Leading International Marathi News Daily
रविवार, ८ फेब्रुवारी २००९

सांसारिक प्रश्नांत लक्ष द्या
पंचमात शनी, दशमात बुध-गुरूचा सहयोग यामुळे विचारांना वेग येईल आणि परिश्रमाचा आनंदही मिळवून देतील. गुरुवारच्या रवी राश्यांतरामुळे परिचितांचा नवा परिवार तयार होणं शक्य आहे. त्यातून महत्त्वाची प्रकरणं मार्गी लावता येतील. संसारातील प्रश्नांवर मात्र गंभीरपणे लक्ष ठेवून निर्णय घेणे आवश्यक ठरेल. अन्यथा शुक्र-केतू ‘ध’ चा ‘मा’ करून त्रस्त करतील. सामाजिक चळवळीचे नेतृत्व करता येईल, दूरचे प्रवास होतील. मंगलकार्य ठरेल.
दिनांक : १०, ११, १४ शुभकाळ.
महिलांना : अपेक्षित यशाचा टप्पा गाठता येईल.

कर्तृत्व उजळून निघेल
भाग्यात बुध, गुरू, दशमात प्रवेश करीत असलेला सूर्य यशाने कर्तृत्व उजळून टाकतील. समाज आणि परिवारात आपल्या नवकार्याचा ठसा उमटेल अशाही घटनांचा समावेश राहील. गुरुवारच्या रवी-नेपच्यून युतीमुळे धर्मकार्याच्या शोधात चमत्कार घडणं शक्य आहे. वृषभ कलावंत रंगभूमीवर आघाडीवरच राहतील. चतुर्थात शनी असेपर्यंत प्रपंचाच्या कुरबुरी गोड बोलूनच दूर कराव्या लागणार आहेत. शुभकार्य ठरेल.
दिनांक : ८, ९, १२, १३ शुभकाळ.
महिलांना : सफाईने समस्या सोडवता येतील.

दडपण कमी होईल
पराक्रमी शनी, दशमात शुक्र, गुरुवारी सूर्य भाग्यांत येत आहे. मिथुन व्यक्तींची दडपणं कमी होत असल्याची चिन्हे दृष्टिपथात येऊ लागतील. प्रापंचिक जबाबदाऱ्या कमी होऊ लागतील. बढती- बदलीचे योग येतील. राजकीय प्रभाव कक्षा रुंदावत राहतील. आर्थिक प्रकरणे मार्गी लागतील. मंगलकार्याच्या बैठकीतून सप्तपदीकडे वाटचाल सुरू होईल. व्यापारपेठेत नवं तंत्र यशस्वी ठरेल. अष्टमात गुरू-राहू असेपर्यंत संयम आणि शिस्त यांची सातत्याने आवश्यकता राहणार आहे.
दिनांक : ८ ते ११ शुभकाळ.
महिलांना : शिकस्तीच्या प्रयत्नांतून यश मिळवाल.

समस्या सुटतील
गुरू-राहूचे सहकार्य आणि मीन- शुक्रातील उत्साह कर्क व्यक्तींच्या महत्त्वाच्या समस्या सुटतील. तरी गुरुवारच्या सूर्य राश्यांतरामुळे साडेसातीची प्रखरता वाढणार असल्याने सफलता संयमानेच मिळवावी लागणार आहे. चुका, साहस, अवास्तव चर्चा आणि आश्वासने यांच्यामध्ये गुरफटू नका. प्रकृतीची पथ्ये सांभाळा. रवी- नेपच्यून युती व्यवहारात फसवते आणि प्रार्थना सत्कारणी लावते याचा प्रत्यय येईल.
दिनांक : ८ ते १२ शुभकाळ.
महिलांना : निराश होवू नका. मजल दरमजल असा प्रवास सुरू ठेवा.

संरक्षण मिळेल
साडेसाती गुरू-राहू, नाराज अष्टमात शुक्र सिंह व्यक्तींच्या कार्यप्रांतात समस्यांची गर्दी वाढत राहणारी आहे. त्यामध्ये गुरुवारच्या रवी- नेपच्यून युतीमध्ये नवीन प्रकरणांचा समावेश शक्य असल्याने आक्रमणापेक्षा मजबूत संरक्षणाच्या योजनांची कृतीच यावेळी अधिक उपयुक्त ठरणार आहे. भागीदार त्रास देतील. पैसा संभ्रम निर्माण करेल. आरोपाच्या कुरबुरींवर लक्ष ठेवा. शनिवापर्यंत तणाव वाढेल असे काहीही करू नका.प्रवास होतील.
दिनांक : १० ते १३ संरक्षण मजबूत करता येईल.
महिलांना : संयम ठेवा.

यश मिळेल
साडेसातीची प्रखरता गुरुवारच्या रवी राश्यांतरापासून वाढणारी असूनही पंचमातील बुध, गुरू आणि मीन, शुक्र यांच्या आधाराने कार्य-उत्साहाच्या समन्वयातून प्रतिष्ठा सांभाळणारे यश मिळवता येईल. परंतु संधीचा लाभ झटपट उठवता येणे आवश्यक आहे. अंदाज निश्चित करण्यास विलंब लावू नका. बौद्धिक क्षेत्रात प्रभाव वाढेल, प्रवास होतील. मंगलकार्य ठरेल, व्यापारी गाडी रुळावर येईल.
दिनांक : ८, ९, १२, १३ शुभकाळ.
महिलांना : अथक परिश्रम करा, यश तुमचेच आहे.

