Leading International Marathi News Daily                                 सोमवार , ९ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘नागपूर का संदेश, भाजप को जनादेश’
केंद्रात सत्ता आल्यास अफझल गुरुला फाशी

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतरही त्याची अंमलबजावणी का होत नाही. केंद्रात भाजपची सत्ता आल्यास अफझल गुरुला १०० दिवसात फाशी देण्याची शिफारस राष्ट्रपतींना करू. रामराज्याची संकल्पना पूर्ण करायची असेल तर अयोध्येत राम मंदिर बांधावेच लागेल. राजस्थान आणि दिल्ली या दोन्ही राज्यातील पराभवासाठी पक्षातीलच नेते आणि कार्यकर्ते कारणीभूत होते, ज्यांनी हे काम केले त्यांनी आत्मचिंतन करावे, त्यांच्या या कृत्याुळे पक्षाची कमी आणि त्यांचेच अधिक राजकीय हानी झाली, यापुढे त्यांनी असे करू नये.
- लालकृष्ण अडवाणी

सर्व आघाडय़ांवर केंद्र सरकार अपयशी
भारतातील मदतीविना मुंबईवर दहशतवादी हल्ला होऊ शकत नाही; अशी मदत करणाऱ्यांवर अद्याप कारवाई का केली नाही? लालकृष्ण अडवाणी यांच्याच नेतृत्वाखाली देशातील दहशतवाद संपवणे शक्य आहे. मुंबईवरील हल्ला हा पाकिस्तानने केलेला आहे. पण, देशातून मदत मिळाल्याविना तो शक्य नाही. ‘व्होट बँके’च्या राजकारणातून अशी मदत करण्यांवर कारवाई करण्यापासून यंत्रणेला मज्जाव करण्यात येत आहे. गुजरातमध्ये अशा हल्ल्यानंतर कठोर पावले उचलून आरोपींना आत डांबले. दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावे लागेल.
- नरेंद्र मोदी

रामाबद्दल अपशब्द बोलू नका..
रामाबद्दल अपशब्द बोलू नका. आराध्य देवाची आराधना करण्याचा सर्वाना अधिकार आहे. रामनामाचा जप करूनच आज सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आहे. यामुळे कोणत्याही धर्माच्या आराध्य देवतावर टीका करणे योग्य नाही. लोकसभेसाठी १०० उमेदवार जाहीर केले आहेत. या महिन्याच्या अखेपर्यंत पूर्ण उमेदवार जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक समितीने बैठका घ्याव्या. आपल्या संघटन शक्तीचा विचार करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षाच्या शक्तीचाही विचार करा. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आता सत्तेपासून थांबवू शकत नाही.
- राजनाथ सिंग