दाखवणारे थोडेच. अपडाईक यांच्या लेखनात कायम एक दर्जा आढळतो. त्यामुळे त्यांचे नाव नोबेल मिळवू शकतील अशांच्या यादीत घेतले जायचे. पण नोबेल मिळवण्यासाठी थोडेसे ‘पॉलिटिकिली अनक्टेक्ट’ असावे लागते.