समस्यांवर नियंत्रण राहू द्या
लाभातील शनीचा खंबीर आधार एवढेच शस्त्र तुला व्यक्तींजवळ सध्या आहे. त्याचाच उपयोग कुशलतेने करून समस्यांवर नियंत्रण ठेवणारे कार्य सुरू ठेवता येईल. व्यावहारिक उलाढालींची व्याप्ती सध्या तरी वाढवू नका. रवी, नेपच्यून युती भक्तिमार्गातून आनंद देईल, परंतु नियोजनात अडचणींची ठरू शकते. व्यापारी सौदे, मंगलकार्याची निश्चिती, मिळकतीची देवघेव यात घाईगर्दीने कृती करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या.
दिनांक : ८ ते ११ शुभकाळ
महिलांना : थांबा, बघा, गर्दी कमी होऊ द्या. मगच काळजीपूर्वक निर्णय घ्या.

मार्गात बदल करावे लागतील
दशमातील शनीचे परिणाम गुरुवारच्या रवी राश्यांतरामुळे दूषित होतील. त्यातून ठरवलेल्या काही मार्गात अचानक बदल करावे लागतील. काही दिवस असे प्रसंग वरचेवर येण्याचा संभव आहे. पण कार्य आणि कुशलता यांचा समन्वय झटपट साधून मिळवता येणारे यश पराक्रमी असलेले गुरू- राहू निश्चित करतील. बौद्धिक प्रांतात बुध, शुक्राचे सहकार्य मिळेल, त्यातून कला प्रांतात जम बसवणे सोपे जाईल. आक्रमणापेक्षा संरक्षणच महत्त्वाचे ठरणार आहे.
दिनांक : ८ ते १२ शुभकाळ
महिलांना : मंगलकार्य ठरावे. आकर्षक खरेदी व्हावी.

आघाडीवर राहाल
चतुर्थात मीन, शुक्र भाग्यात शनी, मकर राशीत मंगळ यांचाच लाभ धनू व्यक्तींना कार्यप्रांतात होत राहणार आहे. आर्थिक, व्यावसायिक, सामाजिक क्षेत्रात धनू व्यक्ती आघाडीवर राहतील. प्रापंचिक जबाबदाऱ्या कमी करू शकाल. कला, साहित्य प्रांतात धनू व्यक्तींच्या हातून महत्त्वाचे कार्य घडणार आहे. आणि रवी-नेपच्यून युती भक्तिमार्गात चमत्काराची ठरणारी आहे. रवी, शनी समोरासमोर असेपर्यंत मात्र प्रकृती आणि अधिकार यासंबंधात अधिक सतर्क राहावे लागेल.
दिनांक : १० ते १४ शुभकाळ
महिलांना : विचारपूर्वक प्रयत्न करा. यश मिळत राहील.

यश मिळवता येईल
राशीस्थानी गुरू, राहू, बुध यांचा सहयोग पराक्रमी शुक्र यातील परिणाम प्रयत्न सफलता यांच्या समन्वयास उपयुक्त ठरतील. शनिवापर्यंत मकर व्यक्तींना अवघड प्रकरण मार्गी लावून सोप्या समस्या संपवण्यात मोठे यश मिळवता येईल. रवी, नेपच्यून युतीमध्ये प्रार्थनाची उत्साहातून साथ मिळेल. कुटुंबातील मंडळीचे सहकार्य मिळवता येईल. प्रवास होतील, शुभवार्ता कळतील, मंगलकार्य ठरतील. जागा, नोकरी, उधारी यातही मार्ग सापडतील. प्रकृती मात्र सांभाळा.
दिनांक : ८, ९, १२, १३ शुभकाळ
महिलांना : कर्तृत्व प्रकाशमान करणारा अनुकूल ग्रहकाळ आहे.

सफलतेवर संशयाचे मळभ
व्ययस्थानी गुरू- मंगळ, राहू, बुध असे ग्रह असल्याने अपेक्षित सफलतेवर संशयाचे मळभ येईल. शुक्र, शनीच्या अनुकूलतेमुळे उत्साह आणि जिद्द यांची रसद सुरूच राहणार असल्याने नियमित उपक्रम सुरू ठेवता येतील. गुरुवारी सूर्य राश्यांतर होईल, त्यातून काही प्रमाणात दडपण कमी होईल, परंतु साहसाने कृती करावी. स्पर्धकांना आव्हान द्यावे, पैशाचा खेळ करावा एवढी अनुकूल ग्रहस्थिती नसल्याने शनिवापर्यंत मिळेल त्या मार्गाने पुढे सरकत राहावे.
दिनांक : १०, ११, १४ या दिवसांचा उपयोग होईल.
महिलांना : संयमाने असंतोष कमी करता येईल.

समस्यांतील गंभीरता टाळा
गुरू, राहू, अनुकूल असल्याने मीन व्यक्तींना कार्यपथावरील प्रवास कमी अधिक वेगाने सुरू ठेवता येईल, परंतु गुरुवारच्या रवी राश्यांतरापासून प्रवासात छोटय़ा-मोठय़ा अडचणी येत राहतील. आक्रमक शत्रूंची समस्या आणि आरोग्याच्या तक्रारी यामध्ये गंभीरता येऊ नये. यासाठी सतर्क राहणे आवश्यक राहील. भेटी चर्चा बैठकी सुरू असताना संयम महत्त्वाचा ठरेल. मीन, शुक्र प्रयत्नातील उत्साह कमी होऊ देणार नाही. कुटुंबातील मंडळीचे सहकार्य मिळवता येईल.
दिनांक : ८, ९, १२, १३ शुभकाळ.
महिलाना : कल्पकतेने प्रश्न सोडवता येतील.