Leading International Marathi News Daily                               सोमवार, १६ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

अग्रलेख

शेतीवाडी

लाल किल्ला

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

लावण्ययात्रेला ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी!
सतीश कुलकर्णी
केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १५ फेब्रुवारी
एकोणनव्वदाव्या नाटय़ संमेलनाची गर्दी ‘रेकॉर्ड ब्रेक’ करणारी ठरणार, असे भाकीत उद्घाटनाच्या सोहळ्यातच वर्तविण्यात आले आणि ते खरे करण्याचा विडाच जणू बीडकरांनी उचलल्याचे काल आणि आजही दिसून आले. आमची सांस्कृतिक भूक किती मोठी आहे, हेच त्यांनी दाखवून दिले. नाटय़दिंडीला बीडच्या रसिक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. उद्घाटनाच्या सोहळ्याला मुख्य सभामंडप खचाखच भरला होता. पण गर्दीमुळे डोळे विस्फारण्याची वेळ आली ती संध्याकाळी. सव्वा-दीड तास रंगलेल्या लावण्यांच्या कार्यक्रमासाठी मुख्य सभामंडप खचाखच भरला होता. मुंगी शिरायला जागा नाही, म्हणजे काय हेच दिसून आले.

विश्व मराठी साहित्य संमेलनाला उदंड प्रतिसाद
महाराष्ट्र परिचय केंद्र व मराठी विद्यापीठासाठी आग्रह

प्रवीण बर्दापूरकर, सॅन होजे, १५ फेब्रुवारी

परदेशातील मराठी मंडळींसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र आणि मराठी विद्यापीठ हे दोन कळीचे मुद्दे येथे थाटात प्रारंभ झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून उपस्थित करण्यात आले. मराठीजनांच्या या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी आग्रही भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली.‘इंडिया कम्युनिटी सेंटर’मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत आणि रसिकांच्या उदंड प्रतिसादात उद्घाटनाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी बोलताना कौतिकरावांनी मराठी विद्यापीठ आणि परिचय केंद्र हे मराठी मनात घर करून असलेले महत्त्वाचे मुद्दे रेटून धरले.

पवार पंतप्रधान होणार असतील तर विरोध नाही’
नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी/पीटीआय

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार किंवा मुलायम सिंग यांच्यापैकी कुणालाही पंतप्रधान होण्याची संधी मिळत असेल तर त्याला विरोध करणार नाही असे समाजवादी पक्षाने म्हटले आहे.डॉ.मनमोहन सिंग हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असे काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी काल जाहीर केले होते. त्याला यूपीए सरकारमधील दोन पक्षांनी एक प्रकारे आव्हान दिले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग यांनी सांगितले की, जर शरद पवार किंवा मुलायम सिंग यादव यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर दोघेही एकमेकांना विरोध करणार नाहीत. अमरसिंग यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर अमरसिंग असेही म्हणाले की, मनमोहन सिंग हे पुन्हा पंतप्रधान होणार असतील तरी त्यालाही आमचा विरोध नाही. सध्या मनमोहन सिंग आमचे नेते आहेत व लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार किंवा मुलायमसिंग यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर ते एकमेकांना विरोध करणार नाहीत. उत्तर प्रदेशात काँग्रेस व समाजवादी पक्ष यांची युती होण्यात अनेक अडचणी असताना समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आलेले हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. दरम्यान शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात जास्त जागा वाटय़ाला याव्यात यासाठी काँग्रेसवर दडपण आणीत आहे. राष्ट्रीय पातळीवर युती न करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्ष नाराज आहे. राज्यपातळीवर जागा वाटपाला काँग्रेसने प्राधान्य दिले आहे.

यूपीए सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प
मंदीच्या फटक्यातून सावरण्यासाठी खास तरतुदी

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी/पीटीआय

काँग्रेसप्रणीत यूपीए आघाडी सरकारचा शेवटचा व अंतरिम अर्थसंकल्प उद्या संसदेत सादर होत असून, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर त्यात जागतिक मंदीच्या परिणामांचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात सरकार ग्रामीण विकास, गृहनिर्माण या क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्यक्रमांवरचा खर्च वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक तूट २००९-१० या वर्षांसाठी ५ टक्क्यांपर्यंत (दुप्पट) जाण्याची शक्यता आहे.

