Leading International Marathi News Daily

मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९

कॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक’ करणं फार थोडय़ांना जमतं. आपमे हैं वह बात? तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूडशी’ मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो! फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.

पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश तर नेहमीच कुठे ना कुठे पाहायला, वाचायला नाहीतर ऐकायला मिळत असतो. तो आपण किती सिरियसली घेतो हा भाग वेगळा. पण ते घेतलं पाहिजे कारण पाण्याचं महत्त्व काय आहे हे आपण सर्व जण जाणून आहोत. एका पन्नास फुटी ऊंच मनोऱ्यावर शेकडो बादल्या, पाण्याच्या रिकामी बाटल्या, पाण्याचे मग पाहून जर हा संदेश वेगळ्या पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचवायचा विचार त्यांच्या मनात आला तर चुकलं कुठे? मुळात संदेश लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं. त्याच्यापुढे गेल्यावर मुंबईत कुठे कुठे ग्रीनबेल्टची आवश्यकता आहे हे सांगणारा मोठा नकाशा सीमेंटच्या जंगलात धुसर होणारी ‘मुंबई’ शोधायला भाग पाडतो. मग आपण पोहोचतो ते शौचालयाजवळ. अहं नाकं मुरडू नका.. इथे काही ती दरुगधी येणारी घाणेरडी शौचालयं नाहीत तर आपण ही दरुगधी वाढवायला कसा हातभार लावतो आणि आपलं सरकार लोकांना त्या सोयी-सुविधा कशा प्रकारे पुरवू शकत नाही हे दिसतं. हा विषय सेवाभावी संस्थांनी कसा अभ्यासासाठी घ्यावा व या समस्येवर काम करणं किती गरजेचं आहे याची कल्पना देणारी सुंदर सफर घडवून आणतो.
पुढे गढद रंगांच्या मोठय़ा फ्रेम्स लक्ष वेधून घेतात, नवोदितांना फारसं काही बोध होऊ न देणाऱ्या या फ्रेम्स मात्र जागीच खिळवून ठेवतात. फोटोग्राफी हा अनेकांचा आवडता विषय. काहींसाठी तो छंद तर काहींसाठी तो व्यवसाय. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने त्यामध्ये प्रयोग करीत असतो. असाच मस्त प्रयोग रेल्वेच्या स्त्रियांच्या डब्यातील फोटोफ्रेम्सच्या बाबतीतला. पुरुष प्रवाशांना प्रवेश वज्र्य असलेल्या या डब्याबाबत नेहमीच चर्चा असते. तो सारा फिल आपल्याला येथे लावलेली छायाचित्रे पाहून येतो. भन्नाट पद्धतीने क्लिक केलेल्या फ्रेम्स आणि त्याला मिळालेली प्रकाशाची व प्रसंगावधानाची जोड त्याच रूपांतर अनेक वर्षे जपून ठेवाव्या अशा दस्तावेषात करतात. विविध कलाकारांनी मांडलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, मूळ संकल्पनेला छेद देऊन तयार केलेल्या कलाकृती पावलोपावली लक्ष वेधून घेतात. सायकलच्या निकामी झालेल्या पार्ट्सला हात जोडायला आपण येथेच मजबूर होतो. कारण त्याला गणपतीचा आकार मिळालेला आहे. कॅनव्हासवर नेहमीच विविध रंगांनी रेघोटय़ा ओढलेल्या आपण पाहत आलो आहोत, पण त्या रेघोटय़ांना जर शब्दरूप मिळालं तर? असंच काहीसं येथे अनुभवायला मिळतं. २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनात आलेल्या भावनांना कॅनव्हासवर मूर्त स्वरूप मिळालेलं आहे. मग ते कवितेच्या, शायरीच्या तर कधी संदेशाच्या फॉर्ममध्ये वाचायला मिळतं, तेही भाषेचा अडसर न ठेवता.
तरुणांकडे कल्पनाशक्तीची, क्रिएटीव्हीटीची कमतरता नाहीये. गरजेचं आहे त्यांना योग्य तो प्लॅटफॉर्म मिळण्याची. काळा घोडा फेस्टिव्हलच्या निमित्ताने तो त्यांना मिळाला आणि त्याचा त्यांनी पुरेपूर योग्य तो वापर करून घेतला होता.
प्रशांत ननावरे
nanawareprashant @yahoo.co.in

