Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पाल्र्याच्या एन. एम. महाविद्यालयात व्यवस्थापन शाखेच्या ‘दृष्टी’ या महाविद्यालयीन फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हज् विभागाने यंदा उत्पत्ती (जेनिसिस) या संकल्पनेवर चितारलेली ही भित्तीचित्रे फेस्टिव्हलचे आकर्षण ठरली.

एन. एम. कॉलेजचा ‘दृष्टी २००९’ हा मॅनेजमेंट फेस्टिव्हल १ ते ८ फेब्रुवारी दरम्यान पार पडला. या वर्षी दृष्टीने दहा वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने दृष्टीने`Genesis-A

 

new beginning' अशी थीम ठेवली होती. दहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर आता परत एक नवीन सुरुवात करावी असा या थीममागचा हेतू होता. या फेस्टिव्हलला यंदा दरवर्षीपेक्षा अधिक चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. या वर्षी दृष्टीमध्ये २५ कॉलेजेसचा सहभाग होता. दहाव्या वर्षांचे निमित्त साधून एन.एम. कॉलेजने मुंबईबाहेरील चार कॉलेजेसना आमंत्रित केलं होतं. या चार कॉलेजेसमध्ये अमिटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल स्कूल ऑफ कॉर्पोरेट मॅनेजमेंट सारख्या कॉलेजेसचा सहभाग होता. या आठ दिवसांच्या फेस्टिव्हलमध्ये विविध स्पर्धाचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बिजनेस @ कॅम्पस हे या वर्षांचे मुख्य आकर्षण होते. १४०mm नावाचा एक इव्हेंट होता ज्यामध्ये मुलांना हॉलिवूड आणि बॉलिवूडचे एक अनोखे मिश्रण तयार करायचे होते. Razzmatazz एक डान्स इव्हेंट होता. प्रत्येक फेस्टिव्हलची जान म्हणजेच त्यांचा बँड इव्हेंट. ‘दृष्टी’ने देखील आपला Ecstacy unplugged हा बँड इव्हेंट आयोजित केला होता. फेस्टिव्हल फक्त मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी नसून मास मीडिया विद्यार्थ्यांसाठी देखील आहे. म्हणूनच Get shorty नावाचा शॉर्ट फिल्म मेकिंग इव्हेंट होता. एन. एम. कॉलेज आणि दृष्टीच्या आयोजकांचा असा दावा होता की गेल्या दहा वर्षांत असा एकही इव्हेंट आयोजित करण्यात आला नव्हता.
या फेस्टमध्ये इव्हेंट्सबरोबर चॉकलेट मेकिंग, जाइव्ह-साल्सा, इनमॅच मॉडेलिंग, टॅरो कार्ड रीडींग या सारख्या वर्कशॉप्सचं आयोजन केले होते. ६ फेब्रुवारीला दृष्टीचा ‘प्रोनाईट’ होता. दृष्टी हे एकमेव मॅनेजमेंट फेस्ट आहे जे प्रोनाईटचे आयोजन करते. या वर्षी प्रोनाईटसाठी अभिजित सावंत, जावेद अली, शान, स्मिता ठाकरेसारख्या सेलिब्रिटीज्नी हा कार्यक्रम चांगलाच रंगवला. दृष्टीने यावर्षी आपले स्वत:चे एक अॅन्थम तयार केले आहे.
हे अॅन्थम एक प्रसिद्ध गाणं आहे, सर्व दृष्टी वर्कफोर्ससाठी, दृष्टीसाठी एन.एम. कॉलेज जवळ जवळ १२० मुलांनी मागच्या चार महिन्यांपासून तयारी करण्यास सुरू केली होती. या सर्व मुलांनी ‘दृष्टी’साठी खूप मेहनत घेतली होती आणि त्यांची मेहनत दिसून देखील आली. असा हा मॅनेजमेंट कॉलेजेसचा एक अनोखा फेस्टिव्हल! मॅनेजमेंट कॉलेजेस्ची खऱ्या अर्थाने शान!
पूनम बुर्डे
सेंट झेविअर्स महाविद्यालय