Leading International Marathi News Daily                              शनिवार, १४ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

अग्रलेख

ग्रंथविश्व

लोकमानस

त्रिकालवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांतनिवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
हास्यविनोद, थट्टामस्करीच्या चिरपरिचित शैलीत रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी सन २००९-१० सालातील पहिल्या चार महिन्यांसाठी रेल्वेचे लेखानुदान प्रस्ताव संसदेत सादर करताना सामान्य श्रेणीपासून वातानुकूलित प्रथम श्रेणीतील प्रवाशापर्यत सर्वांना प्रवासी भाडेकपातीचा दिलासा देत लोकानुनयाचा शेवटचा प्रयत्न केला. लालूप्रसाद यादव यांनी आज सादर केलेल्या अंतरिम रेल्वे अर्थसंकल्पात सलग चौथ्या वर्षी गैरउपनगरी मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाडय़ांच्या ५० रुपयांपर्यंतच्या प्रवासी भाडय़ात एक रुपयाने कपात, लांब अंतरांच्या सर्व मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाडय़ांच्या प्रवाशी भाडय़ात दोन टक्क्यांनी तसेच एसी चेअरकारसह सर्व वातानुकूलित श्रेण्यांच्या भाडय़ात दोन टक्के कपातीची घोषणा केली.

पंधेर, कोली यांना फाशीची शिक्षा
निठारी हत्याकांड

गाझियाबाद, १३ फेब्रुवारी/पीटीआय

सुमारे दोन वर्षांपूर्वी साऱ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या निठारी बालहत्याकांडातील एका खटल्यात मुख्य आरोपी मोनिंदरसिंग पंधेर व त्याचा नोकर सुरिंदर कोली या दोघांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. निठारीमध्ये एकूण १९ बालकांचा बळी घेण्यात आला होता. त्यापैकी पंधेर यांच्याकडे घरकाम करणाऱ्यारिम्पा हलदार या १४ वर्षे वयाच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी हा निर्णय देण्यात आला आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश जैन यांच्या न्यायालयात निठारी हत्याकांडाचा निकाल ऐकण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.

‘धवल’ यश!
न्यूझीलंड दौऱ्यासाठी बालाजीसह दिनेश कार्तिकचे पुनरागमन
चेन्नई, १३ फेब्रुवारी / पीटीआय

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा मुंबईचा मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीला आज त्याच्या यंदाच्या मोसमातील सातत्यपूर्ण कामगिरीचे रसभरीत फळ मिळाले. प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यंदा सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या पंक्तीत दुसरे स्थान मिळवणाऱ्या २० वर्षांच्या धवल कुलकर्णीचा न्यूझीलंड दौऱ्यासाठी आज जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात समावेश करण्यात आला. तसेच पुन्हा तंदुरुस्त झालेला मध्यमगती गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीसह तामिळनाडूचाच त्याचा संघहकारी दिनेश कार्तिकनेही भारतीय संघात पुनरागमन केले.

भविष्यात कसे संबंध ठेवायचे हे पाकिस्ताननेच ठरवावे : प्रणव मुखर्जी
नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी असलेल्या संबंधांच्या बाबतीत आम्ही अशा वळणावर पोहोचलो आहे, जिथे भविष्यात भारताशी कशाप्रकारचे संबंध ठेवायचे हे पाकिस्तानलाच ठरवायचे आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तार्किक शेवटावर पोहोचण्यासाठी पाकिस्तान कशाप्रकारची कृती करतो, यावरच भविष्यातील संबंध अवलंबून आहेत, असा मुत्सद्दीगिरीचा इशारा देत लोकसभेचे नेते व परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानच्या कबुलीजबाबामुळे भारताचे फारसे समाधान झाले नसल्याचे अधोरेखित केले.

अमेरिकेत घरावर विमान कोसळून ४९ ठार
न्यूयॉर्क, १३ फेब्रुवारी/पीटीआय

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातल्या बफेलो या उपनगरानजिक प्रवासी विमान जमिनीवर उतरत असताना एका घराला धडकले व या विमानाने तात्काळ पेट घेतला. या भीषण अपघातात विमानातील सर्व ४८ प्रवासी तसेच धडक बसलेल्या घरानजिक असलेली एक व्यक्ती असे एकूण ४९ जण ठार झाले. हा अपघात भारतीय वेळेनुसार आज सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी झाला. कॉल्गन एअर या कंपनीच्या या प्रवासी विमानाची प्रवासीक्षमता ७४ जणांची असली तरी प्रत्यक्षात ४८ जण प्रवास करीत होते. जमिनीवर उतरण्याच्या अवघे पाच मिनिटे आधीच या विमानाला भीषण अपघात झाला. घराला धडक दिल्यानंतर या विमानाने तात्काळ पेट घेतला व विमानातील एकही प्रवासी वाचू शकला नाही. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, विमानाने धडक दिलेल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या घरांमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले; १० ठार
भुवनेश्वर, १३ फेब्रुवारी/पी.टी.आय.

रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी लोकसभेत रेल्वेखात्याची यंत्रणा सुधारली असल्याची व प्रवाशांच्या सुरक्षेविषयी योजलेल्या उपायांची जंत्री सादर करून अपघातांचे प्रमाण घटले असल्याचे सांगून काही तास उलटले नाही तोच हावडा-चेन्नई दरम्यान धावणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसचे १२ डबे रूळावरून घसरून ओरिसातील जयपूर येथे घडलेल्या भीषण अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाला व ७० हून अधिक प्रवासी जखमी झाले. ओरिसाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भुवनेश्वरपासून १२० कि.मी. अंतरावर असलेल्या जयपूर रोड रेल्वे स्थानकानजिक एक कि.मी. अंतरावर सायंकाळी ७.५० च्या सुमारास हा अपघात घडला.

शाहरूखच्या ‘मन्नत’वर हल्ला
‘गेईटी’ मध्ये ‘बिल्लू’चा खेळ बंद पाडला
मुंबई, १३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

चित्रपटातील ‘बार्बर’ या नावामुळे सुरू झालेल्या वादाने चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही ‘बॉलिवूड किंग’ शाहरूख खानचा पिच्छा सोडलेला नाही. गुरूवारी मध्यरात्री दोन अज्ञात इसमांनी त्याच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ या बंगल्यावर केरोसीनच्या बाटल्या फेकून हल्ला केल्यानंतर आज सकाळी चित्रपटातील ‘मरजानी..’ या गाण्याने भावना दुखावल्याच्या कारणास्तव मूलतत्त्ववादी संतप्त जमावाने ‘गेईटी’ सिनेमागृहावर हल्लाबोल करून तोडफोड केली आणि चित्रपटाचा खेळ बंद पाडला. ‘बिल्लू’ या चित्रपटात शाहरूख आणि करीना कपूर हिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘मरजानी.. ’ या गाण्यामध्ये ‘हुजूर ने’ असा शब्दप्रयोग करण्यात आल्याने संतापलेल्या मूलतत्त्वद्यांनी वांद्रे येथील ‘गेईटी’ सिनेमागृहावर सकाळी हल्लाबोल केला. तसेच चित्रपटाचा खेळ बंद करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात जमावाकडून सिनेमागृहाची तोडफोडही करण्यात आली. त्या आधी गुरूवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी शाहरूखच्या ‘मन्नत’ या बंगल्यावर केरोसिनने भरलेल्या बाटल्या फेकून पळ काढला. त्या वेळी बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी हल्लेखोरांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.

मेष : नाव न टाकता लेबलवर नुसतं ‘आय लव्ह यू’ लिहा कारण फुलं सुकतात पण पुरावा चिरंतन राहतो.
वृषभ : तुमचा खवीस बाप घरात आहे
आज एनएसएसचं श्रमदान शिबीर आहे असं सांगा.
मिथुन : तुझ्या मिठीत ‘ग्लोबल’ वाटतं असलं काही म्हणू नका, तिला उगाचच वजन वाढल्यासारखं वाटेल.
कर्क : ती इंग्लिश मिडियमवाली आहे
निदान आज तरी मराठीचा आग्रह धरू नका.
सिंह : टॅक्सीत बसतांना वृत्तपत्राचा आडोसा करा
आरशातून मागं काय चाललयं कळतं राव.
कन्या : वारा छान सुटलाय, मस्त थंडी आहे म्हणत बसू नका, वातावरण निर्मितीत अनेकदा आयुष्य निघून जाते.
तूळ : आयुष्य खूप गतिमान झालंय
थोडक्यात प्रेम करा.
वृश्चिक : आईला थाप मारलीत ना
तीच बाबांना मारा.
धनु : प्रेम करतांना सॅलरीची रेंज निश्चित करा
तो हॅन्डसम आहे म्हणून भुरंगळू नका.
मकर: निलेशशी बोलताना उगाच, ‘शशी दिसला नाही बऱ्याच दिवसात’ असं चुकून म्हणू नका
कुंभ : बाबांचा विरोध वरवरचा आहे, तुमचं तुम्ही जमवलंत तर त्यांचाच ‘पीएफ’ वाचणार आहे.
मीन : इतर राशींचं भविष्य वाचण्यात वेळ घालवू नका, निघा लवकर! नाही तर बोंबला!
अनंत अपराधी

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८