‘वर्ल्ड इज गेमिंग’
१२ जानेवारी रोजी सोनी एरिक्सनने ‘वर्ल्ड गेमिंग डे’ साजरा केला. त्या निमित्ताने अंधेरीतील इन्फिनिटी मॉलमध्ये तरुणांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये मोबाईल फोन्स, पीसी आणि कन्सोल या तीन माध्यमांतील गेम्सचा समावेश होता. अनेक तरुणांनी ऑनलाइन गेमिंगचा आनंद लुटला. या वेळी माधवन आणि नितू चंद्रा हे चित्रपट कलाकार उपस्थित होते. यात सहभागी झालेले नवोदित गेमर्स जय दर्णे आणि विशाल सिंग त्यांच्या गेमिंग अनुभवाबद्दल सांगत आहेत.
जय दर्णे- मी ७ वीत असल्यापासून गेमिंगला सुरुवात केली. अगोदर फक्त वेळ घालवण्यासाठीच खेळायचो पण आता त्याबद्दल जास्त इंटरेस्ट वाटतोय. गेमिंगसाठी अगोदर आई-वडिलांचा पाठिंबा नव्हता. मात्र मी मनापासून गेमिंग करतोय बघितल्यावर ते आता विरोध करत नाहीत.
मी मुंबई विद्यापीठातून करस्पाँडन्ट कोर्स करत असल्याने कॉलेज संध्याकाळी असतं. त्यामुळे आम्ही गेमर्स मित्र सकाळी एकत्र गेमिंग कॅफेमध्ये जातो. जवळजवळ ८ तास आम्ही वेगवेगळ्या प्रकारांचा सराव करतो. सध्या तरी मी स्वतंत्रपणे खेळतोय.’’
विशालसिंग- ‘‘मी सुद्धा विद्यार्थी असून सध्या एल. एस. रहेजा कॉलेजमध्ये शिकतोय. मी १२ वर्षांंचा असल्यापासून गेिमग करतोय. आई-वडील जरी पूर्णपणे गेमिंगसाठी पाठिंबा देत नसले तरी खूप विरोधही करत नाही. सध्या भारतातील गेिमग इंडस्ट्रीतील तरुणांचा सहभाग वाढतोय आणि या क्षेत्रातही खूप संधी आहेत. दररोज मी ४-५ तास गेमिंगचा सराव करतो. या क्षेत्रात प्रोफेशनल गेमर होण्याची माझी इच्छा आहे.’’
ओंकार पिंपळे , रामनारायण रुईया
pimpalpan@yahoo.co.in


मुंबई स्पिरिट
ळरएउ अर्थात ‘थडूमल शहानी इंजिनीयरिंग कॉलेज’ आपल्या सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठात नेहमीच आपला ठसा उमटवीत आले आहे. यंदा कॉलेज-फेस्टिवल्सच्या निमित्ताने कॉलेजमधील बऱ्याच कमिटीजनी ‘मुंबई स्पिरिट’ या विषयावर आपले उपक्रम आयोजित केले. ैळॉ उर्फ (ळरएउ गांधी फोरम)’ या संस्थेने प्रथमच टी-शर्ट पेंटिंगची स्पर्धा घेतली. दहशतवादाला विरोध, शांततेचे आवाहन, गांधींची मूल्ये यांवर तरुणांनी विविध संदेशरूपी चित्रे रेखाटली व मान्यवर प्राध्यापकांकडून त्यांचे परीक्षणसुद्धा झाले. याखेरीज ैळरा (ळरएउ स्पिरिच्युअल फाऊंडेशन’)ने यंदा आगळावेगळा ‘मुंबई-स्पिरीट फोटोग्राफी’ हा उपक्रम राबवून तरुणांतील विचारशक्तीला चालना दिली. सध्याच्या परिस्थितीवर आधारित वादविवाद व वक्तृत्व स्पर्धानी खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला रंगत आणली. एकंदरित, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व एकता निर्माण करण्यात कॉलेजला यश आले व त्यातच कार्यक्रमाचे प्रयोजन सिद्धही झाले!
प्रतीक भगत, सेंकड ईयर (केमिकल)
‘थडूमल शहानी इंजिनीयरिंग कॉलेज,

