Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

विशेष

संगीत मन को पंख लगाए
पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा सर्वोच्च मानाचा किताब बहाल होत असतानाच उस्ताद झाकीर हुसेन यांना मानाचा ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली होती आणि त्याच वेळी ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटाच्या संगीतासाठी भारताचे आजच्या पिढीचे ख्यातनाम संगीतकार ए. आर. रहमान यांना बाफ्ता पुरस्कार मिळाल्याचीही घोषणा झाली. हे सारे घडत असताना ज्ञानदेव माउलींच्या आळंदीमध्ये ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ची महागायिका कार्तिकी गायकवाड मिरवणुकीने माउलींच्या देवळात आशीर्वाद घेण्यासाठी जात होती.

विधायक विद्रोह!
मराठी साहित्याची परंपरा जशी प्राचीन आणि समृद्ध आहे, तशीच वेगवेगळ्या राजकीय-सामाजिक परिस्थितीत या साहित्याने घेतलेली वळणं आणि निर्माण झालेल्या चळवळीही नोंद घेण्यासारख्या आहेत. फार जुन्या काळात न जाता, अगदी गेल्या ३०-३५ वर्षांमधील मराठी साहित्याची वाटचाल पाहिली तर ऐन आणीबाणीत कराडला कै. दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली भरलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा एक अभूतपूर्व कलाटणी देणारा टप्पा होता. त्याचबरोबर आजही वादग्रस्त असलेले केंद्रीय मंत्री बॅ. ए. आर. अंतुले राज्याचे मुख्यमंत्री असताना निर्माण झालेल्या वादळाच्या पाश्र्वभूमीवर बंडखोर लेखिका मालतीबाई बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भरलेल्या समांतर साहित्य संमेलनाने साहित्यविषयक चळवळीला नवी दिशा देण्याची उमेद निर्माण केली होती. पण अखेर हे दोन्ही टप्पे इतिहासजमा झाले. नाही म्हणायला, १९८० च्या दशकात मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ जोशात असताना त्याची छाया साहित्य संमेलनं आणि चळवळीवरही पडली.

नाय, नाय, तुका शिक्षा ही भोगूचीच लागतली-, -देव (ह्य़ो आडनाव देव असललो ‘देव’ नाय, ह्य़ो खरो देव बोलतासा.)
‘नाय देवा, माझी कायच चूक नाय. मी कसलोय गैरव्यवहार करुक नाय’
‘‘काय, चोर तो चोर आणि वरसून शीरजोर!, तू जो सात हजार कोटी रुपयांचो गैरव्यवहार केलसय, त्याबद्दल तुका शिक्षा ही भोगूचीच लागतली.’’
‘नाय देवा, मी पुना पुना सांगतय, मी कसलोय गैरव्यवहार करुक नाय.’
‘मग तू केलय तरी काय?’
‘‘खरा सांगू देवा, तो फक्त आकडय़ांचो घोळ आसा. तुमी ज्येका चोरी म्हणतसात, ती चोरी आसा असा एक वेळ गृहीत धरला तरी तो चोरी ठरुची नाय!’’
‘‘म्हणजे काय? माका कायच समजणासा नाय. तुमचे पृथ्वीवरचे हे घोळ माझ्या डोक्यात काय शिरणा नाय’’
‘‘देवा, नीट डोक्या थंड ठेवान ऐक, माझो जो गैरव्यवहार तुमी म्हणताल, तो फक्त कागदारच आसा. मी कुणाच्याच खिशात हात घालूक नाय. की खयची बँक लूटूक नाय. मी फक्त आकडय़ाची चलाखी करुन तेची संख्या वाढवली. ह्य़ो काय गुन्हो झालो?’’
‘पृथ्वीवरची जनता तर तू गुन्हो केलसय असाच म्हणतत’
‘‘देवा, ही तुमची चुकीची समजूत आसा. तुमचे सहकारी देव तुमका चुकीची म्हायती पुरवतसत. अजूनय तू त्या जेल भ्यायर जाव्न बघ, माका पाठिंबो देण्यासाठी किती बुके ठेवलसत ते!’’
‘‘तुझ्यासारख्या गुन्हेगाराक सदिच्छा देण्यासाठी ‘बुके!’ अरे काय पृथ्वीवरच्या माणसाचा डोक्या-बिक्या फिरला की काय?’’
‘‘कायएक फिरुक नाय. देवा बहुतेक जनता आणि माझ्या राज्यातले सर्व पक्षीय तेलगू नेते माझ्या पाठीशी आसत आणि ते शेवटपर्यंत पाठीशी रवतीत याची माका खात्री आसा.’’
‘असा कसा शक्य आसा?’
‘‘म्हणूनच देवा मी खरा सांगतय, मी कसलोय गुन्हो करुक नाय. शून्यातून ही एवढी मोठी कंपनी उभारली. या एवढा मोठा काम करताना चार-आठ आण्याचो हिशेब चुकलो म्हणून माझ्याविरुद्ध एवढो शिमगो कित्यात करतत ताच माका समजणा नाय. माझा जर पटत नसात तर माझ्या इरोधातले आरोप सिद्ध करून दाखया. माझ्या विरोधातली ही कारवायी म्हणजे माका तरी एखाद्या ‘फॉरेन हॅण्ड’चा काम दिसतासा!’’
‘फॉरेन हॅण्ड’ ह्य़ा काय आता नवीन’
‘‘देवा माझ्या या कंपनीन फॉरेनाक जी प्रगती केलीसा ती अनेकांच्या डोळ्यात खुपतासा! म्हणूनच ती जागतिक बँक माझ्या इरोधात. मी या देशासाठी काय करुक नाय, याची कल्पना आसा काय देवा, ५५ हजार लोकांक नोकऱ्यो लायल्यो. जगात सॉफ्टवेअर पुरवले. अमेरिकेचो अध्यक्ष क्लिन्टन भारतात आयललो त्या वेळी तो आणि मी एकाच व्यासपीठावर होतोव. बघ देवा या पृथ्वीतलावर कितको अन्याय चललोसा तो.. माझ्या आकडेवारीच्या चुकीमुळे माका आता जेलमध्ये टाकलोसा आणि देवा सर्वात महत्त्वाचा म्हणजे माझी ही चूक मीच जाहीर केलीसा. ही कुणा संशोधक पत्रकारान शोधूक नाय.’’
‘म्हणजे तुझा म्हणणा काय आसा?’
‘‘देवा, मी गुन्हेगार नाय.. माझ्या हातून जी किरकोळ चूक झालीसा त्याबद्दल मी होया तर ‘सॉरी’ म्हणतय. सध्या ‘सॉरी’ म्हणून सगळा मिटवून टाकूचो काळ आयलोसा कल्याणसिंगान ‘सॉरी’ म्हटल्यार त्याका जर माफ करतत, तर माका माफी कित्याक नको?’’
जेलमध्ये पहाटेचे चारचे टोले वाजल्यान, सत्यमच्या राजूक जाग आयली. राजून कूस वळली आणि बघता तर हे डायलॉग म्हणजे स्वप्न होता. चार वाजता पडलला स्वप्न खरा जाता असा राजू पूटपूटलो आणि पुन्हा झोपी गेलो.
प्रसाद केरकर
Prasadkerkar73@gmail.com