समविचारी पक्षांना जागा सोडण्याचा राष्ट्रवादीचा प्रस्ताव काँग्रेसला अमान्य
मुंबई, १५ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

समविचारी पक्षांसाठी जागा सोडण्याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची सूचना म्हणजे काँग्रेसच्या जागा कमी करण्याचा डाव असल्याचे काँग्रेसचे म्हणणे असून राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव मान्य करता येणार नाही, असे काँग्रेसच्या वतीने आज स्पष्ट करण्यात आले. एकूणच जागावाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादी किंचितही माघार घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे जाणवते. जास्त जागा पदरात पाडून घेण्याकरिता राष्ट्रवादीच्या वतीने विविध पर्याय मांडून दबावाचे राजकारण केले जात असल्याची भावना काँग्रेसमघ्ये झाली आहे.\

स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आगामी रविवार ‘तापदायक’!
राजीव कुळकर्णी, ठाणे, १५ फेब्रुवारी

जागतिक मंदीच्या लाटेमुळे खासगी क्षेत्रातील लाखो तरुणांच्या नोकऱ्या हेलकावे खात असताना सरकारी क्षेत्रात आपली करिअर करू इच्छिणाऱ्या बेरोजगार युवकांना एकाच दिवशी येणाऱ्या तीन स्पर्धा परीक्षांमुळे कोणत्या विभागाला पसंती द्यावी, असा प्रश्न सतावू लागला आहे. येत्या २२ फेब्रुवारी रोजी राज्य गुप्तवार्ता विभाग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि अन्न व नागरी पुरवठा विभागातील ‘फूम्ड इन्स्पेक्टर’पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याने नक्की कोणत्या परीक्षेला बसावे, असा प्रश्न राज्यभरातील हजारो तरुणांना भेडसावत आहे. अनेक बेरोजगार तरुणांनी आपली ही व्यथा ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.

बसपाच्या ‘जय भीम’ला मुस्लिमांचा आक्षेप!
लखनौ, १५ फेब्रुवारी/पी.टी.आय.

‘जय भीम’ म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काय उभे राहते? घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तेज:पुंज आणि भारदस्त व्यक्तिमत्व पटकन डोळ्यासमोर उभे राहते. काही थोडय़ाजणांना महाभारतातील महाबली भीमही आठवतो. पण जय भीम घोषणेशी अतूट नाते जडले आहे ते डॉ. बाबासाहेबांचेच. महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टीप्रमाणेच उत्तर प्रदेशातील सत्तारूढ बहुजन समाज पार्टीही आपले राजकीय तत्वज्ञान डॉ. बाबासाहेबांच्या विचारधनावरच आधारित असल्याचा दावा करते. स्वाभाविकच जय भीम ही घोषणा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणादायी घोषणा ठरते. परंतु ही घोषणा ‘इस्लामविरोधी’ आणि ‘शरीयत’चे उल्लंघन करणारी असल्याचा ‘फतवा’ ‘दारुल उलूम’ या मुस्लिमांच्या धार्मिक संघटनेने जारी केला आहे. दारुल उलूमने असा फतवा जारी केल्याचा सर्वाधिक आनंद बसपाचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मुलायमसिंगांच्या समाजवादी पार्टीला झाला. जय भीम ही घोषणा बसपाच्या कार्यकर्त्यांवर ‘लादली’ जात असल्याचा आरोप सपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला. तर भाजपने हा एकप्रकारे अभिवादन करण्याचा मार्ग असून या गोष्टीलाही आक्षेप घेतला जात असल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. तर खुद्द बसपाचीही या फतव्यामुळे पंचाईतच झाली आहे. बसपामधील मुस्लिम नेत्यांना यासंदर्भात काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेनासे झाले आहे. लखनौच्या इदगाहचे नायब इमाम तसेच ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड’चे सदस्य मौलाना खलिद रशीद फिरंगी माहाली या दोघांच्या म्हणण्यानुसार एखादा राजकीय पक्ष मुस्लिमांना कोणा व्यक्तीचा जयजयकार करण्यास बाध्य करू शकत नाही. असे करणे हे इस्लामविरोधी आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८