Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

१० फेब्रुवारी
मी नुसता विचार करत बसतो बाकीचे सांगून मोकळे होतात. आज कँटिनमध्ये बसलो होतो. आमचा ग्रुप

 

एका टेबलवर आणि तिचा ग्रुप बाजूच्या टेबलवर होता. त्यांच्यातील निलेशने विषय काढलाच. तिला म्हणाला, तू फ्री असशील तर कॉलेज सुटल्यावर जाऊया का एका मैफलीला. तरुणांनी केलेल्या कविता ऐकायला मिळतील. निल्या जरा आहे कविता-बिविता प्रकारातला. इंप्रेशन मारायला तेवढाच चान्स. ती ‘हो’ म्हणाली तर आपण काय करायचं. काही सेकंद अशीच गेली. ती म्हणाली ‘व्हॅलेन्टाईन’ला नको. मला वाटलं पुढे हा टॉपिक सुरू राहील. पडद्यामागे काही घडत असलं तर मला समजेल. तेवढय़ात त्यांची गाडी ‘सीए फाऊंडेशन’कडे वळली आणि मी पुन्हा विचारात. कॉलेज सुटता सुटता पुन्हा एकदा लायब्ररीकडे जाताना भेटलो. मी म्हटलं, थोडा वेळ पायऱ्यांवर बसून मग लायब्ररीत भेटली. मी पण जुनी गाणी, नवीन गाणी, ग्रॅमी अॅवॉर्ड, एल्टन जॉन वगैरे विषयांवर बोलत आपण ‘कितने पानी में’ आहोत ते दाखवत होतो.
‘टिपिकल’ हा शब्द भाडणाचे कारण होऊ शकतो! किशोर कुमारचं ‘ओ मेरे दिल के चैन’ आहे का, असे तिने विचारलं. मी म्हटलं, ते आधी हार्ड डिस्कमध्ये होतं, आता तशी ‘टिप्पिकल’ गाणी सीडीमध्ये डम्प करून ठेवली आहेत, असं बोलून गेलो. हे वाक्य एवढं बोचेल याची मला कशी कल्पना येणार? ती म्हणाली, ‘टिप्पिकल गाणं’ म्हणजे काय? मी म्हटलं, टिप्पिकल म्हणजे.. आता काय सांगणार? अशा प्रश्नांची लॉजिकल उत्तरं देता येत नाहीत. ते गाणं टुकार आहे, असं मला म्हणायचं नव्हतं. पण मला कळलं होतं की, ऑलरेडी ठिणगी पडली आहे. म्हणजे तू म्हणतोयस की, माझी आवड टिप्पिकल आहे. अरे एवढे रागवायचे काय त्यात. मी कधी कधी गोविंदाच्या ‘हथकडी’ चित्रपटातलं ‘आनन पानन’ गाणं ऐकतो. मला वाटलं आता ती मला म्हणेल की, श्शी तुला ही गाणी आवडतात.. पण प्रतिक्रियाच नाही. मग मीच विषय गाण्यांकडून दुसरीकडे वळवायचा प्रयत्न केला. गेल्या वर्षी ‘सीए फाऊंडेशन’चा पेपर किती लवकर दिला होता, वगैरे सांगून तिला नॉर्मलवर आणायचा प्रयत्न करत होता. पण सर्व प्रयत्न फोल ठरले. थोडय़ा वेळाने एक वाक्य आणि १० मिनिटे शांतता, असा संवाद होऊ लागला. मग मीच म्हटलं, चल आज मी घरी जातो. आणि खांदे पाडून घरी आलो. मग तिला ई-मेल करून ‘मी चुकत होतो, याची तू मला कशी जाणीव करून दिलीस’ असा माफीनामा पाठवला. अजूनही तिचा रिप्लाय आलेला नाही. आता कुठे आशेचे किरण दिसू लागले होते, त्यावर मीच पाणी फिरवले. आता उद्या हे सर्व सावरावे लागणार, नाही तर यंदाचे वर्ष म्हणजे मागच्या वर्षीचा रिपीट टेलिकास्ट होईल.
नाथा कामत (आजचा)