Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ फेब्रुवारी २००९
आज उनसे पहली मुलाकात होगी..

शाल्मली: आज उनसे पहली मुलाकात होगी
फिर आमने सामने बात होगी.
फिर होगा क्या, क्या पता क्या खबर..
सारा: हाऽऽय! क्या बात हैं! किससे मुलाकात होनेवाली है जो इतना खूश नजर आ रही हो?
शाल्मली: चल, काहीतरीच काय! सक्काळी सक्काळी जे गाणं ऐकलं, तेच ओठावर आहे झालं.
सारा: सच बोल रही हो? पर लगता तो ऐसे है की बात काफी आगे बढ गई है. देख तो गालावर लाली.. डोळ्यात धुंदी..

 

शाल्मली: सारा, अगं तू स्वत: प्रेमात पडली आहेस, त्यामुळे तुला सारं जगच प्रेमात बुडाल्यासारखं वाटतंय.
सारा: चोराच्या वाटा चोराला कळतात, तसं! पण शाल्मली सांग ना, कौन है वो खुशनसीब?
शाल्मली: सारा, अगं का पीडतेयस? कोणी नाही सांगितलं ना? आणि भेटलाच कुणी तर आधी तुला येऊन सांगेन. don't worry.
सारा: पर मेरा मन ये कह रहा है की, कुछ तो गडबड है. ये इश्क हाये.. बैठे बिठाये जन्नत दिखाये..
शाल्मली: सारा, मी मगाचपासून बघतेय, हे हिंदीचं खूळ का डोक्यात शिरलंय तुझ्या?
सारा: वो क्या है नं शाल्मली, प्यार की बातें हिंदी में ही अच्छी लगती है..
शाल्मली: आ हा हा! मराठी भाषाही श्रीमंत आहे हं त्याबाबतीत..
सारा: ए, छोड वो सब. मूळ मुद्दा डायव्हर्ट करू नकोस.
शाल्मली: कसला मुद्दा?
सारा: बस क्या? सांग ना, वो कौन है.. वो कौन है?
शाल्मली: हद्द झाली हं आता तुझ्यापुढे सारा..
सारा: तरी पण..
शाल्मली: अग कां छळते आहेस? कोणी मिळालं नाही का दुसरं तुला आज.. जी माझ्या राशीला येऊन बसली आहेस. एनी वे, चल मला आता आवरायला हवं. कारण मला उशीर होतोय.
सारा: झूठ मत बोलो रानी..
शाल्मली: खोटं कशाला बोलू? ऑफिसला नको जायला?
सारा: मॅडमजी, आज आपल्याला उशिरा जायचं आहे, याची खबरबात काढूनच आम्ही आलो आहोत. तेव्हा No excuse... सांग बरं पटकन..
शाल्मली: काय सांगू? काही असेल तर सांगणार नां!
सारा: कब तक मुझसे छुपाओगी रानी?
कभी ना कभी तो दुल्हनिया बनोगी..
फिर इतना क्यों अकड रही हो? बोल दे ना नाम! या अभीसे नाम लेने से शरमा रही है?
शाल्मली: सारा, अग, डोकं बिकं फिरलंय का तुझं?
सारा: हां वैसे तो थोडी सरफिरी हूँ मैं. पण त्याचा आता इथं काही संबंध नाही. प्रश्न आहे तो
‘कोण तो रविकर गोजिरवाणा, आवडला आमुच्या शाल्मलीला?’
शाल्मली: बास हं आता सारा. तू म्हणजे पुरती सुटली आहेस.
सारा: बातही ऐसी है ना.. चल, नाव सांग सांग सांग नाव सांग..
शाल्मली: अगं, कुणाचं नाव सांगू? एकदा नाही, दहादा नाही, शंभरदा सांगते ‘तो’ अजून मिळायचाय.
सारा: झूठ.. साफ झूठ. ये झूठ हम बर्दाश्त नहीं कर सकते..
शाल्मली: नको करूस..
सारा: ए शाल्मली, असं ग काय करतेस? सांग ना.
शाल्मली: सारा, सकाळी चहाच घेतला आहेस नां की अजून काही!
सारा: ऐसी कोई बात नही जी.. हम पुरे होशोहवास में है!
शाल्मली : मग तरी का तुझं असं झालं?
सारा : त्याचं काय आहे ना शाल्मली, सध्या आपल्या सोसायटीत मॅरीड, कमिटेड, आणि नॉनकमिटेड असे तीन ग्रुप्स झालेत. आणि आता तू पण आमच्या ग्रुपमध्ये येते आहेस, याचा सगळ्यांनाच आनंद झालाय..
शाल्मली : सगळ्यांना ?
सारा : होय सगळ्यांना. बाईसाहेब, तुम्ही सध्या तुमच्या कामात इतक्या दंग असता की, आजूबाजूला काय चाललंय, याची खबरबातच नसते तुम्हाला. आणि आता तर काय, तू आमच्या वाटय़ाला आणखीनच कमी येशील.
शाल्मली : ती का?
सारा : किती वेड पांघरून पेडगावला जाशील?
शाल्मली : तू काय बडबडते आहेस, मला आता कळेनासंच झालंय.
सारा : हो, बरोबरच आहे. आता तुला आमचं बोलणं नाहीच कळणार. तिला सगळं सांगितलं असशील. नवीन मैत्रीण मिळालेय ना?
शाल्मली : कोण शाश्वती?
सारा : आणखी कोण? वेळ मिळाली की तिच्याकडेच असतेस.. देख देख..तेरा फोन बज रहा है..
शाल्मली : हॅलो.. हाऽऽय.. कसा आहेस? in fact, I was expecting your call... एनी वे, जरा एक मिनिट हं.. सारा, जरा बघतेस आईचा ब्रेकफास्ट तयार झालाय का? म्हणजे आपण बरोबरच खाऊ..
सारा : या अल्ला.. कही ये वो तो नही.. जो हमें कटवा रही हो?
शाल्मली : सारा चूप. काहीही काय बडबडतेस? अग, ऐकायला जाईल ना पलीकडे?
सारा : अच्छा बाबा, जाती हूँ मै. वैसे तो मैं भी कबाबमें हड्डी नहीं बनना चाहती..
शाल्मली : असं नव्हतं गं म्हणायचं मला सारा..
सारा : मग कसं म्हणायचं होतं गं शाल्मली..
शाल्मली : सारा, ples ऽ ऽ ऽ ऽ e !
सारा : ओके बाबा ओके. आता खरंचच जाते, नाही म्हणजे, ब्रेकफास्ट रेडी झाला की नाही बघते. नसेल तर तयार करते. कांदेपोहे चालतील?
शाल्मली : साऽऽ राऽऽऽ
सारा : सॉरी सॉरी.. take your own time...आज उनसे पहली मुलाकात होगी..
शुभदा पटवर्धन
shubhadey@gmail.com