Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आयपीएल हा पैशांचा नाही तर गंभीर क्रिकेटचा खेळ!

 

या वर्षी आयपीएल स्पर्धेत सीमेपलिकडील आपले मित्र म्हणजे कराची, लाहोर, मुल्तान आणि फैसलाबाद येथील क्रिकेटपटू दिसणार नाहीत. कारण तिकडच्याच अन्य लोकांनी येथे द्वेषाची आणि अविश्वासाची बीजे रोवली आहेत. हे सारे दुर्दैवी असले तरी सध्याच्या परिस्थितीत तेच योग्य आहे. खरं तर बंदुका चालविणाऱ्यांवर जो राग व्यक्त व्हायला होता त्या रोषात क्रिकेटपटू भरडले जात आहेत. क्रिकेटचाच विचार केल्यास पाकिस्तानच्या काही खेळाडूंची उणीव या स्पर्धेत नक्कीच जाणवेल. राजस्थान रॉयल संघाला याचा सर्वाधिक फटका बसेल. कारण त्यांच्या संघात सोहेल तन्वीरसारखी कामगिरी कुणीही करू शकला नव्हता. कोलकाता नाईट रायडर्सलाही उमर गुलची उणीव भासेल. त्यांच्या अननुभवी गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळणारा उमर गुल त्यांच्यासाठी शोएब अख्तरपेक्षाही मोलाचा वाटत होता. शाहीद आफ्रिदी या आणखी एका खेळाडूने या स्पर्धेत सातत्य दाखविले होते. व आयपीएलचा एक स्टार तो होऊ शकलाही असता; पण काही कारणांमुळे डेक्कन चार्जर्सला त्याची उणीव भासणार नाही.
पाक खेळाडू या स्पर्धेत नसल्याने आता श्रीलंका, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना नामी संधी आहे. दक्षिण आफ्रिकन खेळाडूंएवढा ट्वेन्टी २० क्रिकेटचा अनुभव अन्य कुणालाही नसेल; पण तरीही या स्पर्धेचे फ्रॅन्चाईज त्यांच्याकडून नम्र वर्तणुकीची अपेक्षा करीत असतील. या स्पर्धेच्या पहिल्या वर्षांत प्रत्येकजण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करीत होता; पण यावेळी मात्र सारे चित्र बदललेले असेल. या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंवर गांभीर्याने उधळण केलेली असली तरी ती काही फुकटची भेट नाही, त्यामुळे सामन्यातील खेळाडूंची एकूणच वृत्तीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सीरियस क्रिकेट खेळण्यापेक्षा निव्वळ मिळणाऱ्या पैशांवर डोळे ठेवून येणाऱ्यांना मात्र आश्चर्यकारक धक्का मिळू शकेल.
काही ठिकाणी आजही आयपीएलला क्रिकेट स्पर्धेऐवजी पैशांचा खेळ म्हटले जाते आहे याचे मला आश्चर्यच वाटते. आयपीएल म्हणजे खरोखरच गंभीरपणे खेळले जाणारे क्रिकेट असून यात खेळाडूंवर मोठी गुंतवणूक करण्यात येते आणि जे खेळाडू या गुंतवणुकीला न्याय देऊन चांगली कामगिरी करतात त्यांना त्याचा चांगल्या प्रकारे परतावाही मिळतो. आयपीएल म्हणजे काही पैशांचा मोठा हंडा नाही की कुणीही यावं, त्यात हात घालावा आणि आपला वाटा न्यावा. हे खरेच सीरियस क्रिकेट असून जगभरातील क्रिकेट पंडितांनाही याची जाणीव होऊ लागली असेल. भारतीय क्रिकेटमधील अमाप पैसा हा काही कुणाचे गळे कापून मिळविलेला नसून जगभरातील मान्यताप्राप्त उद्योगधंद्यांमध्ये असणाऱ्या पैशांचा रंग व याचा रंग सारखाच आहे. गेल्या वर्षी काही खेळाडू या क्रिकेटचा उपहास करीत होते. कारण बीच आणि बियर क्रिकेट असेच या स्पर्धेचे स्वरूप असेल असा त्यांचा अंदाज होता. या स्पर्धेसाठी करण्यात आलेला खेळाडूंचा लिलाव हा हास्यास्पद वाटतो; पण एकदा त्यासाठी आमने-सामने बसलं की, प्रत्येकवेळी काही तुम्हाला एकाला दुसरा पर्याय शोधण्याची गरज भासत नाही. नंतरच्या काळात या लिलावाचे महत्त्व कमी होत जाणार असले तरी पहिल्या वर्षी तो गरजेचा होता. आता संघ स्थिरावलेले असल्याने संघात घ्यायलाच हवेत असे फारच थोडे खेळाडू असतील. त्यामुळे यापुढे फुटबॉल लिगच्या धर्तीवर यातही केवळ खेळाडूंची अदलाबदलच होऊ शकेल.
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी आयपीएलचे संघ वेगळ्या पद्धतीने निवडण्यात आले आहेत. स्टार खेळाडूंना या वर्षीही मागणी असली तरी मेहनती व मिळणाऱ्या पैशाला पूर्ण न्याय देणाऱ्या खेळाडूंनाही यावेळी मोठी मागणी आहे. त्यामुळेच आगामी काळात चांगली कामगिरी करून लक्ष्य वेधण्याची संधी मिळावी म्हणूनच खेळाडू या स्पर्धेत खेळतील असा विश्वास वाटतो आहे.