आयटी फेस्ट @ एमईटी
एमईटी इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर सायन्सने १७ व १८ फेब्रुवारी या दोन दिवसांत ‘टेक @ एमईटी’ हा आयटीविषयक आंतरमहाविद्यालयीन महोत्सव आयोजित केला आहे. यात लॅन गेमिंग, सुडोकू, वेब डिझायनिंग, इमॅजिंग, कोडिंग अ‍ॅण्ड डिबगिंग, कंसोल गेमिंग ही विविध आकर्षणं आहेत. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. राजीव रस्तोगी, (व्हाइस- प्रेसिडेंट, याहू लॅब्ज, बंगलोर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते ‘इंटरनेट रिसर्च- व्हॉट्स हॉट इन सर्च, अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड क्लाउड कॉम्प्युटिंग’ या विषयावर व्याख्यान देतील. त्याचप्रमाणे के. के. मुखी (नेटवर्क इंटेलिजन्स) हे कॉम्प्युटर फोरेन्सिक विषयावर व्याख्यान देतील. आजच्या टेक्नोसॅव्ही तरुणांसाठी हा आगळा महोत्सव आकर्षण ठरेल. अधिक माहितीसाठी संपर्क- सचिन म्हात्रे- ९३२३००३२६२१.
कॅम्पस मूड टीम

फिल्म्सचा एक अनोखा अँगल - लेन्स ०९
फिल्म्स म्हणजेच एक उत्कृष्ट करिअर संधी. आपले अंगभूत कलागुण दाखविण्याची ती एक सोय म्हणून आज आपण तरुण मंडळी या क्षेत्राकडे पाहतोय. पण फक्त व्यावसायिक चित्रपट बनवून आपली क्रिएटिव्हिटी व्यक्त करण्यापेक्षा आपण जर एखादी डॉक्युमेंटरी बनवली तर तो अनुभव जास्त चांगला असेल. त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल आणि समाजासाठी काही तरी करण्याचे समाधानदेखील मिळेल. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब यांनी कॉलेज विद्यार्थ्यांनाही संधी दिली. त्यांनी एक अनोखा फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला होता- लेन्स ०९. मुंबई आणि नवी मुंबईमधील २० कॉलेजेस्नी यात भाग घेतला होता. त्याकरिता ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली गेली होती. या स्पर्धेत ५१ अ‍ॅड् फिल्म्स आणि ८ डॉक्युमेंटरीज उतरल्या होत्या. त्यातून १५ अ‍ॅड् फिल्म्स आणि ४ डॉक्युमेंटरीज अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. १३ फेब्रुवारीला या स्पर्धेची अंतिम फेरी झाली. या फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने नेत्रदानासारखा महत्त्वाचा सामाजिक संदेश लोकांसमोर मांडला गेला. रक्तदानाइतकेच नेत्रदानाचे महत्त्वही लोकांना पटवून देणे आवश्यक आहे. आपल्या मृत्यूनंतर कुणा एकाचे जीवन आपण उजळवू शकतो हे या फिल्म फेस्टिव्हलद्वारे स्पष्ट झाले. लायन्स क्लबने हा फेस्टिव्हल फक्त प्रायोजित केला होता, पण या मागची मूळ संकल्पना कु. गौरी शेणॉय व कु. सिमरन भाटिया यांची होती. या दोघी मास मीडियाच्या विद्यार्थिनी आहेत. या स्पर्धेसाठी डॉक्युमेंटरीला २ व अ‍ॅड् फिल्म्सला २ पारितोषिके ठेवण्यात आली होती. एक उत्तेजनार्थ पारितोषिकही घोषित केले होते. ज्या कॉलेजमधून सर्वात जास्त प्रवेशिका आल्या होत्या त्या कॉलेजला ‘स्पेशल स्पिरिट अ‍ॅवॉर्डने गौरविण्यात आले. अ‍ॅड् फिल्म्साठी प्रथम पारितोषिक १५,००० रु. व द्वितीय पारितोषिक १०,००० रु.चे होते. डॉक्युमेंटरीजसाठी प्रथम पारितोषिक रु. २०,००० व द्वितीय पारितोषिक रु. १५,००० होते. अ‍ॅड् फिल्म्समध्ये दोन्ही पारितोषिके जिंकून रुईया कॉलेजने बाजी मारली. डॉक्युमेंटरीजचे पारितोषिक अनुक्रमे जयहिंद व एसआयईएस या कॉलेजेसनी पटकावले. उत्तेजनार्थ पारितोषिक पोद्दार कॉलेजला मिळाले. स्पेशल स्पिरिट अ‍ॅवॉर्ड हे सेंट झेवियर्स व रुईया कॉलेज या दोघांना विभागून देण्यात आले. अंतिम फेरीसाठी हरीश महेंद्र, अभिषेक आचार्य व डॉ. गुल ननकानी (नेत्रविशारद) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या सर्व विजेत्या अ‍ॅड् फिल्म्स व डॉक्युमेंटरीज जनजागृतीसाठी वापरण्यात येणार आहेत. असा हा अनोखा फिल्म फेस्टिव्हल अभूतपूर्व यश मिळवून गेला!
पूनम बुर्डे , सेंट झेवियर्स कॉलेज
poonamburde@yahoo.co.in

