Leading International Marathi News Daily                                 बुधवार, ११ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

फाफु इलेव्हन व संगम क्लब विजेते
पुणे, १० फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या ७ व्या एनईसीसी एन्डय़ुरो साहसी क्रीडा स्पर्धेतील खुल्या गटात फाफु इलेव्हन तर हौशी मिश्र गटात संगम हेल्थ क्लबने विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेतील विविध गटात २०० संघांनी भाग घेतला होता. त्यापैकी शंभरहून अधिक संघांनी ही स्पर्धा पूर्ण केली. फाफु इलेव्हन संघात शंतनु गोगटे, मुकुल पाडळकर व दिनेश मराठे यांचा समावेश होता. संगम हेल्थ क्लब या कराडच्या संघात केशव हजारे, संजय जगताप व योगिता भोईरे यांचा समावेश होता.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेचे संचालक व्हाईस अ‍ॅडमिरल आर. के. धवन यांच्या हस्ते झाला. एनईएफचे संचालक प्रसाद पुरंदरे हे यावेळी अध्यक्षस्थानी होते.
गटवार निकाल
खुला मिश्र- १) फाफु इलेव्हन (शंतनु गोगटे, मुकुल पाडळकर, दिनेश मराठे), २) महाराणा प्रताप संघ (महेश मोरे, कल्पना जगताप, कप्तान यादव), ३) नो चॅलेंज (आदिनाथ नायक, ऋतुजा लडकत, जयगोविंद यादव), हौशी मिश्र १) संगम हेल्थ क्लब (केशव हजारे, संजय जगताप, योगिता भोईरे), २) ब्लिटस क्रिग (सुमित मंडाले, सुदर्शन मंडाले, लक्ष्मी टोपे), ३) महाराणा प्रताप संघ (संजय तिकोने, तानाजी सोनटक्के, शहनाज कुडसी), आय.टी.
चॅलेंज मिश्र- १) तारे जमीन पर- (सचिन मस्तुगे, चेतन विधाते, ज्योती बाबर), २) ओशन्स थ्री (प्रदीप एच.डी, बिपीन शेडगे, कोमल सिंग) ३) वागा बाँडस (प्रवल शर्मा, भाबनी मिश्रा, रेवती तिरुवीदुला),
कॉपोरेट मिश्र- १) आयुध (सचिन वाडेकर, मनीषा सातपुते, विश्राम तावडे), २) संगम हेल्थ क्लब (निहार कुलकर्णी, किरण पावेकर, अर्चना अमाने), ३) मिशन वन (बाळकृष्ण देसाई, आशिष कसोडेकर, सुजाता मोटे)
महाविद्यालयीन मिश्र- १) सीएमई पॅन्थर्स (राकेश सिंग, जयसिंग सोलंकी, अन्नपूर्णा बोथटे), २) सीएमई टोरनॅडोज (जी. सी. लखविंदरसिंग सोधी, अक्षय अरोरा, प्रियांका पवार), ३) ध्रुव- (सीएमएम सर्वनान बी, कॅडेट राहुल मलिक, मोनाली भदे)
४० वर्षांखालील मिश्र- १)फोर्टीफाईड- (अतुल खराबे, आरती गायकवाड, प्रवीण गायकवाड), २) संगम हेल्थ क्लब (मुरली वस्ते, दिनेश पोरवाल, निमा काले), ३) फलॅमिंगोस- (रमेश जांबळे, शिल्पा गोसावी, अरुण फर्नाडिस)