Leading International Marathi News Daily

बुधवार, ११ फेब्रुवारी २००९

राज्य

फायरिंगसाठी गोळ्या नाहीत, काळानुसार बदलही नाहीत!
अभिजित घोरपडे
पुणे, १० फेब्रुवारी

पोलिसांच्या प्रशिक्षणाचा काळ कमी करण्याबरोबरच पोलीस विद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव प्रकर्षांने पाहायला मिळत आहे. फायरिंगच्या प्रशिक्षणासाठी पुरेशा गोळ्या उपलब्ध होत नाहीत, अनेक विद्यालयांचा कारभार प्राचार्याविनाच सुरू आहे, बहुतांश ठिकाणी पुरेशी औषधे-डॉक्टरही नाहीत, तर अभ्यासक्रमात काळानुसार बदलही झालेला नाही!
..पोलीस प्रशिक्षण विद्यालयांची अवस्था काय बनली आहे, हे समजण्यासाठी ही उदाहरणे बोलकी आहेत.

.. आता लक्ष्य संपत्ती निर्मितीचे - शरद पवार
नाशिक, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

जागतिक महामंदीतही भारतीय अर्थव्यवस्था तग धरून असण्यामागे येथील शेतीमालाला व पर्यायाने शेतकऱ्यांना गत दोन वर्षांत मिळालेला समाधानकारक पैसा कारणीभूत असल्याचे स्पष्ट करतानाच येत्या काळातही याच आधारे संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्याचे सूत्र घेवून पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात आयोजित विविध विकासकामांचे उद्घाटन आज पवार यांच्या हस्ते झाले.

‘कोणार्क’च्या कंत्राटासाठी नगरसेवकांचा मुंबईत तळ
अकोला, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी

जकात वसुलीचे कंत्राट ‘कोणार्क’ संस्थेला मिळावे, यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांची मनधरणी करण्यासाठी मुंबईत तळ ठोकला आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नासाठीही अशीच तळमळ नगरसेवकांमध्ये असती तर अधिक बरे झाले असते, असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
जकात वसुलीच्या कंत्राटावरून महापालिकेतील वातावरण गेल्या काही दिवसांपासून ढवळून निघाले आहे.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला रुग्णालयात ‘व्हीआयपी’ सेवा
बंदोबस्तावरील तीन पोलीस निलंबित
जयंत धुळप
अलिबाग, १० फेब्रुवारी

खालापूर पोलिसांनी बनावट चलनी नोटांच्या बेकायदा वितरण प्रकरणी अटक केलेला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार मोहम्मद रशीद कुंजू याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, तेथे त्याला मद्यासह सर्व ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ मिळत असल्याचे उघडकीस आल्याने बंदोबस्तावरील तिघा सशस्त्र पोलिसांना निलंबित करण्यात आले आह़े

कुलगुरू निवडीतील राजकीय हस्तक्षेपावर आता लाल फुली!
पुणे, १० फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

कुलगुरू निवडप्रक्रियेमध्ये आता आमूलाग्र बदल करण्यात येणार असून कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाव्यतिरिक्त केवळ गुणवत्तेच्या आधारे कुलगुरूंची निवड करणे शक्य होणार आहे. त्या संदर्भातील सुधारित कायदा व नियमावलीचा मसुदा लवकरच मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल.

सरनाईक यांच्या प्रभागात २५ मार्चला पोटनिवडणूक
ठाणे, १० फेब्रुवारी /प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या महापालिका प्रभाग २९ मध्ये येत्या २५ मार्च रोजी पोटनिवडणूक होणार आहे.शहराध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याशी न पटल्यामुळे राष्ट्रवादीला रामराम ठोकून सरनाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी प्रभाग २९ म्हणजेच वर्तकनगरमध्ये येत्या २५ मार्चला पोटनिवडणूक होत असून, आजपासून तेथे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, ७ मार्चला अर्जाची छाननी, तर १२ मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २६ मार्चला मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी पक्ष देईल तो उमेदवार आपण निश्चित निवडून आणू, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

शिवाजी विद्यामंदिर काळसे येथे विविध स्पर्धांचे आयोजन
सावंतवाडी, १० फेब्रुवारी/वार्ताहर मालवण तालुक्यातील काळसे येथील श्रीगवळदेव मित्रमंडळ, वरचा वाडा, मुंबई मंडळाच्या वतीने शिवाजी विद्यामंदिरात १२ फेब्रुवारी रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, तर पाचवी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वार्षिकोत्सवात करण्यात येणार असल्याचे सचिव संतोष गुराम यांनी सांगितले.