चिप-आयटी
यूपीजी कॉलेज, विलेपार्ले २० फेब्रुवारी रोजी ‘चिप-आयटी’ हा एकदिवसीय फेस्टिव्हल आयोजित करत आहे. यात सॉफ्टवेअर एक्झिबिशन, रेजिंग बुल (मॉक स्टॉक मार्केट), क्रिप्टोहंट (ट्रेझरहंट) आणि लॅन गेमिंग इ. विविध स्पर्धा असणार आहेत. राजीव वैष्णव (नॅसकॉम) आणि प्रसिद्ध कॅनेडियन अ‍ॅनिमेटर फिलीप एडवर्ड यांच्या कार्यशाळा होणार आहेत. त्याचप्रमाणे आयटी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- सुची जैन ९८३३५५५१६०.
कॅम्पस मूड टीम
campusmood@gmail.com

दिल से..
प्रिय सावनी,

पत्राला सुरुवात कशाने करावी ते कळत नाही आहे. तू मागच्या पत्रात विचारलेल्या उत्तरापासून की व्हॅलेंटाइन डेच्या त्या धमाल किश्श्याने. जाऊ दे त्यापासूनच करतो. आमच्या हॉस्टेलमध्ये भारतेंदू नावाचा आमचा बिहारचा एक मित्र आहे. दिसायला स्मार्ट, हुशार पण तो हनुमानाला जाम मानतो. दर शनिवारी न चुकता संध्याकाळी हनुमान मंदिरात जातो; पण या वेळी व्हॅलेंटाइन डे शनिवारी आलाय हे निमित्त साधून आम्ही त्याची पुरती फिरकी घ्यायचं ठरविलं. संध्याकाळी तो ज्या मंदिरात गेला होता, तेथे आमच्या एका मित्राच्या एनएसडीमध्ये शिकणाऱ्या मैत्रिणीला त्याला प्रपोज करायला पाठविलं होतं. आम्ही हा सर्व सिन लांबून बघतच होतो. च्यायला सालेड डॅशिंग होती ती. बिच्चारा दर्शनासाठी रांगेत उभा होता आणि तिने जाऊन डायरेक्ट त्याच्या डोळ्यातच पाहायला सुरुवात केली आणि मग एका क्षणी तिने त्याचा हात हातात घेतला, स्वत:चे ओठ त्याच्यावर टेकवले आणि पुढे म्हणाली I Love you आणि पळून आली. तो तर पुरता भांबावून गेला होता. हात-पाय कापत होते. घाम फुटला होता. बरोबरच आहे म्हणा हनुमान मंदिराच्या पायथ्याशी कुणी मुलगी हे असलं काही करील ही कल्पनाच करवत नाही. हे सर्व पाहून लोकांच्या तर भुवया उंचावल्या होत्याच, पण याला काय रिअ‍ॅक्ट व्हावं हेच कळत नव्हतं आणि you cant believe it, दोन दिवस त्याला ताप चढला होता. आमची तर हसून हसून पुरती वाट लागली होती. It was great fun.
असो.. तू विचारलेल्या प्रश्नावर बराक ओबामा जिंकल्यावर आम्ही काही दिवस रात्रंदिवस चर्चा करीत होतो; पण अजूनही त्याचं फायनल उत्तर सापडत नाहीये. कारण हा फार मोठा विषय आहे. एक असं ठराविक उत्तर त्यावर नसू शकतं. तिकडच्या आणि आपल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीत, विचारसरणीत फार मोठी तफावत आहे. आपण म्हणतो, की भारत हा तरुणांचा देश आहे पण अजूनही येथील तरुणाला नेमकं कुठं जायचं आहे याची दिशा नाहीये. हे सर्व घडेल, याला वेळ लागेल, पण होईल हा विश्वास आहे. बाकी सर्व मजेत आहे. राजधानीत निवडणुकीच्या घडामोडींना वेग आलाय त्यामुळे वातावरण तापलंय. लेक्चर्स, सेमिनार्सना दिवसेंदिवस मजा येतेय. तुझ्या पत्राची वाट पाहतोय. काळजी घे.
मिहीर