Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘आधुनिक युगासाठी आयुर्वेद’चे विलेपार्ले येथे आयोजन
प्रतिनिधी

आधुनिक काळातील आजारही आधुनिक झाले आहेत. झटपट व झगमगाटाच्या या आजारांवर लवकरात लवकर प्रतिबंध आणणारी औषधेही आज उपलब्ध आहेत; या आजारांचे असणारे जंतूही तितकेच सुधारित आहेत. रोगजंतुंशी लढण्यासाठी जशी प्रतिजैविकांची (अॅण्टीबायोटिक्सची) (जनरेशन नेक्स्ट) आली तशीच रोगजंतुंची त्यांना पुरून उरणारी नवी जनरेशन आलीच. ‘आयुर्वेद अॅण्ड यू’च्या मागील एका भागात सुप्रसिद्ध शल्यविशारद डॉ. रवी बापट म्हणतात त्याप्रमाणे ‘जिवाणू व प्रतिजैविकांच्या लढाईत विजय हा जिवाणूंचाच होताना दिसतो.

 

व्यवहारातदेखील आपल्याला प्रतिकारतेचा प्रतिबंध उपयोगी ठरताना दिसतो.
अतिरेक, हिंसा अराजक यावर शांती अहिंसेच्या भारतीय मार्गास आज अमेरिकेसह सर्व जग स्वीकारू लागले आहे, तसेच आरोग्यासाठी आयुर्वेदातील प्रतिबंध व स्वास्थ्यरक्षणाने जीवनशैली जास्त उपयुक्त ठरते हे पाश्चिमात्यही स्वीकारू लागले आहेत.
मुंबईच्या दमट हवामानातील त्वचारोग, दमा, संधीवात, प्रदूषण व तणावांनी येणारे मनोकायिक विकारांसह हृदयविकार, कॅन्सरसारख्या अनेक विकारांचे मूळ शोधले तर आपण त्यांचा पूर्ण बीमोड करू शकतो. पॉझिटिव्ह हेल्थ अर्थात स्वास्थ्य म्हटले, की केवळ रोग दूर करण्याचा झटपट इलाज नव्हे, तर त्यांची संभाव्य कारणे शोधून आहार, जीवनशैली बदल गरजेनुसार उपचार वा पंचकर्मे करून दीर्घायुष्य व आनंदी आरोग्य प्राप्त करून देता येते. ‘झंडु आणि लोकसत्ता’ ‘आयुर्वेद अॅण्ड यू’ मालिकेअंतर्गत विलेपार्ले येथील मा. दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहामध्ये रविवार, १५ फेब्रुवारी २००९ रोजी सकाळी साडेनऊ वा. ‘आधुनिक युगासाठी आयुर्वेद’ या विषयावर कार्यक्रम आयोजित केला आहे. नियमित जाणवणाऱ्या सर्दी, खोकला, ताप, इत्यादी विकारांपासून अलीकडे सर्व वयोगटांमध्ये जीवशैलीत झालेल्या बदलामुळे आढळणारा रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार कसे टाळता येऊ शकतात याकरिता, पाच हजार वर्षांची परंपरा असणाऱ्या आयुर्वेदातील औषधे आधुनिक काळात कशा प्रकारे त्वरित गुणकारी ठरू शकतात या विषयावर स्लाइड शो आणि परिसंवाद आयोजित केला आहे. आधुनिक काळासाठी आयुर्वेदिक औषधांची उपयुक्तता स्लाइड शोच्या माध्यमातून वैद्य उदय कुलकर्णी आणि वैद्य मधुरा कुलकर्णी सादर करणार आहेत.
वैद्य वि. ल. इनामदार, आयुर्वेदातील त्वरित गुणकारी ठरणाऱ्या औषधांची ओळख करून देणार असून, या वेळी वैद्य उदय आणि मधुरा कुलकर्णी इनामदारांसोबत प्रश्नोत्तरांच्या सहाय्याने उपस्थितांच्या शंकांचे निरसन करणार आहेत.
डॉ. रवीन थत्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करणार असून, उपस्थितांना मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा जोगळेकर- कुलकर्णी करणार आहेत. ‘झंडु आणि लोकसत्ता’ प्रस्तुत ‘आयुर्वेद अॅण्ड यू’ या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य प्रमाणे विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असून, ऋतूमानानुसार दिनचर्या कशा प्रकारे करावी ही दिनदर्शिका विनामूल्य मिळणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा जोगळेकर कुलकर्णी करणार आहेत. ‘झंडु आणि लोकसत्ता’ प्रस्तुत ‘आयुर्वेद अॅण्ड यू’ या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य प्रमाणे विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असून, ऋतूमानानुसार दिनचर्या कशा प्रकारे करावी ही दिनदर्शिका विनामूल्य मिळणार आहे.